Posts

Showing posts from August, 2019

माती आरोग्य पत्रिकेचे 1 कोटी 31 लाख शेतकऱ्यांना वाटप

Image
  मुंबई , दि.25 : जमिनीचे आरोग्य अबाधित राखतानाच एकात्मीक अन्नघटक व्यवस्थापनासाठी तसेच खतांच्या संतुलीत वापराकरिता माती आरोग्य पत्रिका योजना राबविली जात आहे. त्यानुसार गेल्या वर्षी राज्यातील एक कोटी 30 लाख शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. 2015-16 पासून माती आरोग्य पत्रिका योजना राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत राबविली जाते. प्रमुख व सूक्ष्म अन्नघटकांसाठी माती परीक्षण प्रयोगशाळेत केले जाते. त्याचे विश्लेषण करुन शेतकऱ्यांना,माती आरोग्य पत्रिकेचे वाटप केले जाते. 2015-16 व 2016-17 या प्रथम टप्प्यात 28 लाख माती नमून्यांची तपासणी करुन 1 कोटी 31 लाख शेतकऱ्यांना आणि 2017-18 व 2018-19 या द्वितीय टप्यात 28 लाख माती नमून्यांची तपासणी करुन 1 कोटी 30 लाख 53 हजार शेतकऱ्यांना माती आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे संकलीत झालेल्या माहितीनुसार खरिप  2019 मध्ये प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकनिहाय मुख्य मूलद्रव्यांचे मोबाईल संदेश देण्यात आले. राज्यात सध्या माती परीक्षणासाठी शासकीय  31 तर योजने

प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
* नाव नोंदणीसाठी आयोजित शिबिरांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट * १८ ते ४० वयोगटातील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी पात्र * वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार प्रतिमाह 3 हजार रुपये पेन्शन वाशिम, दि. २४ :  प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील १८ ते ४० वयोगटातील सर्व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्रावर जाऊन या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नाव नोंदणी करून प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये सहभागी होता यावे, याकरिता जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान गाव पातळीवर नाव नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मानोरा तालुक्यातील शेंदूजना आढाव, उज्ज्वल नगर, फुलउमरी, पाळोदी, मानोरा, साखरडोह तसेच मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी, हिसई, शेलुबाजार येथे आयोजित शिबिरांना आज जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊ

सव्वा दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विकेंद्रित धान्यखरेदीचा लाभ

Image
             मुंबई दि. २४ :  विकेंद्रित धान्यखरेदी योजनेअंतर्गत सन २०१८-१९ जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्याची खरेदी करण्यात आली. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तत्काळ रकमा जमा करणे शक्य झाले आहे. विकेंद्रित धान्यखरेदी ( Decentralized Procurement - DCP) योजनेमध्ये शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केलेले धान्य लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी थेट सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडे पाठवत असते. यापूर्वी  रास्त भाव धान्य दुकानांना लागणारे धान पूर्वी भारतीय अन्न महामंडळामार्फत मिळत होते. हंगाम २०१६-१७ पासून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत विकेंद्रित खरेदी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पूर्वी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान हे भारतीय अन्न महामंडळाकडे जमा करण्यात येत होते. या योजनेअंतर्गत आता थेट लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये वितरित करण्यात येते. त्यामुळे धान उत्पादक जिल्ह्यात तयार होणाऱ्या तांदळाचा तत्काळ विनियोग करणे  शासनास शक्य झाले आहे. परिणामी ही योजना राबविताना होणारा कालापव्यय कमी झाला आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आ

वीज निर्मितीत वाढ झाल्याने राज्य भारनियमनमुक्त - चंद्रशेखर बावनकुळे

Image
         मुंबई ,  दि. 2 4  : गेल्या पाच वर्षात वीज निर्मितीत मुबलक वाढ झाल्याने राज्य भारनियमन मुक्त झाले असून सर्व भागांमध्ये अखंडित वीजपुरवठा सुरु करणे शक्य झाले आहे. अखंडित वीज पुरवठ्यामुळे कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने दररोज 8 ते 10 तास वीजपुरवठा शक्य झाला आहे. तसेच सौर कृषीपंप देऊन शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहाय्य केले जात असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.             2014-15 मध्ये सौरऊर्जा प्रकल्पाद्वारे जवळपास 50 मेगावॅट वाढ झाली. यात शिरसुफळ (ता.बारामती ,  जि.पुणे) येथे 36.33 मेगावॅट व 14 मे.वॅट सौरऊर्जा प्रकल्प ,  2014-15 मध्ये कार्यान्वित झाले. कोराडी , ( जि. नागपूर) येथील संच क्र.8 हा 660 मे.वॅटचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प डिसेंबर 2015 ला कार्यान्वित झाला. तर 2570 मे.वॅटचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प 2016-17 ला कार्यान्वित झाला. चंद्रपूर ,  परळी ,  कोराडी येथील प्रकल्पही कार्यान्वित झाले आणि वीज निर्मिती क्षमतेत 3280 मे.वॅट वाढ झाली.             महानिर्मितीच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण घटना 20 मे ,  2019 रोजी घडली. विविध वीज केंद्रातून रेकॉर्ड ब्रे

वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना 33 लाख एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर

Image
            मुंबई ,  दि. 22 : वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना 33  लाख 28 हजार 90 एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती ,  आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिली आहे.             वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना वैयक्तिक व सामूहिक वनहक्क मिळवण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या कायद्यानुसार 2019 अखेरपर्यंत अंतिमरीत्या 1 लाख 90 हजार 737 इतके वैयक्तिक व सामूहिक वन हक्क दावे मान्य करण्यात आले. प्रलंबित असलेले वन हक्क दावे व अपिले यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने विभागामार्फत विशेष "वनमित्र मोहीम" राबवण्यात आली. यामुळे जमिनीचे हक्क मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे.             सामूहिक वनहक्क प्राप्त झालेल्या 7 हजार 756 गावांपैकी 356 गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे स्वयंसेवी संस्थांमार्फत तयार करण्यात येत आहेत. उर्वरीत गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था ,  मुंबई विद्यापीठ य

बचतगटांना मिळाले ई - कॉमर्स व्यासपीठ बचतगटांची उत्पादने ‘ॲमेझॉन’वर

वाशिम, दि. २३ : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरु करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने थेट खरेदी करु शकतात. मागील काही वर्षात बचतगटांच्या चळवळीने अशी ऑनलाईन क्रांती अनुभवली आहे. ॲमेझॉन हे जागतिक पातळीवरील अग्रमानांकीत असे ई - कॉमर्स व्यासपीठ आहे. शॉपींगप्रेमींचे हे आवडते मोबाईल ॲप असून यावर दररोज मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्य शासनाने आता बचतगटांची उत्पादने या ॲपवर उपलब्ध करुन बचतगटांना मोठी बाजारपेठ मिळवून दिली आहे. नव तेजस्वीनी योजना ग्रामीण भागातील महिलांचा जीवनस्तर उंचावत त्यांच्या उद्यमशिलतेला वाव देत प्रगतीचा नवीन टप्पा त्यांच्या आयुष्यात यावा ,  यासाठी नवतेजस्वीनी योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नवतेजस्वीनी ग्रामीण महिला सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत  365  लोकसंस्थां ची उभारणी करुन त्या स्वबळावर उभ्या राहिल्या. नवतेजस्वीनी ग्रामीण उपजिवीका विकास हा  528  कोटी  55  लाख रुपये किंमतीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हा

रुग्णवाहिका ठरली चाकावरचे प्रसुतीगृह

Image
आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेमुळे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेमुळे राज्यभरात गेल्या पाच वर्षात सुमारे 42 लाख 45 हजार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. 108 क्रमांकाच्या या रुग्णवाहिकेत सुमारे 33 हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी 108 हा क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे. 2014 ते जुलै 2019 पर्यंत सुमारे 3 लाख 46 हजा

प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना नाव नोंदणी मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Image
वाशिम , दि. २३ : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान गावनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये व सामाईक सुविधा केंद्रांवर नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी या योजनेच्या नाव नोंदणीसाठी गाव पातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश तालुकास्तरीय यंत्रणांना दिले होते. तसेच या शिबिराला संबंधित गावाचे तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. या शिबिरामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या योजनेमध्ये १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकऱ्यांना सहभाग घेता ये

प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना लाभार्थी शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पेन्शन कार्ड वितरण

Image
·         नाव नोंदणीसाठी जिल्ह्याभर मोहीम सुरु ·         जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन वाशिम , दि. २२ : शेतकऱ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेमध्ये नाव नोंदणी केलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पेन्शन कार्डचे वितरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह ई-महासेवा केंद्रचालक व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. शंकर बाबाराव घुले, नवल बन्सीलाल जयस्वाल या शेतकऱ्यांना यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पेन्शन कार्ड वितरीत करण्यात आले. १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (एसएमएफ) या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुध्दा तरतुद या योजनेत आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी ज

शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणदूत बनून काम करावे !

Image
·         २८ हजार शालेय विद्यार्थांना होणार कापडी पिशव्यांचे वाटप ·         महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व माविमचा उपक्रम ·         बचत गटांच्या महिलांनी शिवलेल्या कापडी पिशव्या वाशिम , दि. २१ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यावतीने जिल्ह्यातील नगरपरिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या २८ विद्यार्थ्यांना कापडी पिशवीचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज येथील नगरपरिषद महात्मा गांधी विद्यालयातून झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले होते. शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणदूत बनून प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अमरावती प्रादेशिक अधिकारी श्री. कारणकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर, माविमचे जिल्हा समन्वयक राजेश नागपुरे, सहाय्यक समन्वयक समीर देशमुख, गटशिक्षणाधिकारी श्री. शिंदे, मुख्याध्यापक चंद्रकांत वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ

प्रधानमंत्री किसान मानधन योजना नाव नोंदणीसाठी गावनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·          २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान होणार शिबीर ·          जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाव नोंदविण्याचे आवाहन वाशिम , दि. २१ : प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणी व्हावी, यासाठी २३ ते २५ ऑगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात गाव पातळीवर विशेष नाव नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याकरिता सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी समन्वयाने काम करून जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणीसाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज वाकाटक सभागृहात झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कालावधीत आपले नाव नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रमेश कटके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांच्यासह तहसीलदार, सुविधा केंद्रांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, २५ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमं

प्रधानमंत्री किसान मानधन योजना नाव नोंदणीसाठी जिल्ह्यात आजपासून विशेष मोहीम

Image
·          १८ ते ४० वर्ष वयोगटातील अल्पभूधारक, सिमांत शेतकऱ्यांसाठी योजना ·          वयाची ६० वर्ष पुर्ण झाल्यानंतर मिळणार प्रतिमाह ३००० रुपये मानधन वाशिम , दि. २१ : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली आहे. १८ ते ४० वयोगटातील २ हेक्टर पर्यंत शेती असलेल्या सर्व अल्पभूधारक व सिमांत शेतकरी (एसएमएफ) या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थ्यांना वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर ३ हजार रुपये प्रतिमाह पेन्शन मिळणार आहे. लाभार्थ्याचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटूंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची सुध्दा तरतुद या योजनेत आहे. या योजनेसाठी नाव नोंदणी करण्यासाठी २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०१९ दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जाणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक एच्छिक तथा अंशदान पेन्शन योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला भारतीय जीवन बिमाद्वारे पेन्शन दिली जाईल. १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे व

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
वाशिम , दि. २० : मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएम यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट यंत्राच्या वापराबाबतची माहिती मतदारांना देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आजपासून जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली आहे. यानिमित्त तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, निवडणूक विभागातील नायब तहसीलदार श्री. पाटील, माधव शिंदे आदींची उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या कार्यप्रणालीची माहिती प्रत्येक मतदाराला व्हावी , यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापराची प्रात्यक्षिके मतदारांना दिली जाणार आहेत. याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर पथके स्थापन करण्यात आली आहेत.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी विविध पुरस्कारांचे वितरण

Image
वाशिम , दि. १५ : विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था यांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगारीबद्दल जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे, अव्वल कारकून नामदेव सुखदेव निमकंडे यांना यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना दिलेल्या सेवेबद्दल पोलीस नायक कैलास चिंतामण नागरे यांन आंतरिक सुरक्षा सेवा पदक पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी महसूल रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड यांच्या हस्ते राजरत्न अल्पसंख्याक

कृषि क्षेत्राच्या विकासाला शासनाचे प्राधान्य - पालकमंत्री संजय राठोड

Image
·           वाशिम येथे भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात ·           पालकमंत्र्यांचे जिल्हावासियांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन वाशिम ,  दि. १५ :  केंद्र व राज्यातील सरकार जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवीत आहे. कृषि क्षेत्राच्या विकासाला शासनाने प्राधान्य दिले आहे. शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी महसूल रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे,  उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर