Posts

Showing posts from November, 2023

मतदार यादी निरीक्षकांची राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठक

Image
मतदार यादी निरीक्षकांची  राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांसोबत बैठक  वाशिम दि.३०(जिमाका) मतदार यादी निरीक्षक तथा अमरावती विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी आज ३० नोव्हेंबर रोजी नियोजन भवनातील सभागृहात राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्याम बढे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुधीर कवर,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानजोडे,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनीष डांगे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे गट) जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.  डॉ.श्रीमती पाण्डेय म्हणाल्या,मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.त्यामध्ये मतदाराच्या नावाचा समावेश करायचा असेल किंवा नाव वगळायचे असेल त्यासाठी

जिल्हा युवा महोत्सवाचे थाटात उदघाटन• पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार• स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव• विविध विभागाचे स्टॉल

Image
जिल्हा युवा महोत्सवाचे थाटात उदघाटन • पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार • स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव • विविध विभागाचे स्टॉल वाशिम, दि. 29 (जिमाका) पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,  वाशिम यांच्या संयुक्त वतीने आज 29 नोव्हेंबर रोजी जिल्हा युवा महोत्सवाचे उदघाटन वाटाणे लॉन येथे थाटात करण्यात आले.जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी फित कापुन या महोत्सवाचे उदघाटन केले.यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,आमखेडा येथील कृषी महाविद्यालयाचे संचालक राजू घुगे व तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विविध विभागाने तसेच उद्योजकांनी लावलेल्या स्टॉलची पाहणी केली.य

१९ डिसेंबरपर्यंत जनावरांचे वंध्यत्व निवारण अभियान

Image
१९ डिसेंबरपर्यंत जनावरांचे वंध्यत्व निवारण अभियान वाशिम,दि.२९ (जिमाका) शेतकरी पशुपालक यांचेकडील गाई म्हशींमध्ये असलेल्या/उदभवलेल्या वंध्यत्वाचे निवारण करण्यासाठी १९ डिसेंबरपर्यंत राज्यव्यापी वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे.               या अनुषंगाने जिल्हयामध्ये एकुण ६२ पशुवैद्यकीय संस्थेअंतर्गत एकुण ६७६ गावामध्ये वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यासाठी व्यापक प्रसिध्दी देण्यात आली आहे. गावपातळीवर दवंडी देणे,पत्रके वाटप करणे,पोस्टर्स लावणे ग्रामसभेचे आयोजन करणे,म्हशीचे प्रजनन, कृत्रिम रेतन,गर्भतपासणी,वंध्यत्व निवारण,वैरण विकास कार्यक्रम व पशुस्वास्थ याबाबतची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी.           ३० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक गावात तज्ञांमार्फत गाई व म्हशींची वंध्यत्व निवारण करण्यासाठी परिक्षा करण्यात येईल. व उपचार करुन मार्गदर्शन करण्यात येईल.असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.अरुण यादगीरे यांनी कळविले आहे.

१ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त वाशिम शहरात रॅलीचे आयोजन

Image
१ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त वाशिम शहरात रॅलीचे आयोजन वाशिम,दि.२९ (जिमाका) महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने *"आता नेतृत्व व आघाडी समुदायांची वाटचाल एड्स संपविण्याचा  दिशेने"* हे यावर्षीचे घोषवाक्य आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.         या रॅलीच्या माध्यमातून वाशिम शहरातून एचआयव्ही /एड्स या विषयावर माहिती देऊन तसेच जनजागरण गीते व पथनाट्याच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येणार आहे.                   रॅलीची सूरूवात जिल्हा रुग्णालयातून होणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती.बुवनेश्वरी एस.  ह्या रॅलीला हिरवी झेंडी दाखविणार आहे.तसेच विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थितीसह  महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे.              या रॅलीला जास्तीत जास्त महाविद्यालय,सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना तथा राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा शल्यचिक

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या योजनेमुळे दीड वर्षात दिवसा वीज पुरवठा स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती

Image
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या योजनेमुळे दीड वर्षात दिवसा वीज पुरवठा स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची माहिती वाशिम,दि.२९ (जिमाका) उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी १७५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे टेंडर प्रसिद्ध झाले असून सुमारे अठरा महिन्यात त्याचे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ९२ टक्के शेतकऱ्यांना दिवसा नियमित वीज पुरवठा होईल, अशी माहिती एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी आज २९ नोव्हेंबर रोजी  वाशिम येथे दिली. नियोजन भवनात महावितरण, महापारेषण,महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभागाच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक  आशिष चंदाराणा आणि महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यावेळी उपस्थित होते. श्री.पाठक पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना सध्या सिंचनासाठी दिवसा आणि रात्री पाणीपुरवठा होतो. परंतु केवळ दिवसा नियमित पाणीपुरवठा करावा,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.त्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवे

9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे महारोजगार मेळावा

Image
9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे महारोजगार मेळावा वाशिम,दि.28 (जिमाका) तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत लाखो तरुणांना रोजगार प्राप्त करुन देण्याचे काम शासनाच्या कोशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यामातून केले जात आहे.  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्देशाप्रमाणे ९ व १० डिसेंबर २०२३ रोजी दोन दिवशीय नमो राज्यस्तरीय महारोजगार मेळावा नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्यभरातून विविध क्षेत्रातील किमान एक हजार कंपन्या या महारोजगार मेळाव्यात प्राधान्याने सहभागी होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील ज्या कंपनी/ उद्योजक/ आस्थापनांकडे कुशल मनुष्यबळाची गरज असेल, अशा सर्व आस्थापनांनी या महारोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आस्थापनेवर असणाऱ्या रिक्तपदांबाबतची माहिती  www.rojgar.mahaswayarm.gov.in या  वेबपोर्टलवर ऑनलाईन नोंदवावी. जेणेकरून आस्थापना व कंपन्यांना आवश्यक असणाऱ

रिसोडची विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल : अनधिकृत शाळा अधिकृत शाळेतच प्रवेश घ्यावा

Image
रिसोडची विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल : अनधिकृत शाळा अधिकृत शाळेतच प्रवेश घ्यावा वाशिम,दि.28 (जिमाका) रिसोड येथील मालेगांव रोडवरील विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल या शाळेला शासनाची मान्यता नसतानाही ही शाळा अनधिकृतपणे सुरु असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहे.या शाळेला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देवून तपासणी केली.या शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग शासनाची मान्यता नसताना देखील चालविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.हे वर्ग बंद करुन शाळेचे फलक काढून घेण्यास संबंधित संस्थेला नोटीस बजावण्यात आली.परंतू या संस्थेने इयत्ता 1 ली व वरील वर्ग चालविणे सुरुच ठेवल्यामुळे या संस्थेविरुध्द पोलीस स्टेशन शहर, रिसोड येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  सर्व विद्यार्थी, पालक व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,विश्वा इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल,रिसोड या शाळेला इयत्ता 1 ली ते 12 पर्यंतचे वर्ग सुरु करण्याबाबत शासनाची मान्यता नाही.या संस्थेने सदर वर्ग अनधिकृतपणे सुरु केले होते.तथापी आता याठिकाणी शिकवणी वर्गाचे फलक लागलेले आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थी,पालक व न

30 नोव्हेंबरपर्यंत जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे

Image
30 नोव्हेंबरपर्यंत जमातीच्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे वाशिम,दि.28 (जिमाका) अनुसूचित जमातीच्या इयत्ता 11 वी व 12 वीत शिक्षण घेत असलेल्या व पुढे व्यावसायीक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने समितीला 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावे.वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अचूक अर्ज ई-मेल आयडी,भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) नमूद करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, यवतमाळचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष यांनी केले आहे.                     *******

२६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा

Image
२६ नोव्हेंबर संविधान दिन  उत्साहात साजरा वाशिम दि.२६ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,वाशिम आणि सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, वाशिम,यांचे संयुक्त वतीने आज २६ नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.       भारतीय संविधानाबाबत जनजागृती  अणि सर्व नागरीकाना संविधानाची ओळख व्हावी याकरीता २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.     यानिमित्ताने प्रभातफेरी काढण्यात आली.यामध्ये होमगार्ड,मागासवर्गीय मुला/मुलीचे शासकीय वसतिगृह वाशिम,नर्सिग कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थीनी व अन्य मान्यवरांनी सहभागी होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास हार अर्पण करून  अभिवादन केले.यावेळी संविधान दिनानिमित्त भारताचे संविधान उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.   संविधान दिनानिमित्त काढण्यात आलेल्या प्रभातफेरीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर.पी पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व्ही.ए.टेकवाणी,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ व सामाजिक कार्यकर्ते

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने संविधान दिन साजरा

Image
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने संविधान दिन साजरा वाशिम दि.२६ (जिमाका) भारतीय संविधान दिनानिमित्त आज २६ नोव्हेंबर रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून रैलीची सुरुवात करून पाटणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असे वाशिम शहरामध्ये रैलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशआर.पी.पांडे यांनी रैलीला हिरवी झेंडी दाखवून रैलीचे उद्घाटन केले.       या कार्यक्रमाला व्हि.ए.टेकवानी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, न्यायिक अधिकारी,विधीज्ञ संघाचे अध्यक्ष,सदस्य विधीज्ञ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथील कर्मचारी,   न्यायालयीन कर्मचारी,विधी स्वयंसेवक,पोलीस कर्मचारी, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग - समाज कल्याण कार्यालय येथील अधिकारी, कर्मचारी,नेहरू युवा बहुद्देशीय मंडळ व नेहरू युवा केंद्र वाशिम,नर्सिंग कॉलेज,मातोश्री गोटे महाविद्यालय,येथील विद्यार्थी, शिक्षक वृंद,रासेयो पथक,हाँमगार्ड कार्यालयातील अधिकारी,

२६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

Image
२६ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त  कार्यक्रमाचे आयोजन  वाशिम,दि.२५ (जिमाका)  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे. भारताचे एक सार्वभौम,समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरीकास सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय,विचार अभिव्यक्ती,विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य व समानता प्राप्त करुन देण्याच्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताची स्वतंत्र राज्यघटना अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करण्यात आली.राज्यघटना ही २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आली.संविधानामुळे शासकीय व न्यायीक इत्यादी सारख्या यंत्रणा निर्माण झाल्या.त्या संविधानाची ओळख सर्वांना करुन देण्याच्या अनुषंगाने यावर्षी सुध्दा २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे.अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.        त्या अनुषंगाने २६ नोव्हेंबर रोजी सर्व  शासकीय व निमशासकीय कार्यालये,जिल्हा परिषद,पंचायत समित्या,नगरपालिका,ग्रामपंचायती, जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा, महा

२९ नोव्हेंबर रोजी उपयोगी वस्तुंचे विक्री व प्रदर्शन*लाभ घेण्याचे क्रीडा व कृषी विभागाचे आवाहन

Image
*२९ नोव्हेंबर रोजी उपयोगी वस्तुंचे विक्री व प्रदर्शन* लाभ घेण्याचे क्रीडा व कृषी विभागाचे आवाहन वाशिम,दि.२४ (जिमाका) जिल्हा क्रीडा परिषद वाशिम,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने  २८ व २९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा व कृषी विभागामार्फत २९ नोव्हेंबर रोजी भव्य सांस्कृतीक युवा महोत्सवाचे वाटाणे लॉन व क्रीडा संकुल वाशिम येथे आयोजन करण्यात येणार आहे.युवकांच्या सुप्त गुणांना चालना मिळण्याकरीता सांस्कृतीक युवा महोत्सवाअंतर्गत वाटाणे लॉन येथे २९ नोव्हेंबर २०२३ रोजी लोकगीत (सहभागी संख्या १०), लोकनृत्य (सहभागी संख्या १०), वैयक्तिक सोलो लोकगीत (सहभाग संख्या ५),वैयक्तिक सोलो लोकनृत्य (सहभागी संख्या ५),वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी),संकल्पनेवर आधारीत स्पर्धा (नाटय/ पथनाट्य, एकांकीका) युवाकृती (हस्तकला, वस्त्रोद्योग व अग्रो प्रोडक्ट) हया स्पर्धा होतील.  २८ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे फोटोग्राफी कथालेखन (भाषा:- मराठी, हिंदी व इंग्रजी, १००० शब्दात),पोस्टर स्प

शिष्यवृत्ती अर्ज : महाडीबीटी पोर्टलवर सादर करासमाज कल्याण विभागाचे आवाहन

Image
शिष्यवृत्ती अर्ज : महाडीबीटी पोर्टलवर सादर करा समाज कल्याण विभागाचे आवाहन वाशिम,दि.२३ (जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जात,इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने,राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती,व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ति योजना,व्यावसायीक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्याना विद्यावेतन या विविध योजना राबविण्यात येतात.                      सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 11 ऑक्टोबर 2023 पासून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून पोर्टल कार्यान्वीत करण्यात आले आहे.2022-23 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाचे व नुतनिकरणाचे अर्ज महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन (रिप्लाय) भरण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे.          तरी महाविद्यालय,विद्यार्थी व पालकांनी अनुसूचित जाती,इतर मागास वर्ग,विशेष मागासवर्ग व

विकसित भारत संकल्प यात्रा

Image
*विकसित भारत संकल्प यात्रा*   कार्यक्रमाचे आयोजन आज मालेगाव तालुक्यातील मौजे उडी ग्रामपंचायत येथे करण्यात आले.यावेळी गावचे सरपंच,विस्तार अधिकारी (आरोग्य ), कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच,ग्रामस्थ तसेच शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना माती परीक्षण,एकात्मिक शेती पद्धती, नैसर्गिक शेती पद्धती,नवीन वाणाचा वापर याबाबत माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले.

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

Image
सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले  वाशिम,दि.२३ (जिमाका) राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायटींना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप करण्यात येते.                 जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाला कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ पुरविण्याची मागणी आली आहे.प्राचार्य,शासकीय तंत्रनिकेतन वाशिम तथा सदस्य सचिव अल्पसंख्यांक वसतिगृह व्यवस्थापन समिती येथील सफाई कामगार १, सफाईगार महिला २, सुरक्षा रक्षक महिला गार्ड २ पदे,दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर मंगरूळपीर येथील सफाईगार १ पद,दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर मानोरा येथील सफाईगार १ पद, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगरूळपीर येथील सफाईगार १ पद, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा मंगरूळपीर येथील सफाईगार १ पद  व अशा विविध कंत्राटी प्रकारची पदे भरण्यासाठी मागणी प्राप्त झाली आहे.  जिल्ह्यातील

*जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मानित*अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

Image
*जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मानित* अधिकारी - कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन वाशिम,दि.२३ (जिमाका) जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांना राज्य शासनाचा बालस्नेही पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन आज २३ नोव्हेंबर रोजी राजे वाकाटक सभागृहात करून अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन श्रीमती बुवनेश्वरी यांचे अभिनंदन करण्यात आले.           राज्यातील बालकांचा सर्वांगीण विकास व बाल हक्क संरक्षण,सुरक्षा आणि आरोग्य इत्यादि महत्वपूर्ण विषयावर प्रशासकीय यंत्रणा म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महिला व बाल विकास विभाग,बाल हक्क संरक्षण आयोग,सी.सी.डी.टी.संस्था व युनिसेफ यांच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शहा यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांना राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.           जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्या सत्कार पर अ

विकसित भारत संकल्प यात्रा : जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ : बसस्थानक परिसरातून यात्रेला सुरूवात

Image
विकसित भारत संकल्प यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ बसस्थानक परिसरातून यात्रेला सुरूवात  वाशिम,दि २३ (जिमाका)" विकसित भारत संकल्प यात्रा " या मोहिमेचा शुभारंभ आज २३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आला.निवासी उपजिल्हाधिकारी  विश्वनाथ घुगे,नगरपालीका प्रशासन अधिकारी पंकज सोनवणे,वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड,आकाशवाणीचे नोडल अधिकारी गजानन माळेकर, आकाशवाणी जिल्हा प्रतिनिधी सुनील कांबळे,दूरदर्शनचे जिल्हा प्रतिनिधी राम धनगर,महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.रणजित सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.           श्री.घुगे यांच्या हस्ते एल.ई.डी फिरत्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.                 विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी श्री.घुगे म्हणाले की,प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात नागरिकांना व लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्यासाठी व पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना या सं

अन्नधान्य,कडधान्य व गळीत धान्य पिक स्पर्धा : रब्बी हंगाम २०२३..३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

Image
अन्नधान्य,कडधान्य व गळीत धान्य पिक स्पर्धा : रब्बी हंगाम २०२३ ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले  वाशिम,दि.२२ (जिमाका) राज्यात पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते.अशा प्रयोगशील शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती व मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल.तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल.हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.          वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धामध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम २०२३ पासून पिक स्पर्धा तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे.त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आद

राज्यसेवा गट क परिक्षा परीक्षा केंद्रावर २४ नोव्हेंबरला मनाई आदेश

Image
राज्यसेवा गट क परिक्षा  परीक्षा केंद्रावर २४ नोव्हेंबरला मनाई आदेश  वाशिम,दि.२२ (जिमाका) महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परिक्षा-२०२३ च्या विविध संवर्गाची ऑनलाईन परीक्षा वाशिम शहरातील  डिजीटल परीक्षा परिसर,गुलाटी टॉवर,शासकीय तंत्रनिकेतन समोर, लाखाळा,रिसोड रोड,वाशिम या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर १०० मीटरच्या परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच परीक्षेसंबंधीचे गैरप्रकार घडु नये म्हणुन फौजदारी दंड प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ लागु करणेबाबत  जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस‌. यांनी अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परिक्षा-२०२३ अनुषंगाने २४ नोव्हेंबर  रोजी परीक्षा केंद्राच्या १०० मिटरचे परिक्षेत्रामध्ये कलम १४४ लागू करून मनाई आदेश पारीत केले आहे. त्यामुळे पुढील बाबीस मनाई करण्यात येत आहे.      परीक्षा केंद्रावर ओळखपत्राशिवाय प्रवेश मिळणार नाही.परीक्षा केंद्राचे १०० मिटर परीक्षेत्रात आयोगाकडून

जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना लवकर सुविधा उपलब्ध होणार.. संकुल समितीने निविदा मागविल्या ..जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची माहिती

Image
जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना लवकर सुविधा उपलब्ध होणार संकुल समितीने निविदा मागविल्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची माहिती वाशिम,दि.२२ (जिमाका) जिल्हा क्रीडा संकुलात सन २००४ मध्ये ४०० मीटर धावणमार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.मागील १८ वर्षांपासून या धावन मार्गाची कोणत्याही प्रकारची दूरूस्ती करण्यात आलेली नाही.या धावन मार्गावर सतत धावणे व चालणे केल्यामुळे त्यावरील मुरूम व मातीचे रूपांतर धुळीमध्ये झालेले आहे.यात सुधारणा करण्याकरिता जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे १८ मार्च २०२१ च्या पत्रानुसार प्रस्ताव सादर केला होता.त्यास मंजूरी प्राप्त होऊन सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांनी अंदाजपत्रक व आराखडे तयार करून त्यामध्ये ४०० मीटर धावणमार्ग दुरुस्ती व गटार बंदीस्त करणे हे काम देण्यात आले आहे.      जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या २६ जानेवारी २०२१ च्या सभेमध्ये ठरल्यानुसार अंदाजपत्रकीय रक्कम ४ लक्ष ५७  हजारच्या ५० टक्के रक्कम २ लक्ष २९ हजार रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिम यांना वर्ग करण्यात आले. त्यांच्याकडून ४०० मीटर धावणमार्ग दुरुस्ती व गटार बंदीस्त करणे हे काम करण्यात आले. परंतु

महारेशीम अभियानाचा वाशिम येथून शुभारंभ

Image
महारेशीम अभियानाचा वाशिम येथून  शुभारंभ वाशिम,दि.२२ (जिमाका) महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८ नुसार रेशीम शेती व त्या आधारीत पुरक उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.रेशीम शेती व उद्योग विकास प्रचार प्रसिद्धी योजनेला मान्यता शासनाने दिलेली आहे.राज्यात महारेशीम अभियान राबविण्यासाठी शासन निर्णय १० नोव्हेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.या महारेशीम अभियान २०२४ अंतर्गत रेशीम रथ तयार करुन गावो गावी रेशीम शेतीबद्दल प्रचार प्रसिद्धी करण्यात येणार आहे.२० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत रेशीम उद्योग योजना राबविण्यासाठी नोंदणी करण्यात येणार आहे.          महारेशीम अभियान २०२४ रेशीम रथाचे उद्घाटन आज दिनांक २२ नोव्हेंबर रोजी अमरावती विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांचे शुभहस्ते रेशीम रथाला हिरवा झेंडी दाखवुन करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच नायब तहसीलदार श्रीमती पुरोहित तसेच रोहयो विभागातील सर्व कर्मचारी उपस्थीत होते.           महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योज

९ डिसेंबर रोजी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत

Image
९ डिसेंबर रोजी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत वाशिम,दि.२१ (जिमाका) ९ डिसेंबर रोजी जिल्हा सत्र न्यायालय,वाशिम आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.           या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दाखलपुर्व व प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसूली प्रकरणे, कामगाराचे वाद,विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे (आपसात तडजोड करण्याजोगे प्रकरणे वगळून),आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे,मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद,भु-संपादन प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे,मनाई हुकुमाचे दावे,विशिष्ट पुर्वबंध कराराची पूर्तताविषयक वाद या प्रकरणांचा समावेश असणार आहे.                  ज्या पक्षकारांची वर नमुद प्रकारची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत,त्यांनी ९ डिसेंबर रोजी आपली प्रकरणे आपसात करण्यासाठी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोदविण्याकरीता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेव

आधारभूत किंमत खरेदी योजना ऑनलाईन नोंदणी सुरू हमीभावाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Image
आधारभूत किंमत खरेदी योजना ऑनलाईन नोंदणी सुरू हमीभावाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन वाशिम,दि.२१ (जिमाका) केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने शेतकऱ्यांची ज्वारी,बाजरी व मका या पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता जिल्ह्यातील वाशिम, मानोरा,कारंजा,मालेगाव,मंगरूळपीर व रिसोड येथील खरेदी केंद्रावर ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.             शासनाने जाहीर केलेल्या ज्वारी,बाजरी व मका या पिकांचा हमीभाव पुढीलप्रमाणे आहे.ज्वारी हायब्रीड ३१८० रुपये प्रतिक्विंटल, ज्वारी मालदांडी ३२२५ रुपये,मका २०९० रुपये,बाजरी २५०० रूपये असा हमीभाव प्रति क्विंटल याप्रमाणे आहे.               शासनाने भरड धान्याचे हमीभावानुसार शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी पोर्टलवर करण्याकरिता शेतकऱ्यांचा सातबारा ज्वारी,मका व बाजरीची नोंद असलेला सातबारा,आधार लिंक असलेल्या बँकेचे खाते क्रमांक व आधारकार्डची झेरॉक्स,मोबाईल नंबर तसेच ऑनलाइन नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांचा स्वतःचा फोटो घेणे बंधनकारक आहे.          पेमेंट प्रणाली पी.एफ.एम.एस. असून आधार लिंक असलेले बँक खाते घेण्यात यावे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात

Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात  वाशिम दि.२१ (जिमाका) केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी हे २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजता बेलोरा विमानतळ अमरावती येथून हेलिकॉप्टरने वाशिमकडे प्रयाण. सकाळी १०.१५ वाजता वाशिमच्या पोलीस कवायत मैदान येथील हेलिपॅडवर आगमन व मोटारीने टिळक रोडवरील भट गल्लीकडे प्रस्थान.सकाळी १०.३० वाजता भट गल्ली येथे आयोजित श्रौत योग आंदभुवनी उत्सवाला उपस्थित राहून सकाळी ११.४५ वाजता पोलीस कवायत मैदान येथील हेलीपॅडवरून हेलिकॉप्टरने कारंजाकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वाजता कारंजा येथील वर्धमान महाविद्यालयाच्या परिसरातील हेलिपॅडवर आगमन व मोटारीने श्री.नृसिंह सरस्वती मंदिराकडे प्रयाण व दुपारी १२.४० वाजता मंदिर परिसरात आगमन व श्री.नृसिंह सरस्वतीचे दर्शन.दुपारी १.१५ वाजता वर्धमान महाविद्यालय परिसरातील हेलिपॅड येथे आगमन. दुपारी १.४० वाजता हेलिकॉप्टरने मूर्तीजापूरकडे प्रयाण.

मराठा - कुणबी जातप्रमाणपत्रासाठी कागदपत्रे/पुरावे २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करा

Image
मराठा - कुणबी जातप्रमाणपत्रासाठी  कागदपत्रे/पुरावे २४ नोव्हेंबरपर्यंत सादर करा वाशिम,दि.२० (जिमाका) मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र  देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्री.संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.               त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडे उपलब्ध असलेले पुरावे,वंशावळी,शैक्षणिक व महसुली पुरावे,संस्थानिकांनी दिलेल्या सनदा,राष्ट्रीय दस्तावेज इ.जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 24 नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार आहे.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

केंद्राच्या योजनांच्या प्रसार प्रसिद्धीचे व लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. विकसित भारत संकल्प यात्रा तयारीचा आढावा

Image
केंद्राच्या योजनांच्या प्रसार प्रसिद्धीचे व लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करा             जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.  विकसित भारत संकल्प यात्रा तयारीचा आढावा  वाशिम दि.२०(जिमाका) केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील ज्या ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही, त्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून या योजनांच्या प्रसार प्रसिद्धीचे आणि लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन यंत्रणांनी करावे.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.                  आज २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे " विकसित भारत संकल्प यात्रेच्या " तयारीचा आढावा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडून घेताना श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या.       यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, संजय जोल्हे,नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा ग्रामीण बँक व्यवस्थापक श्री दिलीप मोहापात्रा,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास क

२८ व २९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव क्रीडा व कृषी विभागाचा पुढाकार २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले

Image
२८ व २९ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सव क्रीडा व कृषी विभागाचा पुढाकार २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविले वाशिम,दि.१७ (जिमाका) जिल्हा क्रीडा परिषद वाशिम,जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, वाशिम यांचे संयुक्त विद्यमाने २८ व २९ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.           संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे वर्ष अंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषीत केले आहे.या अनुषंगाने  जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस.यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन वाटाणे लॉन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम येथे २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे.          युवा महोत्सवात १) तृण धान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर २) सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना आहे.या संकल्पनेवर आधारीत स्पर्धात्मक व अस्पर्धात्मक जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये आयोजीत होणाऱ्या विवीध बाबी १) लोकगीत (सहभागी

१९ ते २५ नोव्हेंबर कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Image
१९ ते २५ नोव्हेंबर कौमी एकता सप्ताह साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन वाशिम दि.१७ (जिमाका) जिल्ह्यात १९ ते २५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत कौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या सप्ताहात रविवार १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त  धर्मनिरपेक्षता,जातीयवादी विरोध व अहिंसा यांच्यावर भर देणाऱ्या सभा, चर्चासत्रे व परिसंवाद आयोजित करावे,सोमवार २० नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याक कल्याण दिवसाचे औचित्य साधून यादिवशी अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी १५ कलमी कार्यक्रमावर भर देण्यात यावा. जातीय दंगली उद्भवणाऱ्याा शहरातून बंधुभाव निर्माण करण्यासाठी खास मिरवणुका काढण्यात याव्यात. मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी भाषिक सुसंवाद दिवसाचे निमित्ताने  भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेचा वारसा परिचय करून देण्याच्या दृष्टीने विशेष वाड:मयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात यावीत. बुधवार २२ नोव्हेंबर रोजी दुर्बल घटक दिवसाचे औचित्य साधून यादिवशी २० कलमी कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व जमात

संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत मिशन मोडवर पोहचवा पर्यटन संचालक रोशन थॉमस विकसित भारत संकल्प यात्रा सभा

Image
*संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत मिशन मोडवर पोहोचवा*                                  पर्यटन संचालक रोशन थॉमस           *विकसित भारत संकल्प यात्रा सभा* वाशिम,दि.१७ (जिमाका) केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. ज्या विविध योजनांचा लाभ अद्यापही ज्या लाभार्थ्यांना मिळालेला नाही, त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती पोहोचवून त्या योजनांचा लाभ घेण्यास त्या लाभार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी " विकसित भारत संकल्पना यात्रा " ही मोहीम राबविण्यात येत आहे.यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत मिशन मोडवर पोहोचविण्याचे काम यंत्रणांनी करावे. असे निर्देश केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालय विभागाचे संचालक रोशन थॉमस यांनी दिले.                आज १७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या " विकसित भारत संकल्प यात्रा " मोहिमेच्या तयारीचा आढावा आयोजित सभेत घेताना श्री.थॉमस बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वर

२५ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा

Image
२५ नोव्हेंबर ते २६ जानेवारीपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा वाशिम दि.१६(जिमाका) केंद्र सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा यादृष्टीने केंद्र शासनाने राज्य सरकारच्या सहकार्याने एप्रिल- मे २०१८ या कालावधीत ग्राम स्वराज अभियान तसेच माहे जून-ऑगस्ट २०१८ या कालावधीत विस्तारित स्वरूपात ग्रामस्वराज अभियान राबविले. अद्यापही ज्या योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही अशा लाभार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी ' विकसित भारत संकल्प यात्रा " ही देशव्यापी मोहीम १५ नोव्हेंबर २०२३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे.                 केंद्र सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे, योजनांच्या माहितीचा प्रसार करून योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक कथा/ अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे आणि या संकल्प यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे हे या यात्रेचे उद्द