Posts

Showing posts from February, 2024

३ मार्च रोजी १ लक्ष २८ हजार बालकांना मिळणार 'दो बूंद जिंदकी के' र ाष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Image
३ मार्च रोजी १ लक्ष २८ हजार बालकांना मिळणार 'दो बूंद जिंदकी के' राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम  वाशिम, (जिमाका) संपुर्ण राज्यात दि.०३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १ टप्पा राबविण्यात येणार आहे. ०-५ वर्षाखालील बालकाचे लसीकरण करावयाचे आहे तसेच त्यानंतर दि. ०५ मार्च २०२४ पासुन बुथवरील ज्या बालकाचे लसीकरण झाले नाही अशा बालकांकरीता ग्रामिण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस घरोघरी जावुन जावुन सर्व्हेक्षण करून लसीकरण करण्यात येणार  आहे. सदर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेतंर्गत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस व मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वय समितीची सभा दि. ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आली व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येवून संबधित यंत्रणेने सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत . दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य संस्थेच्या वैद्यकिय अधिकारी याचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते. त्यामध्ये विभा

४ मार्च रोजी लोकशाही दिन

Image
४ मार्च रोजी लोकशाही दिन वाशिम, (जिमाका) : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मार्च महिन्यातील लोकशाही दिन ४ मार्च २०२४ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरीकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्ज जिल्हा/तालुका लोकशाही दिनामध्ये सादर केल्यानंतर विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह लोकशाही दिनामध्ये १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले आहे.

उष्मालाटेच्या पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी सज्ज राहावे*मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे*वाशिम येथे उष्मालाटबाबत एकदिवसीय कार्यशाळा

Image
*उष्मालाटेच्या पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी सज्ज राहावे* मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे वाशिम येथे उष्मलाटबाबत एकदिवसीय कार्यशाळा वाशिम (जिमाक) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. २७ फेब्रुवारी रोजी उष्मालाटबाबत एक दिवसीय कार्यशाळा वाकाटक सभागृह येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे हे होते. तर उद्घाटक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वि.घुगे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर, मालेगावचे तहसीलदार दिपक पुंडे, निवासी  वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग राठोड यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनवेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वि. घुगे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला राज्यस्तरावरील व्याख्याते म्हणून कार्यक्रम अधिकारी आरोग्य सेवा डॉ. योगश्री सोनवणे,  प्रादेशिक मौसम केंद्र भारतीय मौसम विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रविणकुमार, नागपूर जिपचे उप

महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रशिक्षणाकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन

Image
महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत प्रशिक्षणाकरीता अर्ज सादर करण्याचे आवाहन वाशिम,(जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावेत याकरिता सन २४-२५ या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत २०० प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चिखली रोड, वाशिम जिल्हा कार्यालयास सादर करावा. या योजनेस लागणारे कागदपत्रांमध्ये अर्जदाराचा जातीचा दाखला सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा. अर्जदाराचा ३ लक्ष रुपयांपर्यंत तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असावा. नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या प्रत, रेशनकार्डच्या झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, आधार लिंक मोबाईल क्रमांक, मतदान कार्ड, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, प्रशिक्षणार्थी मातंग समाजातील व तत्सम १२ पोटजातीतील असाव

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी १० मार्चपर्यंत अर्जाची मुदत

Image
संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी १० मार्चपर्यंत अर्जाची मुदत वाशिम, (जिमाका) : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा समावेश होतो.  या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित नागरीकांनी २९ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्याकरीता ऑनलाईन अर्ज करावे.या कालावधीत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.  विहीत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची संबंधित सेतू संचालकांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे तहसिलदार,वाशिम यांनी कळविले आहे. *******

जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत

Image
जिल्ह्यात ३ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत वाशिम, (जिमाका) : जिल्हा सत्र न्यायालय,वाशिम आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये ३ मार्च रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.           या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दाखलपुर्व व प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसूली प्रकरणे, कामगाराचे वाद,विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे (आपसात तडजोड करण्याजोगे प्रकरणे वगळून),आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे,मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद,भु-संपादन प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे,मनाई हुकुमाचे दावे,विशिष्ट पुर्वबंध कराराची पूर्तताविषयक वाद या प्रकरणांचा समावेश असणार आहे. ज्या पक्षकारांची वर नमुद प्रकारची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत,त्यांनी ३ मार्च रोजी आपली प्रकरणे आपसात करण्यासाठी या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभाग नोदविण्याकरीता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,वाशिम यांच्याशी संपर्क

