अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्जासाठी प्रस्ताव आमंत्रित




अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ

कर्जासाठी प्रस्ताव आमंत्रित

        वाशिम, दि. 22 (जिमाका) : जिल्हयातील मातंग समाजाच्या अर्जदारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरीता राज्य शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत मातंग समाजातील १२ पोट जातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते. चालु आर्थिक वर्षात बीजभांडवल योजनेअंतर्गत ५० हजार १ रुपयापासून ते 7 लाख रुपयापर्यंत जिल्हयाला ३० कर्ज प्रकरणांचे उदीष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह ४५ टक्के, लाभार्थी सहभाग ५ टक्के आणि बँक कर्जाचा सहभाग ५० टक्के आहे. महामंडळाच्या बीजभांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो व बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याजदर असतो.

          अनुदान योजनेअंतर्गत ५० हजार रुपयापर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येते. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये असून उर्वरित कर्ज बँकेचे असते. या योजनेचे जिल्हयातील ४० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उदीष्ट दिले आहे. या योजेनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीतील असावा, वयोमर्यादा १८ ते ५० वर्ष असावी, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, दोन फोटो, रेशन कार्ड, आधार कार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, व्यवसायासाठी जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल आदी आवश्यक कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या, डॉ. बाबासाहेब अविडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन कर्ज प्रस्ताव सादर करावा. असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे