कारंजा येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना लोकसहभागातून बियाणे व खत वाटप
- Get link
- X
- Other Apps
कारंजा येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना
लोकसहभागातून बियाणे व खत वाटप
वाशिम, दि. 30 (जिमाका) : कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील सदस्यांना आज 30 जून रोजी विद्याभारती महाविद्यालय, कारंजा येथे आयोजित कार्यक्रमात लोकसहभागातून बी-बियाणे व खत वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, तहलिसदार कुणाल झाल्टे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल राठोड, तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी, कृषी व्यावसायीक संघटनेचे अध्यक्ष विनोद राऊत, डॉक्टरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय कांत, माजी नगराध्यक्ष संजय काकडे व श्रीकांत लव्हाळे यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते 107 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना बी-बियाणे व खत किटचे वाटप करण्यात आले. लोकसहभागातून बियाणे व खत वाटप करण्याकरीता डॉक्टर्स असोसिएशन, कारंजा कृषी व्यावसायकी संघटना, विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा कारंजा, मंडळ अधिकारी संघ तालुका कारंजा यांचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक तहसिलदार श्री. झाल्टे यांनी केले. यावेळी श्री. राठोड व डॉ. कांत यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन तलाठी राहूल वरघट यांनी केले. उपस्थितांचे आभार नायब तहसिलदार विनोद हरणे यांनी मानले.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment