उष्मालाटेच्या पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी सज्ज राहावे*मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे*वाशिम येथे उष्मालाटबाबत एकदिवसीय कार्यशाळा

*उष्मालाटेच्या पूर्व तयारीसाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी सज्ज राहावे*

मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे

वाशिम येथे उष्मलाटबाबत एकदिवसीय कार्यशाळा

वाशिम (जिमाक) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने दि. २७ फेब्रुवारी रोजी उष्मालाटबाबत एक दिवसीय कार्यशाळा वाकाटक सभागृह येथे आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे हे होते.
तर उद्घाटक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वि.घुगे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, वाशिमचे तहसीलदार निलेश पळसकर, मालेगावचे तहसीलदार दिपक पुंडे, निवासी  वैद्यकीय अधिकारी डॉ. पराग राठोड यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनवेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ वि. घुगे यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेला राज्यस्तरावरील व्याख्याते म्हणून कार्यक्रम अधिकारी आरोग्य सेवा डॉ. योगश्री सोनवणे,  प्रादेशिक मौसम केंद्र भारतीय मौसम विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रविणकुमार, नागपूर जिपचे उप अभियंता निलेश मानकर यांची उपस्थिती होती.

कार्यशाळेमध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी सांगितले की, उष्मालाटेपासून बचाव करण्यासाठी संबधित विभागांनी पूर्व तयारी करावी. आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व रूग्णालयामध्ये कुल वॉर्ड तयार करावे. उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. याबाबत सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे.

या कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो कैलास देवरे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्री भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल कावरखे यांनी भेटी दिल्यात.

व्याख्याते डॉ. योगश्री सोनवणे यांनी उष्णतेच्या लाटेची पूर्वतयारी कशी करावी या संबंधित मार्गदर्शन केले. तसेच, उष्णतेशी संबंधित आजारांचे होणारे सर्वेक्षण, घ्यावयाची काळजी, सामान्य प्रथमोपचार, पर्यावरणपूरक हरित आणि पायाभूत सुविधा पोहचविण्याबाबत व उन्हाळ्यात अन्ना संबंधित घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. प्रविकुमार यांनी उष्णतेच्या लाटे संदर्भातील व्याख्या, परिभाषा, पूर्व सूचना निकष, पूर्व सूचना प्रणाली आणि २०२४ पूर्व तयारी, पूर्वानुमान याबाबत विस्तृत व सखोल मार्गदर्शन केले.

तसेच निलेश मानकर यांनी मार्गदर्शन करतांना उष्मालाटेच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण केलेल्या कामाचे सादरीकरण, पाऊस, पाणी, पुनर्भरण, इमारती व रस्त्याचे तापमान कमी करण्याकरिता केलेल्या उपाययोजनांबाबत व ग्रीन प्रोजेक्टबाबत माहिती दिली.

जिल्ह्यात ग्रीन प्रोजेक्ट प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
या कार्यशाळेत सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून श्याम सवाई, सर्वधर्म आपत्कालीन संस्था, कारंजा, दिपक सदाफळे संत गाडगे बाबा शोध व बचाव पथक पिंजर, ता. बार्शटाकळी यांनी सामाजिक संस्थांची भूमिका विशद केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.
या कार्यशाळेला महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, ग्राम विकास विभाग, बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, मृद व जलसंधारण विभाग, नगर परिषद व इतर विभागतील तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस अधिकारी, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, उप अभियंता अधिकारी व कर्मचारी,र एन. सी. सी. अधिकारी व विद्यार्थी, सर्वधर्म आपत्कालीन संस्था कारंजा, संत गाडगेबाबा शोध व बचाव पथक पिंजर, छत्रपती तरुण मित्र मंडळ वाशिम, श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय आपत्कालीन शोध व बचाव पथक वनोजा ता. मंगरूळपीर  यांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, सहाय्यक अधीक्षक अनिल घोडे, महसूल सहाय्यक विनोद मारवाडी, श्रीकांत वडोदे, अ.का. मारोती खंडारे, गजानन मेसरे, अमोल काळे एनसीसी अधिकारी, इंजी.किरण सोळंके, तौकिर बेनीवाले आय.टी.असिस्टंट, मुकुंदा कांबळे, क्रिश बंगारे, कैलास कांगटे शिपाई यांनी परिश्रम घेतले.
०००

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश