डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच महिला आज पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत किरण गि-हे


सामाजिक समता कार्यक्रम

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच महिला आज पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत
                        किरण गि-हे

वाशिम,दि.१५ (जिमाका) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल व्याख्यान,तृतीयपंथी व्यक्तीमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटपाचे आयोजन आज १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले.
        कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती किरण गि-हे होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. श्रीमती दिपाली सांबर, डॉ. पी.एन.संधानी,श्रीमती पेंढारकर, तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ उपस्थित होते.
      श्रीमती गि-हे पुढे म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा त्याग, संघर्ष महिलांनी लक्षात ठेवला पाहिजे. कारण त्यांनी महिलांसाठी मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. त्यामुळेच आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या. 
      अॅड. श्रीमती सांबर म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांसाठी खूप मोठे कार्य केले. तुम्ही स्व:तासाठी न जगता इतरासाठी जगा.भारतीय परंपरेमध्ये जे महिलांचे शोषण व्हायचे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बंद केले. सर्व महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी मिळवून दिला,शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
        डॉ.संधानी यांनी तृतीयपंथीबद्दल समाजामध्ये आजही तिरस्काराची भावना आहे.आजही समाज त्यांचेवर टीका टिप्पणी करतो. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासने सन २०१३ च्या ध्येय - धोरणामध्ये तरतुदी केलेल्या आहेत,असे ते म्हणाले.
          तृतीयपंथी श्रावणी हिंगासपुरे म्हणाल्या, ग्रामीण भागामध्ये आजही तृतीयपंथी शब्द माहित नाही.आजही समाजामधील जीवन जगण्याची कार्य पद्धती बदलण्याची आवश्यकता आहे. तृतीयपंथीयांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष आहे.असे त्यांनी मनोगतामध्ये सांगितले.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल चोंडकर,विजय भगत,गोविंद उगले, श्रीमती आर.एन.साठे, एस.एम.निमन तसेच समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी, ब्रिक्स इंडिया प्रा.लि.चे जिल्हा व्यवस्थापक अनिल गायकवाड यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण निरीक्षक ए.बी.चव्हाण यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर कव्हर यांनी तर आभार संध्या राठोड यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे