Posts

Showing posts from April, 2022

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करा पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करा                                                     पालकमंत्री शंभूराज देसाई पाणीटंचाई व जल जीवन मिशनचा आढावा वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हयातील ज्या गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्या गावातील नागरीकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबवुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आज 30 एप्रिल रोजी पाणीटंचाई व जल जीवन मिशनचा आढावा घेतांना श्री. देसाई बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी वसुमना पंत, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम, जि.प.उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे,जि.प अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी  व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी श्री.राऊत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्री.देसाई म्हणाले, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संबंध

शेतकऱ्यांना बियाणे,खते व पिक कर्जयोग्यवेळी उपलब्ध व्हावे -पालकमंत्री शंभुराज देसाई

Image
शेतकऱ्यांना बियाणे,खते व पिक कर्ज योग्यवेळी उपलब्ध व्हावे                                             -पालकमंत्री शंभुराज देसाई खरीप हंगामपूर्व आढावा बैठक वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हयात मोठया प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांना या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे, रासायनिक खते व पिक कर्ज योग्यवेळी उपलब्ध करुन देवून त्यांची खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभाग आणि बँकांनी दक्षता घ्यावी. असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.             आज 30 एप्रि‍ल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आ.अमित झनक, आ.राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी वसुमना पंत,सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम,जि.प.उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे,जि.प अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा परिषदेचे कृष

राजकीय मागासलेपणाच्या स्वरुप व परिणामांची चौकशी करण्यासाठी नागरिकांकडून अभिवेदन व सूचना मागविल्या

राजकीय मागासलेपणाच्या स्वरुप व परिणामांची चौकशी करण्यासाठी नागरिकांकडून अभिवेदन व सूचना मागविल्या वाशिम दि.23(जिमाका) राज्यातील नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची व परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी समर्पित आयोग स्थापन करण्याचे निर्देश  सर्वोच्च न्यायालयाने रिट क्र.980/2019 मध्ये 4 मार्च 2021 रोजीच्या आदेशाद्वारे दिले आहे.त्यानूसार सखोल चौकशी करण्याच्या अनुषंगाने नागरीक, संस्था, संघटनाकडून व नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून अभिवेदन व सूचना मागविण्यात आल्या आहे.              या निर्देशानूसार महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने 11 मार्च 2022 रोजीच्या अधिसूचनेद्वारे ‘महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोग गठित केला आहे. अभिवेदन व सूचना लेखी स्वरुपात व्हाट्सॲप क्र. 912224062121 व dcbccmh@gmail.com ई-मेलवर 10 मे 2022 पर्यंत पाठविण्यात याव्यात.         अधिक माहितीसाठी आयोगाचा पत्ता ए-1 इमारत,पहिला माळा खोली क्र115, वडाळा टर्मिनल,वडाळा आरटीओजवळ
Image
  राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेची तयारी पुर्ण 25 व 29 एप्रिल रोजी जंतनाशक मोहीम मोहिम राबविण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची सभा संपन्न            वाशिम, दि. 22 (जिमाका) : राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु करण्यात आला आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम फेब्रुवारी व ऑगस्ट महिन्यात शाळा आणि अंगणवाडयांमध्ये एकाच निश्चित दिवशी जंतनाशक गोळया देऊन दोनदा घेण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मातीतुन प्रसार होणाऱ्या कृमीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहीमेमधील अंतर ६ महिन्यापेक्षा जास्त नसावे. म्हणुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम २५ एप्रिल आणि २९ एप्रिल २०२२ रोजी मॉपअप दिन राबविण्यात येत आहे. या मोहीमेची अंमलबजावणी शाळा व समुदाय स्तरावर करण्यात येणार आहे.              राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलां-मुलींना शाळा व समुदायस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स

महाराष्ट्र दिनी होणार सामाजिक न्यायाचा जागर · ध्वजारोहणाच्या ठिकाणी समाज कल्याण योजनांची माहिती पत्रिका देणार · लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती

  महाराष्ट्र दिनी होणार सामाजिक न्यायाचा जागर ·          ध्वजारोहणाच्या ठिकाणी समाज कल्याण योजनांची माहिती पत्रिका देणार ·          लोकप्रतिनिधी/प्रशासकीय अधिकारी देणार योजनांची माहिती              वाशिम, दि. 22 (जिमाका) : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी संपुर्ण महाराष्ट्रात येत्या   1   मे या   महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत काढण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपुर्ण राज्यात ध्वजारोहणाच्यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहितीपत्रिका किंवा माहिती पुस्तिका वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री आणि   ग्रामीण भागात लोकप्रितिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामार्फत या योजनांचे संक्षिप्त स्वरूपात वाचनही करण्यात येणार आहे.              यावर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.   सामाजिक न्याय विभागाने कोरोनापासून राज्य निर्बंध मुक्त होताच समाज कल्याणमंत्री श्री. मुंडे यां
Image
  सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली समृध्दी महामार्गाची पाहणी ·          2 मे रोजी नागपूर ते शेलूबाजारपर्यंत 210 कि.मी.चा पहिला टप्पा सुरु होणार ·          महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडणार ·          नागपूर-मुंबई अंतर 6 ते 7 तासात गाठता येणार ·          डिसेंबर 2023 पुर्वी हा महामार्ग वाहतूकीसाठी खुला होणार              वाशिम, दि. 22 (जिमाका) : राज्याची राजधानी आणि उपराजधानी मुंबई-नागपूर दरम्यान हिंदुह्दय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचा नागपूर-शेलुबाजार दरम्यानचा 210 कि.मी. अंतराचा पहिला टप्पा येत्या 2 मे रोजी वाहतूकीसाठी खुला होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.              आज 22 एप्रिल रोजी श्री. शिंदे यांचे ठाणे येथून हेलीकॉप्टरने हवाई मार्गाने समृध्दी महामार्गावरुन शेलुबाजारजवळील जनुना (खु.) शिवारातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर उभारण्यात आलेल्या हेलीपॅडवर आगमन झाले यावेळी ते बोलत होते. श्री. शिंदे यांचे आगमन होताच बाळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख, व

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्हयात

Image
  सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्हयात            वाशिम, दि. 21 (जिमाका) : राज्याचे सार्वजनिक बांधकाम व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आज 22 एप्रिल रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. सकाळी 10 वाजता ठाणे हेलीपॅड येथून खाजगी हेलीकॉप्टरने नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गाची हवाई पाहणी करीत दुपारी 12 वाजता मंगरुळपीर तालुक्यातील जनुना (खु.) येथील हेलीपॅडवर आगमन व तेथून मोटारीने समृध्दी महामार्गाची पाहणी करीत नागपूरकडे प्रयाण करतील. *******

जवाहर नवोदय विद्यालय ६ वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र त्वरित डाऊनलोड करा

  जवाहर नवोदय विद्यालय                     ६ वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र त्वरित डाऊनलोड करा              वाशिम, दि. 21 (जिमाका) : येत्या ३० एप्रिल रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र दोन प्रतीत मुख्याध्यापकाची सही व शिक्का घेऊन विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दिवशी यायचे आहे. एक परीक्षा प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर जमा करायचे आहे.                 ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत प्रवेशपत्र डाऊनलोड केले नाही त्यांनी लवकरात लवकर प्रवेशपत्र डाऊनलोड करावे. प्रवेशपत्र काढण्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास विद्यालयाच्या ९९७५०५९६०३,८७८८८५९२७०, ९६०४५६७०९०,९४२१४९४३३७ आणि ९४२३७२२८११ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे. *******

24 एप्रिल ते 1 मे दरम्यान किसान भागीदारी प्राथमिकता हमारी · ९३ हजार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी बँकांचा पुढाकार · २४ एप्रिल रोजी किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष ग्रामसभा

  24 एप्रिल ते 1 मे दरम्यान किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ·         ९३ हजार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी बँकांचा पुढाकार ·         २४ एप्रिल रोजी किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष ग्रामसभा          वाशिम, दि. 21 (जिमाका) : देशात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याची मोहिम ६ फेब्रुवारी २०२० पासून सुरु केली आहे. ही मोहिम भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षातंर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून देशात राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार २४ एप्रिल ते १ मे २०२२ दरम्यान “ किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ” ही मोहिम राबविणार आहे. जिल्हयात पी.एम. किसान सन्मानचे १ लाख ९९ हजार ६८३ लाभार्थी शेतकरी आहे. ९३ हजार ८९८ शेतकरी हे किसान क्रेडिट कार्डपासून आजही वंचित आहे. या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी २४ एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या बँकांच्या कार्यक्षेत्रात जी गावे येतात,त्या बँकांचे अधिकारी व कर्मचारी या ग्रामसभांना संबधित गावा

७ मे रोजी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत

  ७ मे रोजी जिल्हयात राष्ट्रीय लोक अदालत           वाशिम, दि. 20 (जिमाका) : ७ मे २०२२ रोजी जिल्हा सत्र न्यायालय, वाशिम आणि सर्व तालुका न्यायालयामध्ये सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये दाखलपुर्व व प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसूली प्रकरणे, कामगाराचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलचे प्रकरणे (आपसात तडजोड करण्याजोगे प्रकरणे वगळून), आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, भु-संपादन प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे, मनाई हुकुमाचे दावे, विशिष्ट पुर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद या प्रकरणांचा समावेश असणार आहे.            ज्या पक्षकारांची वर नमुद प्रकारची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी ७ मे २०२२ रोजी आपली प्रकरणे आपसात करण्यासाठी या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोदविण्याकरीता संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा जिल्हा विधी सेवा

स्त्रीभ्रृण हत्या व बालविवाह रोखण्यास प्रत्येकाने दक्ष असावे -न्या. संजय शिंदे

Image
  स्त्रीभ्रृण हत्या व बालविवाह रोखण्यास प्रत्येकाने दक्ष असावे                                                                               -न्या. संजय शिंदे           वाशिम ,   दि. 20 (जिमाका) : आज देखील आपण पुरुष प्रधान मानसिकतेत जगतो. समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आपण स्त्रीभ्रृण हत्या तसेच बालविवाह यावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दक्ष असावे. असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. संजय शिंदे यांनी केले.                20 एप्रिल रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त वतीने जिल्हा न्यायालयातील सभागृहात आयोजित बालविवाह प्रतिबंध अधिनियम या विषयावरील कायदेविषयक मार्गदर्शन शिबीरात अध्यक्ष म्हणून न्या. शिंदे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून न्या. एम.एस. पदवाड, न्या. आर.पी. कुलकर्णी, ॲड. समाधान सावळे, जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. एन.टी. जुमडे यांची उपस्थिती होती.                न्या. श्री. पदवाड यांनी गर्भलिंग निदान आणि प्रतिबंध याविषयावर न्या. आर.पी. कुलकर्णी यांनी नागरीकांचे मुलभूत कर्तव्य, ॲड. समाधान सावळ

शिष्यवृत्ती योजना प्रलंबित अर्ज 25 एप्रिलपर्यंत ऑनलाईन सादर करावे

  शिष्यवृत्ती योजना प्रलंबित अर्ज 25 एप्रिलपर्यंत ऑनलाईन सादर करावे           वाशिम ,   दि. 20 (जिमाका) : सन २०२१-२२ या सत्रातील महाडीबीटी प्रणालीवरील भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज व त्रृटी पुर्ततेकरिता विद्यार्थ्यांचे लॉगीनला परत करण्यात आलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे.              जिल्हयातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालकांनी या प्रलंबित अर्जाची त्रृटी   पुर्तता करुन आवश्यक कागदपत्रांसह पात्र अर्ज २५ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास तात्काळ सादर करावे. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व इतर ऑनलाईन योजनांचे अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाचे अर्ज २५ एप्रिलपर्यंत अर्जाची पडता

साखरा गावाच्या व शाळेच्या विकासात ग्रामस्थांचे महत्वपुर्ण योगदान -वसुमना पंत

Image
साखरा गावाच्या व शाळेच्या विकासात ग्रामस्थांचे महत्वपुर्ण योगदान                                        -वसुमना पंत           वाशिम, दि. 19 (जिमाका) : साखरा येथील शाळा ही जिल्हा परिषदेची आहे याचा मला अभिमान वाटतो. या शाळेने शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवली आहे. खाजगी शाळांपेक्षा आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उत्तम आहे. गावाच्या व शाळेच्या विकासात ग्रामस्थांचे महत्वपुर्ण योगदान आहे. साखरा गावाचा व शाळेचा विकास हा सुक्ष्म नियोजनातून झाला आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.                आज 19 एप्रिल रोजी साखरा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्रीमती पंत बोलत होत्या. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक श्रीमती महक स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेष हिंगे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजेश शिंदे, शिक्षणाधिकारी (माध्य.) रमेश तांगडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बोंद्रे, साखरा सरपंच श्रीमती चंद्रकला इंगळे, शाळेचे मुख्या

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराची उत्साहात सुरुवात ग्रीष्मकालीन क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

Image
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराची उत्साहात सुरुवात ग्रीष्मकालीन क्रीडा स्पर्धेचे उदघाटन           वाशिम ,  दि.  19  (जिमाका)  :  उन्हाळी प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून क्रीडा गुण, कौशल्य तसेच शारिरीक व मानसिकरित्या योग्य खेळाडू व त्याचे सुप्त गुण विकसीत व्हावे. या दृष्टीकोणातून खेळाडुंनी निरंतर मैदानावर येऊन सराव करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन शिबीराचे उदघाटक जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते जनाब रफीक खान यांनी केले.             क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र तसेच विविध क्रीडा संघटनाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल वाशिम येथे उन्हाळी ग्रीमष्कालीन क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे उद्‌घाटन 18 एप्रिल रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोशिएशनचे उपाध्यक्ष धनंजय वानखेडे होते. जेष्ठ क्रीडा शिक्षक दत्तराव खरडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, बालाजी शिरसीकर, रायफल शुटींग व कुस्ती संघटनेचे प्रल्हाद आळणे, कराटे संघटनेचे सुनिल देशमुख, अॅथलॅटीक्स संघटनेचे चेतन शेंडे, मराविविकं श्र

जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी दरडोई उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष द्यावे नारायण राणे

Image
जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी दरडोई उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष द्यावे                             नारायण राणे  आकांक्षित जिल्हा वाशिम आढावा बैठक  वाशिम दि १९ (जिमाका) केंद्र सरकारने देशातील निवडक मागास जिल्ह्यात वाशिमचा समावेश केला आहे. जिल्ह्यात रोजगार निर्मिती कोणत्या क्षेत्रात वाढविता येईल याचा अभ्यास करून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याकडे लक्ष द्यावे.असे निर्देश केंद्रीय सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिले          आज १९ एप्रिल रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आकांक्षीत जिल्हा वाशिम आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून श्री. राणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार सर्वश्री डॉ.रणजीत पाटील, वसंत खंडेलवाल, राजेंद्र पाटणी व लखन मलिक, जिल्हाधिकारी वसुमना पंत व सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांची प्रमुख उपस्थिती होती.                 श्री राणे म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये प्रक्रिया उद्योगाकडे विशेष लक्ष द्यावे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्

जिल्हयातील 50 शेतकऱ्यांनी धरली रेशीम शेतीची कास 54 एकरवर तुतीची लागवड · सन 2022-23 करीता 175 शेतकऱ्यांची नोंदणी · एका पिकातून 80 हजार ते 1 लाखाचे उत्पन्न · जालना बाजारपेठेत कोष खरेदी केंद्र · कोषाचा दर 750 ते 800 रुपये प्रति किलो

Image
  जिल्हयातील 50 शेतकऱ्यांनी धरली रेशीम शेतीची कास 54 एकरवर तुतीची लागवड ·         सन 2022-23 करीता 175 शेतकऱ्यांची नोंदणी ·         एका पिकातून 80 हजार ते 1 लाखाचे उत्पन्न ·         जालना बाजारपेठेत कोष खरेदी केंद्र ·         कोषाचा दर 750 ते 800 रुपये प्रति किलो          वाशिम ,   दि. 19 (जिमाका) : वरुण राजावर अवंलबून राहून जिल्हयाची बहुतांश शेती ही कोरडवाहू पध्दतीने इथला शेतकरी करतो. जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान कमी आहे. जिल्हयात मोठे सिंचन प्रकल्प नसल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून पीके घ्यावी लागतात. मात्र अलीकडे जिल्हयाचे कृषी क्षेत्रातील चित्र काही प्रमाणात बदलतांना दिसत आहे. संरक्षित सिंचन क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होत असल्याने बळीराजा वर्षातून दोन ते तीन पीके घेतांना दिसत आहे. जिल्हयाला आकांक्षित जिल्हा म्हणून लागलेला ठपका पुसण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातू प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हयातील पारंपारीक पिके घेणाऱ्या काही शेतकऱ्यांनी मखमली क्रांतीचा मार्ग निवडला आहे. जिल्हयातील 50 शेतकऱ्यांनी रेशीम विकास विभागाच्या मार्गदर्शनात रेश

कारखेडाचे काम इतरांसाठी प्रेरणादायी ऍड. यशोमती ठाकूर

Image
कारखेडाचे काम इतरांसाठी प्रेरणादायी                     ऍड. यशोमती ठाकूर  आदर्श सुनबाई व मुलींच्या जन्माचा स्वागत सत्कार सोहळा  वाशिम दि.१५ (जिमाका) गावाच्या विकासात ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वाची असते. कारखेडा ग्रामपंचायतीने मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी अनेक उपक्रम राबविले.मुलींच्या जन्माचे तसेच आदर्श सूनबाईंचे सुद्धा स्वागत करण्याचा ग्रामपंचायत कारखेडा आणि ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार इतरांसाठी प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले.            आज १५ एप्रिल रोजी मानोरा तालुक्यातील कारखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने आदर्श सुनबाई व मुलींच्या जन्माचा स्वागत सोहळा श्री. समर्थ शंकर गिरी महाराज देवस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आला.यावेळी मुख्य अतिथी म्हणून ऍड. श्रीमती ठाकूर बोलत होत्या.अध्यक्षस्थानी नरेश देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा गावंडे, सरपंच सोनाली सोळंके, उपसरपंच अनिल काजळे, वंदना परांडे,जयंत देशमुख,अंजली ठाकरे, उषा देशमुख, जितेंद्र ठाक

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच महिला आज पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत किरण गि-हे

Image
सामाजिक समता कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच महिला आज पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत                         किरण गि-हे वाशिम,दि.१५ (जिमाका) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल व्याख्यान,तृतीयपंथी व्यक्तीमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटपाचे आयोजन आज १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.         कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती किरण गि-हे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. श्रीमती दिपाली सांबर, डॉ. पी.एन.संधानी,श्रीमती पेंढारकर, तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ उपस्थित होते.       श्रीमती गि-हे पुढे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग, संघर्ष महिलांनी लक्षात ठेवला पाहिजे. कारण त्यांनी महिलांसाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. त्यामुळेच आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या.        अॅड. श्रीमती सांबर म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लो