Posts

Showing posts from October, 2018

प्रत्येक क्षयरुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
वाशिम , दि . ३१ : प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम राबवितांना जिल्ह्यातील प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद शासकीय यंत्रणेकडे होणे व प्रत्येक क्षयरुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे १२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम नियोजनबद्ध स्वरुपात राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, क्षयरुग्णाला वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णाल

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेसाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करा - लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
वाशिम , दि . ३१ : नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याकरिता आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि महिला व बाल कल्याण विभागाच्या समन्वयाने सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज आयोजित गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुधाकर जिरोणकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मिश्रा म्हणाले, गोवर-रुबेला लसीकरण मोहीम ही अतिशय महत्त्वपूर्ण मोहीम असून या मोहिमेची प्रभावी व यशस्वी अं

नाबार्डचा पुढाकार मानोरा येथे बचत गट नेतृत्व विकास कार्यशाळा

Image
वाशिम , दि . ३१ : राष्ट्रीय कृषि व ग्रामीण बँक अर्थात नाबार्ड यांच्या पुढाकारातून मानोरा तालुक्यातील बचत गटातील महिलांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळेचे आयोजन ३१ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, भारतीय स्टेट बँक मानोरा शाखेचे व्यवस्थापक राजीव रंजन, विस्तार अधिकारी श्री. बेलखेडे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक आशिष राऊत, मनी व्हाईसचे व्यवस्थापक श्री. पडघन यांची उपस्थिती होती. नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांनी प्रास्ताविकातून बँकांची ग्रामीण व कृषि विकासात महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून व्यवहार करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तसेच बँकाकडून कर्ज घेताना कोणत्या कागदपत्रांची पूर्तता केली पाहिजे, याबाबतची माहिती दिली. महिला बचत गटांच्या माध्यमातून आपली स्थिती भक्कम करून विकासाला चालना देतात. बचत गटांच्या महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज

सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

Image
वाशिम , दि . ३१ : देशाचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस व देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा विधी अधिकारी महेश महामुने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. *****

प्राधान्य क्षेत्रातील कर्ज प्रकरणांवर तातडीने निर्णय घ्या - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

Image
·         जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक ·         ‘नाबार्ड’च्या ‘संभाव्यता युक्त कर्ज योजना २०१९-२०’चे विमोचन वाशिम ,   दि .   ३०   : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सादर होणारी स्वयंसहाय्यता बचत गटांची कर्ज प्रकरणे तसेच शासनाच्या विविध महामंडळामार्फत सादर होणाऱ्या कर्ज प्रकरणांविषयी सर्व बँकांनी तातडीने निर्णय घ्यावा. या कर्ज प्रकरणांविषयी कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज झालेल्या जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक प्रमोद कापडे, भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुनील मनचंदा , नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अनुपम सिंग, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. व्ही. निनावकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक रा

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

वाशिम ,   दि .   ३०   :   महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्यावतीने विशेष घटक योजनेमध्ये ५० हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य तसेच बीजभांडवल योजनेमध्ये ५ लाख रुपयेपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. जिल्ह्यातील विविध बँकांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनांसाठी प्रत्येकी १०० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध या जात प्रवर्गातील युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध प्रवर्गातील व वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी असावा. त्याचप्रमाणे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपयांच्या आत असावे. अर्जदाराचे वय २० ते ६० वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक आहे. या अटी पूर्ण करणाऱ्या गरजू बेरोजगार युवक-युवतींनी स्वयंरोजगारसाठी या योजनांचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम या कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक रमेश मनवर यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

वाशिम ,   दि .   २९   :     कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होण्यासाठी ३० ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार   प्रतिबंधात्मक   आदेश   जिल्हा दंडाधिकारी वाशिम यांनी लागू   केला आहे. या कालावधीत शस्त्रे ,   सोटे ,   तलवारी ,   भाले ,   दंडे ,   बंदुका ,   सुरे ,   लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे ,   कोणताही   दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे ,   दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे ,   जमा करणे किंवा तयार करणे ,    व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे ,   वाद्य वाजविणे , किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा ,   भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कोणतीही कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. अंत्ययात्रा ,   धार्मिक विधी ,   सामाजिक सण ,   लग्न सोहळे यांना हा   आदेश   लागू   राहणार नाही. उपविभागीय अधिकारी यांना या   आदेशामधून समोचित प्रकरणामध्ये अधिकार क्षेत्रामध्ये स्थानिक पोलीस अ

‘दिशा’ वसतिगृहातील मुलींना कायदेविषयक मार्गदर्शन

Image
·        कायदेविषयक पुस्तकांचे वाटप वाशिम ,   दि .   २६   :    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने २५ ऑक्टोंबर रोजी येथील ‘दिशा’ मुलींच्या वसतिगृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना कायदेविषयक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे, बाल न्यायमंडळच्या अध्यक्ष न्यायाधीश डॉ. यु. टी. मुसळे, न्यायाधीश के. के. चौधरी, न्यायाधीश आर. आर. पांडे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया, कोषाध्यक्ष अॅड. श्रद्धा अग्रवाल, व्यवस्थापक गोपाल मोरे, विधी तथा परीविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, समुपदेशक आशिष अवचार, बाल न्याय मंडळाच्या सदस्य श्रीमती राठोड, मोतीराम खडसे, बाबाराव घुगे, वनमाला पेंढारकर, संगीता देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. देशपांडे म्हणाले, मुलींना कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपले हक्क, अधिकार व बचावासाठी असलेल्या कायद्याची माहिती घेण्यासाठी मुलींनी कायदेविषयक पुस्तकांचे वाचन करावे. लैंगिक अ

फटाके विक्रेत्यांनी नियमाचे पालन करावे

·         निवासी इमारतीत फटाके विक्री, साठवणुकीस मनाई वाशिम ,   दि .   २६   :    संयुक्त मुख्य विस्फोटक यांच्या निर्देशानुसार फटाक्यांच्या दुकानांचे शेड हे आग प्रतिबंधक व पूर्णतः बंद असणे आवश्यक असून शेडमध्ये कोणताही अनोळखी व्यक्ती प्रवेश करणार नाही, अशी व्यवस्था दुकानदारांनी करावी.  फटाक्यांच्या दोन दुकानातील अंतर हे कमीत कमी तीन मिटर व प्रोटेक्ट वर्कपासून ५० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. फटाक्यांच्या दुकानांची प्रवेशद्वारे एकमेकांसमोर नसतील याची दक्षता घ्यावी. दुकानामधील लाईटची व्यवस्था दुकानांच्या भिंतीवर सुरक्षितपणे केलेली असावी. फटाक्यांची डिजिटल अॅडोटाईसची फलके दुकानांच्या ५० मीटर अंतरावर असावीत. एका ठिकाणी ५० पेक्षा जास्त दुकाने लावली जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. एका फटाक्याच्या दुकानामध्ये जास्तीत जास्त १०० किलोग्रॅम फायर वर्क्स तथा ५०० किलोग्रॅम चायनीज, क्रेकर, स्पार्कलर्स स्फोटके ठेवली जातील, याची दक्षता घ्यावी. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाका विक्रीची दुकाने खुल्या जागेमध्ये, पटांगणामध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास कमीत कमी नुकसान

जड मालवाहतूक, जड प्रवासी वाहतूकीच्या परवाना चाचणीमध्ये बदल

वाशिम ,   दि .   २६   :   केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १७ मधील उपनियम १ खंड बीमध्ये नवीन परंतुक व नमुना ५ ए समाविष्ट केला आहे. त्यानुसार जड मालवाहतूक व जड प्रवासी वाहतुकीच्या चाचणीसाठीच्या चाचणी टर्ममध्ये इंधनाच्या कार्यक्षमतेचे मुल्यांकन करण्यासाठी ५ कि.मी. रोडवर आयोजित केली जाणार असून वाहन चालविण्याच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये ५ टक्के अचूकतेसह इंधन मोजण्याचे उपकरण असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षण संस्थेमार्फत नमुना ५ ए मध्ये प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतरच जड मालवाहतूक व जड प्रवासी वाहतुकीचा परवाना (लायसन्स) मिळविण्यासाठी अर्ज करता येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.

माहे नोव्हेंबरचे अन्नधान्य वाटप परिमाण निश्चित

वाशिम ,   दि .   २६   :   सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत माहे  नोव्हेंबर   २०१८   मधील विविध योजनानिहाय अन्नधान्याचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहे त.   राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम - २०१३  अंतर्गत प्राधान्य कुटुंबातील   लाभार्थ्यांसाठी   प् रति   व्यक्ती   ४   किलो गहू   व   १   किलो तांदुळ ,  अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका   ३०   किलो गहू व   ५   किलो तांदुळ ,  आणि एपीएल शेतकरी लाभार्थी यांना प्रति व्यक्ती   ४   किलो गहू व   १   किलो तांदुळ या प्रमाणे माहे  नोव्हेंबर    २०१८   करीता वाटप परिमाण निश्चित केलेले   आहेत.   सर्व लाभार्थ्यांसाठी धान्याचे विक्री दर हे गहू   २   रुपये   प्रति किलो व तांदुळ   ३ रुपये   प्रति किलो या प्रमाणे आहेत .   जिल्ह्यातील सर्व अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकांना  व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना  प्रति कार्ड   १   किलो साखर , १ किलो चना डाळ, १ किलो उडीद डाळ याप्रमाणे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे. साखरेचा  किरकोळ विक्री दर   २० रुपये, चनाडाळ व उडीद डाळीचा दर ३५ रुपये प्रति किलो   प्रमाणे आहे . जिल्ह्यातील

कौशल्य विकास प्रशिक्षण इच्छुक उमेदवारांनी १५ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी

वाशिम ,  दि .  २५  :  कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या किमान कौशल्य कार्यक्रम अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सन २०१८-१९ करिता जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीद्वारे कौशल्य प्रशिक्षणाकरिता विविध १३ क्षेत्रांची निवड करण्यात आली असून या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये प्रत्यक्ष येवून आपले नाव नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीद्वारे कौशल्य प्रशिक्षणाकरिता निवडलेल्या क्षेत्रामध्ये मशरूम शेती, गवंडी, प्लंबर, रेफ्रिजरेशन/एअर कंडीशनिंग/वेंटीलेशन मेकॅनिक (इलेक्ट्रिक कंट्रोल), डाळ प्रक्रिया व मूल्यवर्धन, तेलबिया प्रक्रींय आणि उपपदार्थ निर्मिती, कृषि आधारित पदार्थ, बेसिक ऑटोमोटिव्ह सर्विसिंग (दुचाकी, तीनचाकी वाहन), बेडसाईड असिस्टंट, हेल्थकेअर मल्टीपर्पज वर्कर, इंजेक्शन मोल्डिंग मशीन ऑपरेशन्स (आयएमएमओ), लूम फिटर, व्हेवर, लूम्स-प्लेन पॉवर लूम या १३ क्षेत्रांचा समावेश आहे. या क्षेत्रातील प्रशिक्षणासाठी इच्छ

प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना सूक्ष्म सिंचन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

वाशिम ,   दि .   २५   :  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेंतर्गत सन २०१८-१९ मध्ये ठिबक व तुषार संचाकरिता अनुदान देण्यात येणार आहे. याकरिता शेतकऱ्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार संचासाठीचे ऑनलाईन अर्ज  www.mahaagri.gov.in   या संकेतस्थळावरील  ethibak  पोर्टलवर किंवा  www.ethibak.gov.in   या ई-ठिबक प्रणालीवर सादर करण्याची प्रक्रिया मे २०१८ पासून सुरु झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२९९ शेतकऱ्यांनी आपले अर्ज सादर केले आहेत. जिल्ह्याला २० कोटी ९१ लक्ष रुपये आर्थिक लक्षांक देण्यात आला असून त्यापैकी ऑनलाईन प्राप्त अर्जांना पूर्वसंमती देण्यासाठी २ कोटी ३९ लक्ष ३६ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. त्यानुसार तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त लक्षांकाच्या मर्यादेत जिल्ह्यातील १०४८ अर्जांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. ठिबक व तुषार संच बसविण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज  www.mahaagri.gov.in   या संकेतस्थळावरील  ethibak  पोर्टलवर किंवा www.ethibak.gov.in   या ई-ठिबक प्रणालीवर सादर

नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारणार

·          इयत्ता सहावी प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा वाशिम ,  दि .  २५  :  केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत चालविण्यात येत असलेल्या संपूर्णतः निवासी स्वरूपाच्या वाशिम येथील जवाहर नवोदय विद्यालयात सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात इयत्ता ६ वी प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन स्वरुपात स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी या निवड चाचणी परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी व पालकाची स्कॅन केलेली सही, विद्यार्थाचे जेपीजी फॉर्मेटमधील छायाचित्र, इयत्ता ५ वीमध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे विहित नमुन्यातील स्कॅन  केली सर्टिफिकेट, या सर्टिफिकेटचा नमुना जवाहर नवोदय विद्यालयाच्या  www.jnvwashim.in   या संकेतस्थळावर डाऊनलोड ( download link ) मध्ये उपलब्ध आहे. प्रवेश अर्ज अपलोड करण्याचा कालावधी २३ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ हा आहे. ही परीक्षा

सातारा सैनिक शाळा प्रवेश प्रक्रिया सुरु

·          २६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले वाशिम ,  दि .  २३  :  सातारा येथील  सैनिक  शाळेमध्ये  सन   २०१९-२०   च्या सत्रातील  इयत्ता   ६ वी   आणि   इयत्ता  ९   वीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून प्रवेशासाठी  पात्र मुलांनी २६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. ऑनलाईन अर्ज भ र ण्यासाठी  उमेदवारांनी  www.sainiksatara.org   या संकेतस्थळाला भेट द्यावी.   ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक त्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आपल्या   सोबत ठेवावा. ऑनलाईनवर पूर्णपणे भरलेल्या प्रवेश अर्जाची प्रिन्टेड प्रत व   डिमांड ड्राफ्ट आणि सोबतची जोडपत्रे सैनिक शाळा साताराच्या कार्यालयात   पोहोच वि ण्याची अंतिम  मुदत ५   डिसेंबर २०१८  रोजी  सायंकाळी ५  वाजेपर्यंत असेल. इयत्ता सहावीतील प्रवेशासाठी उमेदवार   २   जुलै   २००८   ते    १  जुलै   २००९  ( दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता नववीतील प्रवेशासाठी   उमेदवार   २  जुलै   २००५    ते   १   जुलै   २००६  ( दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान   जन्मलेला असावा व सध्या मान