Posts

Showing posts from January, 2019

जलसंधारणाच्या कामांना गती द्या - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

वाशिम ,   दि .   ३१   :   राज्य शासन व भारतीय जैन संघटना अर्थात बीजेएसच्या यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात जलसंधारणाची कामे सुरु आहेत. याकामासाठी बीजेएसने २८ जेसीबी व  १३ पोकलॅन मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशीनद्वारे जिल्ह्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी या कामांना गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, कृषि सहसंचालक सुभाष नागरे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा, तालुका कृषि अधिकारी अभिजित देवगिरीकर, संतोष वाळके, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. श्री. सिंह म्हणाले, बीजेएसच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांवर संनियंत्रण ठेवणे, त्याचे मुल्यांकन करणे व त्या कामासाठी लावण्यात आलेल्या मशीनला इंधन पुरवठा करण्याची जबाबदार

महिला मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

Image
·         लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारीचा आढावा वाशिम ,   दि .   ३१   :   मतदार यादीनुसार जिल्ह्यातील ज्या मतदान केंद्राच्या क्षेत्रात स्त्री-पुरुष मतदारांचे गुणोत्तर हे जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत कमी आहे, अशा ठिकाणी स्वीप कार्यक्रम प्रभावीपणे राबवून पात्र महिला मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश हिंगे, प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, धनंजय गोगटे, अभिषेक देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पराजे, रमेश सोनुने यांची उपस्थिती होती. श्री. सिंह म्हणाले, महिला मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासोबतच जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरो

साखरा येथील आंतरराष्ट्रीय शाळेसाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         भूमीअधिग्रहण व सांस्कृतिक कार्यक्रम वाशिम , दि . २८ : साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या इमारत उभारणीसाठी तसेच शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा नियोजन व विकास समिती तसेच शासनामार्फत शाळेला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. २६ जानेवारी रोजी साखरा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या सांस्कृतिक व भूमीअधिग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री. तुमराव, सरपंच चंद्रकला इंगळे, उपसरपंच द्वारकाबाई राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय शाळेमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थांन

‘वाट समतेची...’ घडीपुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

Image
·         जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती वाशिम , दि . २६ : समाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी व त्यामाध्यमातून त्या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा, यासाठी वाशिम जिल्हा माहिती कार्यालयाने सन २०१८-१९ या वर्षात अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत तयार केलेल्या ‘वाट समतेची...’ या घडीपुस्तिकेचे विमोचन पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, प्रभारी पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माहिती सहाय्यक तानाजी घोलप उपस्थित होते. ‘वाट समतेची...’ या घडीपुस्तिकेमध्ये समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कन्यादान योजना, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रत

जिल्ह्याच्या विकासाचा आलेख उंचावण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री संजय राठोड

Image
वाशिम येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ·         पोलीस कवायत मैदान येथे मुख्य ध्वजारोहण वाशिम , दि . २६ : आकांक्षित जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची निवड झाल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचा आलेख वाढण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील आहे. जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमांतर ते बोलत होते. सर्वप्रथम त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, प्रभारी पोलीस अधीक्षक संजय डोईफोडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बनसोड, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखेडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायययोजना करा - दीपक कुमार मीना

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०१९ वाशिम , दि . २५ : आगामी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था उत्तम राखतांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात २५ जानेवारी रोजी निवडणूकीची पूर्व तयारी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतांना श्री. मीना बोलत होते. यावेळी प्रभारी पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. मीना म्हणाले , निवडणुकीच्या काळात गुन्हा करण्याचे कुणीही धाडस करणार नाही, यादृष्टीने पोलीसांनी कडक कारवाई करावी. निवडणुकीदरम्यान हिंसाचार घडवून आणणाऱ्या जबाबदार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करावी. जिल्ह्यातील संवेदनशिल आणि अतिसंवेदनशील मतदार केंद्र तसेच कमी मतदार झालेल्या मतदान केंद्रावर व महिला मतदारांनी कमी मतदान केलेल्या केंद्रावर पोलीस विभागाने विशेष लक्ष देण्याच्या सूचना श्री. मीना यांनी यावेळी दिल्या. ज्या मतदान केंद्रा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने रॅलीद्वारे मतदार जागृतीचा संदेश

Image
·          राष्ट्रीय मतदार जागृती दिवसानिमित्त आयोजन वाशिम , दि . २५ : राष्ट्रीय मतदार जागृती दिवसानिमित्त आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार कार्यालय येथून उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी तहसीलदार बळवंत अरखराव, नायब तहसीलदार दीपक दंडे, एल. आर. बनसोडे, साहेबराव नप्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार कार्यालय येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका, जिल्हाधिकारी कार्यालय व पुन्हा तहसीलदार कार्यालय येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये राजस्थान आर्य महाविद्यलय, बाकलीवाल कनिष्ठ महाविद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, रेखाताई राष्ट्रीय विद्यालय व शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होवून मतदार जागृती केली. अधिकारी, कर्मचारी यांना मतदार दिनाची शपथ राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी लोकशाही परंपरांचे जतन करण्याची व निःपक्षपात

दीपक कुमार मीना यांची वढवी गावाला भेट

Image
मुक्कामातून ग्रामस्थांशी संवाद वाशिम , दि . २४ : प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी नुकतीच कारंजा तालुक्यातील महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झालेल्या वढवी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तहसीलदार रणजीत भोसले, अभियानाचे जिल्हा समन्वयक वासू ढोणे, सरपंच, पोलीस पाटील यांच्यासह तालुका यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या नामफलकाचे उद्घाटन श्री. मीना यांनी केले. गावातील भजनी मंडळाने त्यांचे स्वागत केले. तसेच गावातील विद्यार्थ्यांनी यादिवशी गावफेरी काढली. यावेळी श्री. मीना यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून त्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केले. अभियानाच्या निर्देशांकानुसार गावात सुरु असलेल्या कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. तसेच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या लवकरच निकाली काढणार

राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रॅली

Image
वाशिम , दि . २४ : २४ जानेवारी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) नितीन मोहुर्ले, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा तायडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी रुपेश निमके, विस्तार अधिकारी मदन नायक, तुषार जाधव, मुख्य सेविका श्रीमती वाघ, श्रीमती कांबळे, डॉ. पी. एच. साबळे यांची उपस्थिती होती. ही रॅली नियोजन भवन येथून काढण्यात आली व जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये रिसोड आणि कारंजा तालुक्यातील २०० अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. बेटी बचाओ, बेटी पढाओ, मुलगा मुलगी-एक समान आदी घोषणा त्यांनी रॅलीदरम्यान दिल्या.

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप

Image
·         जनजागृती फेरीतून विद्युत सुरक्षेचा संदेश वाशिम , दि. १८ : उद्योग, उर्जा व कामगार विभागामार्फत ११ ते १७ जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या कालवधीत विद्युत निरीक्षण विभागाच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाने विविध उपक्रमांचे आयोजन करून तसेच शाळा, महाविद्यालये येथे कार्यक्रमांचे आयोजन करून विद्युत सुरक्षेविषयी जनजागृती केली. या सप्ताहाच्या समारोपानिमित्त १७ जानेवारी रोजी जनजागृती फेरीचे आयोजन करून याद्वारे वीज सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली. जनजागृती फेरीमध्ये वाशिम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी, वाशिम जिल्ह्यातील विद्युत कंत्राटदार व त्यांचे कामगार तसेच विद्युत निरीक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारीया व विद्युत निरीक्षक सारंग नाईक यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून जनजागृती फेरीची सुरुवात केली. विद्युत निरीक्षक कार्यालयापासून बस स्थानक, आंबेडकर चौक, पाटणी चौक, अकोला नाका येथून सुरक्षा संदेश देत परिक्रमण करून महावितरणच्या विद्युत

पोहरादेवी विकासाचे योग्य नियोजन करा - पालकमंत्री राठोड

Image
वाशिम , दि . १६ : देशातील लाखो बंजारा समाज बांधवांचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवीच्या विकासासाठी राज्य शासन १०० कोटी रुपये अतिरिक्त निधी देणार आहे. राष्ट्रीय स्तरावर या तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे, ही आपली भावना आहे. तेथे येणाऱ्या यात्रेकरूंच्या दृष्टीने सर्वसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या तीर्थक्षेत्राचा सर्वांग सुंदर असा विकास आराखडा तयार करतांना सूक्ष्म आणि योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पी. के. चव्हाण, कारंजा उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी मानोरा तहसीलदार सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती. श्री. राठोड म्हणाले की, विकास आराखडा तयार करतांना वाहन

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यंत्रणेने पुर्ण करावे - जिल्हाधिकारी मीना

Image
·         ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम वाशिम , दि . १६ : पर्यावरणाचे संतुलन राखण्यात वृक्षांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. बिघडलेल्या पर्यावरणावर मात करावयाची असेल तर वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत ज्या यंत्रणांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे ते त्यांनी पुर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेतांना श्री. मीना बोलत होते. सभेला उपवन संरक्षक सुमंत सोळंके , भारतीय पोलीस सेवेचे परिविक्षाधीन पोलीस अधिकारी पवन बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. मीना म्हणाले , जिल्ह्यात वनाच्छादीत भाग कमी आहे. वृक्ष लागवड मोहिमेमुळे वृक्षांची मोठया प्रमाणात लागवड करुन त्यांचे संवर्धन करता येईल. त्यामुळे मोठा भाग वृक्ष लागवडीखाली आणण्यास मदत होईल. यंत्रणांनी आपल्याला दिलेले उद्दिष्ट पुर्ण करतांना सुक्ष्म नियोजन करावे. असे त्यांनी सांगितले.             सन २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्हयाला

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे विमोचन

Image
वाशिम , दि . १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या जानेवारी महिन्यातील ‘खेलो इंडिया’ विशेषांकाचे विमोचन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जि. प. सदस्य विकास गवळी, दिलीप देशमुख, माजी जि. प. अध्यक्ष दिलीप जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची उपस्थिती होती. खेलो इंडिया युथ गेम्सनिमित्त हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला असून यामध्ये महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील क्रीडा संस्कृती, खेलो इंडियासाठी महाराष्ट्राने केलेली तयारी याची माहिती देण्यात आली आहे.   तसेच गेल्या वर्षीच्या खेलो इंडियातील महाराष्ट्राची कामगिरीचा आढावा, जगज्जेत्या क्रीडापटूंचे अनुभव, राज्य व केंद्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रासाठी असणाऱ्या विविध योजना आदी विविध विषयांचा समावेश या विशेषांकात आहे. खेळाडू, शिक्षक, पालक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी हा अंक उपयुक्त व प्रेरणादायी आहे. जिल्ह्यातील प्रमुख बुक स्ट

विद्युत निरीक्षण विभागामार्फत विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती

Image
वाशिम , दि . १६ : उद्योग , उर्जा व कामगार विभागामार्फत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील महावितरणच्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्रमधील कार्यरत यंत्रचालकांची विद्युत सुरक्षाविषयी कार्यशाळा १४ जानेवारी रोजी विद्युत भवनमध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये उपस्थित यंत्रचालकांना महापारेषणच्या चाचणी विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पी. एम. देशपांडे यांनी विद्युत सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उपस्थितांना ‘महावितरण’मार्फत विद्युत सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला विद्युत निरीक्षक सारंग नाईक , सहाय्यक विद्युत निरीक्षक अमृता फुलझेले, महावितरणचे कार्यकारी अभियंता पी. के. चव्हाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे वाशिम विद्युत निरीक्षक कार्यालयाकडून १४ जानेवारी रोजी शहरातील हैप्पी फेसीस स्कूलमध्ये विद्युत सुरक्षेबाबत विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्युत निरीक्षक सारंग नाईक व सहाय्यक विद्युत निरीक्षक अमृता फुलझेले यांनी विद्युत उपकरणे हाताळताना कोणती खबरदार

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विहित कालावधीत खर्च करा - पालकमंत्री संजय राठोड

Image
·         जिल्हा नियोजन समितीची सभा ·         सन २०१९-२० साठी १०२ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी ·         शिक्षण, आरोग्य सुविधांसाठी २५ कोटी ७१ लक्ष रुपये अतिरिक्त निधी वाशिम , दि . १६ : सन २०१८-१९ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित कालावधीत खर्च होणे आवश्यक आहे. त्याकरिता संबंधित शासकीय यंत्रणांनी काटेकोर नियोजन करून निधी खर्चाची कार्यवाही करावी. निधी अखर्चित ठेवणाऱ्या तसेच निधी समर्पित करणाऱ्या शासकीय यंत्रणांची गंभीर दखल घेवून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. नियोजन भवन सभागृहात आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषि व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ , सदस्य डॉ. किशोर मोघे, विकास गवळ