Posts

Showing posts from September, 2017

वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवावे - उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे

Image
·         ३ ऑक्टोंबर पासून मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम ·         ८ व २२ ऑक्टोंबर रोजी राबविली जाणार विशेष मोहीम वाशिम , दि. २८ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि. ३ ऑक्टोबर २०१७ ते दि. ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या दरम्यान दि. ३ ऑक्टोंबर ते ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहे. याच कालावधीत नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार असून वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील कोरडे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी मंगळवार दि. ३ ऑक्टोबर २०१७ रोजी केली जाणार आहे. दावे व हरकती दि. ३ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत स्विकारल्या जाणार आहेत. मतदार यादीमधील संबंधीत भाग , सेक्शनच्या

समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
वाशिम , दि. २० :   शेतीमधील उत्पादन वाढीबरोबरच इतर शेतीपूरक व्यवसायांची उभारणी करण्यासाठी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न केले जावेत. याकरिता शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहित करण्याच्या सूचना अमरावतीचे विभागीय आयुक्त तथा प्रकल्प संचालक पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाचे जिल्हा सनियंत्रण व मुल्यांकन अधिकारी सर्जेराव ढवळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय समन्वयक राजू इंगळे, जिल्हा समन्वयक राजेश नागपुरे यांच्यासह संबंधित क्लस्टरच्या अंमलबजावणी यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतकऱ्यांना रेशीम शेती, मत्स्यशेतीसारखे शेतीपूरक व्यवसाय सुरु करून अतिरिक्त उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रोत्साहित करा. तसेच क्लस्टरमध्ये जास्तीत जास्त दुध संकलन केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसा

महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी आवश्यक भूसंपादनाला गती द्या - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
·         मूल्यांकनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना वाशिम , दि. २० : नागपूर-मुंबई दरम्यान होत असलेल्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनींचे थेट खरेदीने भूसंपादन करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह उपजिल्हाधिकारी तथा प्रशासक सुनील माळी, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, संबंधित तहसीलदार व इतर यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा मोठा टप्पा वाशिम जिल्ह्यातून जात असल्याने येथील भूसंपादन प्रक्रिया गतिमान होणे आवश्यक आहे. याकरिता संबंधित यंत्रणांनी मूल्यांकनाच्या कामाला गती देऊन त्याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तातडीने सादर करावी. यामध्ये कोणत्याही टप्प्यावर कसलाही विलंब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे मूल्यांकन योग्य असल्याची खात्री करून तसेच आवश्यक बाबींची योग्यप्रकारे छाननी करूनच सदर प्रकरणे जिल्हास्तरीय समितीक

राज्य शासनाचा डिजिटल प्रशासनावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
·           शेततळ्यांसाठी ऑनलाईन अर्ज ,    204    कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खाती  जमा ·           राज्यातील   सर्व   ग्रामपंचायती  ‘ महानेट ’ ने   जोडणार ·            ‘ रेट ऑफ कन्व्हिक्शन ’ 52  टक्क्यांवर मुंबई दि  17:   प्रशासनाची कार्यक्षमता, गतिशीलता, पारदर्शीपणा अशी सर्वसमावेशकता आणण्याचे काम राज्यात डिजीटायझेशनच्या माध्यमातून सुरु आहे. याचेच उत्त्म उदाहरण म्हणजे ऑनलाईन शेततळे योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आलेली पारदर्शकता. आता शेततळ्यांचे जिओ टॅगींग केल्यामुळे प्रत्यक्ष काम झाले किंवा नाही याचे मॉनिटरींग करता येते त्यामुळे शेततळ्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट जमा केल्यामुळे भ्रष्टाचार थांबला. यावर्षी शेततळयांसाठी एकूण 2 लाख 83 हजार 620 अर्ज प्राप्त झाले. त्यातील 51 हजार 369 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून 204 कोटी रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा झाली असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले .   विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित झालेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मिती  ‘ मी मुख्यमंत्री बोलतोय ’  या कार

ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणूक खर्च मर्यादेत बदल - राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया

Image
·          प्रथमच सरपंचपदाची थेट जनतेतून निवडणूक ·          नवनिर्वाचित सदस्यांना मिळणार संगणकीकृत प्रमाणपत्र ·          आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना ·          नाम निर्देशनपत्रे, घोषणापत्रे संगणकाच्या सहाय्याने भरणे आवश्यक वाशिम , दि . १४ : ग्रामपंचायत सदस्यपदाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत बदल करण्यात आला असून ग्रामपंचायातेच्या सदस्य संख्येनुसार नवीन खर्च मर्यादा निश्चित करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे आदी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्वच उमेदवारांना यापूर्वी २५ हजार रुपयेपर्

‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’मध्ये सहभागी व्हा

Image
·         शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांची पत्रकार परिषद   ·         जिल्ह्यात १० हजार पेक्षा विद्यार्थी, युवक होणार सहभागी ·         शाळांमध्ये दि. १५ सप्टेंबर रोजी फुटबॉल स्पर्धा वाशिम , दि . १२ : जागतिक फुटबॉल महासंघ (फिफा)च्या वतीने घेतली जाणारी १७ वर्षेखालील वर्ल्ड कप स्पर्धा भारतामध्ये होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून राज्यातही ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत दि. १५ सप्टेंबर २०१७ रोजी सर्व शाळांमध्ये फुटबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसोबतच युवक, नागरिकांनीही यादिवशी आपापल्या स्तरावर फुटबॉलचे सामन्यांचे आयोजन करून फुटबॉल खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर नागरे व जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन’च्या अनुषंगाने दि. २९

फुटबॉल खेळासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         जिल्ह्यातील मुख्याध्यापक, फुटबॉल संघटनांची सभा वाशिम , दि . ०६ : जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा)१७ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोंबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. या अनुषंगाने देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘मिशन-इलेव्हन मिलियन’ अभियान सुरु केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ अभियान सुरु करण्यात आले असून यामाध्यमातून शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉलविषयी आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न होत असून जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांनी आपल्या शाळांमध्ये फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित जिल्ह्यातील मुख्याध्यापक व फुटबॉल संघटनांच्या प्रतिनिधींच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय पांडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. नागरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणा