Posts

Showing posts from February, 2019

निवडणूक विषयक विविध पथकातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी वाशिम , दि. १५ : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी प्रशासनामार्फत सुरु आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध पथके स्थापन करण्यात आली असून या पथकांमध्ये समावेश असलेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात घेण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश हिंगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सार्वत्रिक निवडणुकीसाठी खर्च निरीक्षण पथक, लेखा पथक, भरारी पथक (एफएसटी) , स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी) , व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक (व्हीएसटी) , व्हीडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) यासारख्या विविध पथकांची विधानसभा मतदारसंघनिहाय स्थापना करण्यात आली आहे. तसेच खर्च निरीक्षक, क्षेत्रीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमधील अधिकाऱ्यांनी निवडणूक पार पाडावयाची जबाबदारी, प्रत्येक स्तरावर करावयाचे कामाचे नियोजन, तसेच निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या विहित नमुन्याबाबत व आज्ञावलीबाबत या प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांना ईव्ही

हृषीकेश मोडक यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली

Image
वाशिम ,   दि . ०९ :   वाशिमचे नवनियुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्याकडून आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी श्री. मीना यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, वाशिमचे उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार बळवंत अरखराव, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. राहुल वानखेडे, महसूलच्या तहसीलदार शीतल वाणी, नगरपरिषद मुख्याधिकारी वसंत इंगोले उपस्थित होते.             श्री. मोडक हे २००८ च्या बॅचचे मणिपूर केडरचे आयएएस अधिकारी आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत त्यांनी मणिपूर राज्यात विविध पदांवर काम केले आहे. तसेच एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत मणिपूर राज्यातील उखरूल जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. वाशिम येथे नियुक्ती होण्यापूर्वी ते राज्याच्या आदिवासी विकास विभागात नागपूर येथे अपर आयुक्त म्हणून कार्यरत होते. वाशिम जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यका

पात्र व्यक्तीला अन्न सुरक्षा, आरोग्यविषयक सेवांचा लाभ द्या - किशोर तिवारी

Image
वाशिम ,   दि . ०८ :   ग्रामीण भागातील पात्र व्यक्तीला अन्न सुरक्षा योजना, निराधार योजना व आरोग्यविषयक सेवा-सुविधांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. या योजनांपासून एकही पात्र व्यक्ती वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित शासकीय यंत्रणांनी घ्यावी, अशा सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक श्री. गोहाड, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. तायडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सैफ नदाफ, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. मेहकरकर यांच्यासह   संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री. तिवारी म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश जनता ही गरीब

व्यावसायिक प्रशिक्षण देवून बंदीजणांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न - कारागृह अधीक्षक पाडुळे

Image
·         दहा दिवसीय शेळी संगोपन प्रशिक्षणाचा शुभारंभ ·         ‘आरसेटी’ व जिल्हा कारागृहाचे आयोजन वाशिम , दि. ०६ : कारागृहात दाखल झालेल्या बंदींना त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा. त्यामाध्यमातून स्वतःची समाजात नवीन ओळख निर्माण करून आपले पुढील आयुष्य सुखाने जगात यावे, यासाठी जिल्हा कारागृहातील बंदींना व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न कारागृह विभागामार्फत करण्यात येत असल्याचे जिल्हा कारागृह अधीक्षक सोमनाथ पाडुळे यांनी सांगितले. भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) व जिल्हा कारागृह यांच्यावतीने आज आयोजित दहा दिवसीय शेळी संगोपन प्रशिक्षणाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, आरसेटीचे संचालक रघुनाथ निपाने, तज्ज्ञ प्रशिक्षक संतोष खासबागे,   जेलर सतीश हिरेकर, अशोक पंडित, ‘आरसेटी’चे सहाय्यक आशिष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. पाडुळे म्हण

पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेतील विजेत्या गावांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस वितरण

Image
·         कारंजा, मंगरूळपीर तालुक्यातील गावांचा समावेश वाशिम ,   दि . ०४ :   पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त गावांना राज्य शासनाने जाहीर केलेल्या बक्षिसाचे आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त गावांना प्रत्येकी ५ लाख रुपये व प्रमाणपत्र तर तृतीय पुरस्कार विजेत्या गावांना प्रत्येकी ३ लाख रुपये व प्रमाणपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे, रोहयोचे नायब तहसीलदार घनश्याम डाहोरे यांच्यासह बक्षीस विजेत्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थ तसेच पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. वॉटर कप स्पर्धेत कारंजा तालुक्यातील प्रथम पुरस्कार प्राप्त विळेगावच्या सरपंच माला संजय घुले, द्वितीय पुरस्कारप्राप्त बेलमंडलचे सरपंच सचिन काशिनाथ एकणार व तृतीय पुरस्कार विजेत्या बांबर्डा गावच्या सरपंच कांचन अनंतराव भेंडे, मंगरूळपीर तालु

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण

Image
वाशिम ,   दि . ०३ :   केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चिखली येथे १८ कोटी २५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण श्रीनगर येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल लाँचिंगद्वारे केले. यानिमित्त वाशिम येथील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमाला खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उच्च शिक्षण विभागाचे सह संचालक डॉ. मोहन खताळ, सह संचालक अशोक कळंबे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव हेमंत देशमुख, शिक्षणाधिकारी माध्यमिक तानाजी नरळे, जिल्हा सूचना व विद्यान अधिकारी सागर हवालदार यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी खा. गवळी यांच्या हस्ते स्थानिकरित्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. रुसा टप्पा-२ अंतर्गत देशातील ३३०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण   केल्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ‘ज

जलसंधारणाच्या कामासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करा - जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना

सुजलाम सुफलाम वाशिम अभियान ·          इंधन खर्चाच्या वाढीव दरास मान्यता देण्याबाबत चर्चा वाशिम ,   दि .   ०२  :     राज्य शासन व भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरु असलेल्या प्रत्येक कामाकरिता संबंधित यंत्रणेने एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याचे नाव व संपर्क क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावा. संबंधित नोडल अधिकाऱ्याने आपल्याकडे सोपविलेले काम योग्य प्रकारे होईल व त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिल्या. सुजलाम सुफलाम वाशिम अभियान अंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एस. सोळंके, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, अभिषेक देशमुख, संदीप भस्के, सहाय्यक वन संरक्षक अशोक वायाळ, वाशिम पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंत