Posts

Showing posts from April, 2018

समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची चित्ररथाद्वारे जनजागृती

Image
·        जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते शुभारंभ वाशिम ,   दि .   ०५   :   राज्य शासनाने सुरु केलेल्या समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, उप अभियंता बी. बी. बलखंडे, नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे, सहाय्यक लेखा अधिकारी सीमा वानखेडे, कार्यक्रम व्यवस्थापक एस. जी. कदम, सचिन राऊत आदी उपस्थित होते. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेची तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कोणती कामे करता येतील, तसेच ही कामे घेण्यासाठी अर्ज कोणाकडे सादर करावा यासह इतर माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. दि. ५ ते २४ एप्रिल २०१८ या कालावधीत ग्रामीण भागात हा चित्ररथ फिरणार आहे. राज्य शासनाची वृक्ष लागवड मोहीम व महाराष्ट्र हरित सेना नोंदणीविषयी सुध्दा चित्ररथाच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : पात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

·        दि. ३० जून पर्यंत घेता येणार ‘वन टाईम सेटलमेंट’चा लाभ    वाशिम ,   दि .   ०५   :   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्यास दि. १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   तसेच एकवेळ समझोता योजना (वन टाईम सेटलमेंट ) या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. दिड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा निबंधक सहकारी संस्था रमेश कटके यांनी केले आहे.   राज्य शासनाने दि. १३ मार्च २०१८ रोजीच्या निर्णयानुसार कर्जमाफीस व एकवेळ समझोता योजनेस (वन टाईम सेटलमेंट) पात्र शेतकऱ्यांच्या थकीत रक्कमेवर दि. १ ऑगस्ट २०१७ ते कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीत व्याज आकारू नये, अशा सूचना सर्व बँकांना व विविध कार्यकारी सेव

राज्य सेवा पूर्व परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

वाशिम ,   दि .   ०५   :   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा २०१८,  रविवार, दि. ८ एप्रिल २०१८ रोजी वाशिम शहरातील सहा परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी १०.३० ते दुपारी १ व दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. एकूण १९२० परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. या सहाही परीक्षा उपकेंद्र परिसरात   कलम १४४ नुसार प्रतीबंधातामिक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. राज्य पूर्व परीक्षा वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय , श्री शिवाजी हायस्कूल , राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा , बाकलीवाल विद्यालय , एस. एम. सी. इंग्लिश स्कूल व रेखाताई कन्या शाळा या सहा परीक्षा उपकेंद्रांवर होत आहे. या सर्व परीक्षा उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्यामुळे परीक्षा उपकेंद्रांवर ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. उपकेंद्राच्या १०० मीटर परिक्षेत्रात केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, समवेक्षक, सहाय्यक कर्मचारी, परीक्षार्थी, परीक्षेसाठी नियुक्त समन्वय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडून नियुक्त केलेले अधिकारी यांच्य

जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना कर्ज मंजुरी पत्र सादर करण्यास १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

वाशिम , दि . ०४ : जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अधिकृत परवाना असलेल्या वित्तीय संस्थेकडून या योजनेच्या शासननिर्णयानुसार विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉगीनद्वारे सादर करण्यास दि. १३ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी अयोग्य मंजुरी पत्र सादर केलेले अर्जदारही या मुदतीत पुन्हा मंजुरी पत्र सादर करून शकतील, असे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी कळविले आहे. जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी http://eme.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा परवाना असलेल्या वित्तीय संस्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा परवाना असलेल्या वित्तीय संस्थाकडून या योजनेच्या शासन निर्णयानुसार विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आपल्या लॉगीन आयडीद्वारे दि. १३ एप्रिल २०१८ पर्यंत सादर करावयाचे आहे. कर्ज मंजुरी पत्रामध्ये शासनाचे दा