वाशिमजवळील कोंडाळा येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन

Image
वाशिमजवळील कोंडाळा येथील रेल्वेच्या भुयारी पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन  वाशिम(जिमाका) : अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत देशातील ५५४ रेल्वे स्थानके आणि १५००  भुयारी पुलांचा पुनर्विकास करण्याच्या कामाचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानुषंगाने दक्षिण मध्य रेल्वेच्या वाशीम जवळील कोंडाळा येथील गेट क्रमांक १११ जवळील भुयारी पुलाच्या विकास कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले.  या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कोंडाळा येथील सरपंच शिल्पा वाठोरे, प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य नितेश मलिक, रेल्वे बोर्डाचे सदस्य महेंद्रसिंग गुलाटी, दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक श्यामलाल दसवाना, मुख्य वाणिज्य निरीक्षक कमलनयन मृणाल आदींची उपस्थिती होती.  या कार्यक्रमाअंतर्गत अमृत भारत स्टेशन योजनेवर आधारित आयोजित चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा आणि रांगो

आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार प ालकमंत्री, खासदार, आमदारांकडून श्रद्धांजली अर्पण

Image
आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पालकमंत्री, खासदार, आमदारांकडून श्रद्धांजली अर्पण वाशिम (जिमाका) : जिल्ह्यातील कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाशिम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आ.ॲड निलय नाईक, आ.संजय कुटे, आ.वसंत खंडेलवाल, आ. रणधीर सावरकर, आ.गजानन घुगे, आ.आकाश फुंडकर, आ.अमित झनक,आ.तानाजी मुटकुळे, आ.लखन मलिक यांनी आ. स्व.पाटणी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून पुष्पचक्र अर्पण केले व श्रद्धांजली वाहिली.तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी जिपचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी आमदार संजय देशमुख, गुलाबराव गावंडे, मोहिनीताई नाईक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे आदी उपस्थित होते. शोकभावना व्यक्त करतांना पालकमंत्री संजय राठोड

महिला बचत गटाच्या प्रदर्शनीचा समारोप

Image
महिला बचत गटाच्या प्रदर्शनीचा समारोप वाशिम (जिमाका) : मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला बालविकास विभागाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत लोकसंचालित साधन केंद्र वाशिम यांच्या महिला बचत गट निर्मित वस्तूंची नवतेजस्विनी प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन दि.२० ते २३ फेब्रुवारीपर्यंत विठ्ठलवाडी मंगल कार्यालय वाशिम येथे आयोजित करण्यात आले होते. आज या प्रदर्शनीचा समारोप करण्यात आला. या समारोपाला सहाय्यक सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी कल्पना लोहकपूरे तसेच आयसीआयसीआयचे विभागीय व्यवस्थापक सुहास बोबडे, मनीष गुल्हाने, रामेश्वर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.  विभागीय व्यवस्थापक सुहास बोबडे बोलताना म्हणाले की, मागील बारा वर्षांपासून सीएमआरसी व आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून बचत गटांना कर्जपुरवठा होत आहे. त्याची पूर्णपणे कर्ज परतफेड होत आहे. प्रती बचत गटांवा बँकेमार्फत २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जात आहेत. या कर्जामधून महिलांच्या उपजीविकेचे साधन उपलब्ध होत आहे. भरपूर महिला ह्या उद्योजक घडल्या आहेत. त्याच धर्तीवर आज महिलांना एमई लोनमार्फत

जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा यांना अभिवादन

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात  संत गाडगेबाबा यांना अभिवादन                                                         वाशिम, (जिमाका) अज्ञान,अंधश्रद्धा आणि स्वच्छता याबाबत जनजागृती निर्माण करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त आज २३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे व उपजिल्हाधिकारी कैलास देवरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,सहायक अधीक्षक सुनील घोडे, यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांनी सुध्दा संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. *****

एनएसएसच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे सात दिवसीय शिबिराचे आयोजन

Image
एनएसएसच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे सात दिवसीय शिबिराचे आयोजन वाशिम (जिमाका) : येथील राजस्थान महाविद्यालयाच्या वतीने सावरगाव बर्डे येथे राष्ट्रीय सेवा योजना सात दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये आपत्ती व्यवस्थापन आव्हाने व उपाययोजना याविषयावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पाटील तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत होते.प्रमुख अतिथी प्रा. डॉ. शैलेश सोनवने , प्रा. डॉ. धनविजय, प्रा. डॉ. स्वप्नील काळबांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी ताजने व आभार प्रदर्शन अश्विनी खिल्लारे यांनी केले. या कार्यक्रमाला एनएसएसचे विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. ०००

महिला बचत गट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनीला वाशिमकरांचा उत्सफूर्त प्रतिसादविविध वस्तू, मसाले विक्रीसाठी उपलब्ध ; ३० स्टॅाल्सची उभारणी

Image
महिला बचत गट निर्मित वस्तूंच्या प्रदर्शनीला वाशिमकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद विविध वस्तू, मसाले विक्रीसाठी उपलब्ध ; ३० स्टॅाल्सची उभारणी वाशिम (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत शहरातील विठ्ठलवाडी मंगल कार्यालय येथे आयोजित महिला बचत गट निर्मित वस्तूंची नवतेजस्विनी प्रदर्शनीला वाशिमकरांचा उत्स्फूर्त मिळत आहे. या प्रदर्शनीत महिला बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, मसाले, खाद्यपदार्थ, घरगुती उपयोगातील पदार्थ खरेदी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. त्यासाठी लोकसंचालित साधन केंद्राचे ३० स्टॅाल्स उभारण्यात आले आहेत.  या प्रदर्शनीला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देवून महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन माविमने केले आहे. ०००

महिला बचताच्या प्रदर्शनीला आमदार किरण सरनाईक यांची भेट

Image
महिला बचताच्या प्रदर्शनीला आमदार किरण सरनाईक यांची भेट वाशिम (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत शहरातील विठ्ठलवाडी मंगल कार्यालय येथे आयोजित महिला बचत गट निर्मित वस्तूंची नवतेजस्विनी प्रदर्शनीला अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांनी आज भेट दिली. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला बालविकास विभागाच्या महिला आर्थिक विकास महामंडळमार्फत लोकसंचालित साधन केंद्र वाशिम यांच्या अंतर्गत या प्रदर्शनीचे २३ फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या भेटीवेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे उपस्थित होते. आमदार किरण सरनाईक म्हणाले की, महिला ही संसाराचा गाडा वाहत असताना घराबाहेर पडून एक यशस्वी उद्योजिका होत आहे. माविम व सीएमआरसीच्या माध्यमातून महिलांना वेळोवेळी विविध प्रकारचे उद्योजकीय प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून त्यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याकरिता हक्काचे ठिकाण उपलब्ध होत आहे. तसेच विविध बँकेसोबत सामंजस्य करार करून तळागाळातील महिला उद्योग उभारणी करत आहे. महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असल्याचे त्यांनी

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्ततालोक अभिरक्षक कार्यालयातुन आरोपीला मिळाली होती मोफत विधी सेवा

Image
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता लोक अभिरक्षक कार्यालयातुन आरोपीला मिळाली होती मोफत विधी सेवा वाशिम (जिमाका): येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत लोक अभिरक्षक कार्यालयाकडुन मोफत विधी सेवा पुरविलेल्या आरोपी सुनिता संतोष कांबळे रा.हिंगणवाडी ता. कारंजा जि.वाशिम या तुरूंगबंदी आरोपीची जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगरूळपीर यांनी निर्दोष मुक्तता केली. दि. १६ जून २०२१ रोजी आरोपी सुनिता हिच्यावर तिचे पती संतोष कांबळे यांचा खुण केल्याचा गुन्हा पो.स्टे. धनज येथे अप.क. १२८/२१ कलम ३०२,२०१ नुसार दाखल झाला होता व आरोपी हिला अटक करून घटनेच्या दिवसापासुन ती अडीच वर्ष जिल्हा कारागृह वाशिम येथे तुरूंगबंदी म्हणुन होती. आरोपी सुनीता हिची आर्थिक परिस्थिती खाजगी वकील लावण्याची एैपत नव्हती त्यामुळे तीने जेल मधुन मोफत वकील मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा अंतर्गत असणाऱ्या लोक अभिरक्षक कार्यालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. लोक अभिरक्षक कार्यालया मार्फत मुख्य लोक अभिरक्षक अॅड. परमेश्वर शेळके यांनी सदर प्रकरण उप मुख्य लोकअभिरक्षक अॅड. वर्षा रामटेके यांना वर्ग केले. सदर प्रकरणात अॅड. रामटेके या

कारंजा येथे खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा संपन्नराष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम

Image
कारंजा येथे खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा संपन्न राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम वाशिम ,(जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा पंचायत समिती कारंजा येथे नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीचे अध्यक्ष वैभव वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस एस परभणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुईकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ किरण जाधव, इंडियन मेडिकल असोसिएशन व नीमा संघटना, कारंजाचे सर्व सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरुवात झाली.  यावेळी डॉ.सतीश परभणकर म्हणाले की, खाजगी डॉक्टरांकडे क्षयरुग्ण निदानाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांनी क्षयरुग्णांची माहिती शासकीय यंत्रनेला कळवणे बंधनकारक आहे. तसेच यांनी राष्टीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत

मानोरा येथे खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा संपन्नराष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम

Image
मानोरा येथे खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा संपन्न राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम वाशिम ,(जिमाका) : राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा पंचायत समिती मानोरा येथे नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेला नीमा संघटनेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीचे अध्यक्ष वैभव वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.एस एस परभणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रुईकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ नांदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेशचंद्र चापे, इंडियन मेडिकल असोसिएशन व नीमा संघटना, कारंजाचे सर्व सदस्य उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व डॉ.राबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरुवात झाली.  यावेळी डॉ.अनिल रुईकर म्हणाले की, खाजगी डॉक्टरांकडे क्षयरुग्ण निदानाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांनी क्षयरुग्णांची माहिती श

जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात ३ मार्च रोजी महा लोकअदालतीचे आयोजन

Image
जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयात ३ मार्च रोजी महा लोकअदालतीचे आयोजन वाशिम, (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये ३ मार्च २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.  पक्षकारांना होणाऱ्या कष्टासह त्यांचा वेळ व पैसा वाचवून जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडी मार्फत निकाली काढणे हे या लोकअदालतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सर्व पक्षकारांनी महा लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव‌ न्या.विजय टेकवाणी यांनी केले आहे. ०००

सामाजिक न्याय दिनी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

Image
सामाजिक न्याय दिनी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न वाशिम, (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम व जिल्हा विधिज्ञ संघ, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव‌ व्ही. ए. टेकवाणी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना सामाजिक न्याय दिनाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये सहा. लोक अभिरक्षक अॅड. अतुल पंचवाटकर यांनी सामाजिक न्याय दिवस या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड.  शुभांगी खडसे यांनी महिलांचे कायदे या विषयावर तर अॅड. हेमंत इंगोले यांनी आदिवासींच्या शेतजमीनीबाबत कायदे या विषयावर उपस्थितांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी, लोक अभिरक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.  आभार प्रांजय राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज कल्याण कार्यालय, वाशिम यांनी सहकार्य केले. ०००

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात ६ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

Image
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात ६ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश वाशिम,(जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे यासाठी ६ मार्चपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जारी केले आहे. जिल्ह्यात आजपासून इयत्ता १२ वीची परीक्षा सुरु झाली आहे. दि.२४ फेब्रुवारी रोजी श्री अवलिया महाराज संस्थान काळामाथा ता. मालेगाव येथे मुख्य यात्रा, दि.२५ फेब्रुवारी रोजी श्री बिरबलनाथ महाराज मंगरुळपीर येथे मुख्य यात्रा, दि.३ मार्च रोजी‌ श्री गजानन महाराज प्रगटदिन उत्सव संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात येणार आहे.  सद्यस्थितीत राज्यात व जिल्हयात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, राज्य कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करणे व इतर मागणी संदर्भात विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच विविध पक्ष,संघटना ,सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या  मागण्यासाठी धरणे आंदोलने,उपोषणे करण्यात येत आहेत. जिल्हा हा सण-उत्सवाचे दृष्टीने तसेच राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे.

अनाथ बालकांसाठी पंधरवाड्याचे आयोजन

Image
अनाथ बालकांसाठी पंधरवाड्याचे आयोजन वाशिम,(जिमाका) : अनाथ मुलांना आधार कार्ड, राशन कार्ड, जातीचे दाखला, महाराष्ट्र राज्याचे अधिवास व राष्ट्रीय प्रमाणपत्र, डोमीशीयल व नॅशनलिटी, मतदान कार्ड, ई. उपलब्ध करून देण्याकरीता २३ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीमध्ये शासन आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनाथ बालकांनी सेवा योजनाचा लाभ घेण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कक्ष क्र.२०४ जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका हरिश्चंद्र गवळी यांनी केले आहे. ०००

१० वी, १२ वी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम १४४ लागू

Image
१० वी, १२ वी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम १४४ लागू        वाशिम, दि. २० (जिमाका) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावी परिक्षा संपेपर्यंत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कलम १४४ लागु करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी जारी केले आहे. इयत्ता १२ वी ची परीक्षा ही २१ फेब्रुवारी ते २३ मार्चपर्यंत आणि इयत्ता १० वी ची १ मार्च ते २६ मार्चपर्यंत घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या कालावधीत असामाजिक प्रवृत्तीच्या समुदायाकडून गर्दी होऊन गोंधळ व गैरप्रकार करण्याची शक्यता असल्याने, या परीक्षा केंद्राभोवती कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने परीक्षा कालावधीत परीक्षा संपेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या ठिकाणी २०० मीटरच्या परीक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी लागू केले आहे.           हे आदेश लागु केल्यामुळे अनेक बाबींना मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा उपकेंद्रावर ओळख पत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही. परीक्

सेवा सोसायट्यांनी कामवाटपाचे प्रस्ताव २७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन

Image
सेवा सोसायट्यांनी कामवाटपाचे प्रस्ताव २७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन        वाशिम, (जिमाका) : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायट्यांना काम वाटप करण्याच्या दृष्टीने २७ फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे. काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगाराच्या सेवा सोसायट्यांना कंत्राटी तत्वावर काम वाटप करण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्हा क्रीडा संकुल समिती येथील व्यवस्थापक १ पद व लिपिक १ पद ही पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहे.          जिल्ह्यातील इच्छुक व पात्र आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायट्यांनी विहीत अटी व शर्तीच्या अधिन राहून सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, खोली क्र. ११, काटा रोड वाशिम येथे २७ फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह प

महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*

Image
*महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन* वाशिम,(जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. या योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव ॲानलाईन सादर करण्याचे आवाहन करणअयात आले आहे. या महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी एनएसएफडीसी अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना सुरु झालेल्या आहेत.  यात सुविधा कर्ज योजना, महिला समृध्दी योजना व शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव ॲानलाईन सादर करावे लागणार आहे. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना https://beta.slasdc/org या वेबसाईटवर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर त्यांच्या तीन प्रती मुळ कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चिखली रोड, वाशिम जिल्हा कार्यालयास सादर कराव्यात.  हे कर्ज प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम तारीख ११ मार्चपर्यंत आहे. या योजनेस लागणारे कागदपत्रांमध्

बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादनाचा ब्रँड तयार करावा- शंकर कोकडवार

Image
बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादनाचा ब्रँड तयार करावा - शंकर कोकडवार > माविमतर्फे महिला बचत गट निर्मित वस्तूंच्या तालुकास्तरीय प्रदर्शनीचे उद्घाटन > २३ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन वाशिम (जिमाका) : बचत गटातील महिलांनी आपल्या उत्पादनाचा ब्रँड तयार करावा, असे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक शंकर कोकडवार यांनी आज येथे केले.  मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानांतर्गत महिला बालविकास विभागाच्या महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत लोकसंचालित साधन केंद्र वाशिम यांच्या अंतर्गत महिला बचत गट निर्मित वस्तूंची नवतेजस्विनी प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन २० ते २३ फेब्रुवारीपर्यंत विठ्ठलवाडी मंगल कार्यालय वाशिम येथे करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन शंकर कोकडवार यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रियंका गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय खंबायत तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे उपस्थि

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे ॲागस्टपर्यंत पूर्ण करा- पालकमंत्री संजय राठोड

Image
*तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे ॲागस्टपर्यंत पूर्ण करा* - पालकमंत्री संजय राठोड > पोहरादेवी व उमरी येथील विकासकामांचा आढावा > मंत्री, खासदारांकडून कामाचे कौतुक > नंगारा भवन बांधकामाचे ८० टक्के काम पूर्ण वाशिम (जिमाका) : श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील श्री संत सेवालाल महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि उमरी व पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे ॲागस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज प्रशासनाला दिले.  तीर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी येथे सुरु असलेल्या शासनाच्या विविध विकासकामांसंदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी नंगारा भवनातील सभागृहात आढावा घेतला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, खासदार डॅा.श्रीकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तीर्थक्षेत्र पोहर