केंद्रीय मंत्री नितीन गडकरी २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
२३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात
वाशिम दि.२१ (जिमाका) केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी हे २३ नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजता बेलोरा विमानतळ अमरावती येथून हेलिकॉप्टरने वाशिमकडे प्रयाण. सकाळी १०.१५ वाजता वाशिमच्या पोलीस कवायत मैदान येथील हेलिपॅडवर आगमन व मोटारीने टिळक रोडवरील भट गल्लीकडे प्रस्थान.सकाळी १०.३० वाजता भट गल्ली येथे आयोजित श्रौत योग आंदभुवनी उत्सवाला उपस्थित राहून सकाळी ११.४५ वाजता पोलीस कवायत मैदान येथील हेलीपॅडवरून हेलिकॉप्टरने कारंजाकडे प्रयाण. दुपारी १२.१५ वाजता कारंजा येथील वर्धमान महाविद्यालयाच्या परिसरातील हेलिपॅडवर आगमन व मोटारीने श्री.नृसिंह सरस्वती मंदिराकडे प्रयाण व दुपारी १२.४० वाजता मंदिर परिसरात आगमन व श्री.नृसिंह सरस्वतीचे दर्शन.दुपारी १.१५ वाजता वर्धमान महाविद्यालय परिसरातील हेलिपॅड येथे आगमन. दुपारी १.४० वाजता हेलिकॉप्टरने मूर्तीजापूरकडे प्रयाण.
Comments
Post a Comment