Posts

Showing posts from September, 2021

जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद

Image
  जिल्हाधिकाऱ्यांकडून पीक नुकसानीची पाहणी शेतकऱ्यांशी साधला संवाद   वाशिम ,   दि.   30   (जिमाका) :   मागील काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीने सोयाबीन, तूर पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. हे 29 सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील मोहजा आणि रिसोड तालुक्यातील रिठद, आसेगांव (पेन), वरुड (तोफा) आणि बेलखेड शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार तालुका कृषि अधिकारी अनिल कंकाळ व चंद्रकांत उलेमाले प्रामुख्याने उपस्थित होते. वाशिम तालुक्यातील मोहजा शिवारातील अरुण कळणे आणि देविदास पडघान यांच्या शेताला भेट देवून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. पिक विमा काढला का याबाबत संबंधित शेतकऱ्यांना विचारणा केली. झालेल्या पिक नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी रिलायन्स कंपनीच्या तालुका प्रतिनिधीशी संपर्क साधावा.असे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सुचविले, यावेळी रिलायन्स विमा क

वन्यप्राण्यांकडून होणारे शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा - किशोर तिवारी

Image
वाशिम , दि. ०९ (जिमाका) : जिल्ह्यात वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी वन विभागाने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ९ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुधीर मैत्रवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. तिवारी म्हणाले, वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते आणि आर्थिक गणित कोलमडते. शेतपिकांचे नुसकान टाळण्यासाठी वन विभागाने उपाययोजना करणे आ

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
·           शेतपिकांचे नुकसान , गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा वाशिम ,   दि. ०९ (जिमाका) :   जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. एकाही नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतपिकाचे नुकसान पंचनाम्यातून सुटणार नाही , याची दक्षता घेण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज , ९ सप्टेंबर रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. , पोलीस अधीक्षक वसंत परदेशी , जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे , निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे , जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मापारी , जलसंधारण विभागाचे श्री. साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले , जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून कारंजा तालुक्यासह मानोरा तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जमा

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १४ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

  वाशिम ,   दि. ०३ (जिमाका) :   राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या धोरणानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय काम वाटप समितीमार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित बरोजगारांच्या सेवा सोसायटींना कंत्राटी तत्त्वावर काम वाटप करण्यात येते. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे मालेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सफाई कामगाराचे १ पद, मानोरा येथील दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) न्याय दंडाधिकारी यांचे कार्यालयातील सफाई कामगारचे १ पद, मंगरूळपीर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सफाई कामगाराचे १ पद, वाशिम येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सफाई कामगाराचे १ पद, कारंजा येथील शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र येथील सफाई कामगाराचे १ पद अशा विविध कंत्राटी प्रकारची पदे भरण्यासाठी मागणी प्राप्त झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणीकृत जिल्ह्यातील इच्छुक व पात्र सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायटींनी १४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपले प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कौशल्य वि

२६ हजार महिलांना मिळाला प्रधानमंत्री मातृ वंदनाचा लाभ

Image
·         १ ते ७ सप्टेंबर प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह वाशिम , दि. ०३ (जिमाका) : दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील सर्वच स्तरातील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागल्यास अशा गर्भवती महिला व माता कुपोषीत राहून त्यांच्या व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा महिलेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य चांगले राहावे , यासाठी केंद्र सरकारने १ जानेवारी २०१७ पासून संपूर्ण देशभर प्रधानमंत्री मातृ वंदना येाजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत २६ हजार ७८७ पात्र महिलांना १० कोटी ५७ लक्ष ४६ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या उद्दिष्टानुसार ९१ टक्के महिलांना लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. १ सप्टेंबर रोजी या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठ

सप्टेंबर महिन्यातील धान्य वितरणाचे परिमाण, दर जाहीर

वाशिम ,   दि. ०३ (जिमाका) :   जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना, एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांना धान्याचे वाटप दर व परिमाण जाहीर करण्यात आले आहे. अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिका १५ किलो गहू व २० किलो तांदुळ वितरीत केली जाणार आहे. याकरिता गहू प्रति किलो २ रुपये व तांदूळ प्रति किलो ३ रुपये दर राहील. प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ परिमाण असेल. तर गहू प्रतिकिलो २ रुपये व तांदुळ ३ रुपये किलो असा दर राहणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदुळ मोफत वितरीत करण्यात येणार आहे, असे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे.

मार्गदर्शक सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

Image
·          गणेशोत्सव मंडळांनी लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करावे ·          एक गाव-एक गणपती उपक्रम राबविण्याचे आवाहन ·          श्रीगणेश आगमन, विसर्जन मिरवणुकांना मनाई वाशिम , दि. ०३ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्य शासनाने २९ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून जिल्ह्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी जनजागृती करून लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले. गणेशोत्सव पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज, ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या संबंधित अधिकारी व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, राहुल जाधव, महावितरणचे कार्यकारी अ

जिल्ह्यात शनिवारी २१ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्वपरीक्षा

Image
·          ६७४४ उमेदवार देणार परीक्षा वाशिम ,   दि. ०२ (जिमाका) :   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब   पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ४ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम शहरातील १५ व मंगरूळपीर शहरातील ६ अशा जिल्ह्यातील एकूण २१ परीक्षा उपकेंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातून ६७४४ परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय ,   माउंट कारमेल इंग्लिश स्कूल , श्री शिवाजी विद्यालय , श्री तुळशीराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालय , सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय , एस. एम. सी. इंग्लिश स्कूल , हॅपी फेसेस हायस्कूल , श्री. बाकलीवाल विद्यालय , राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा , रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय , शासकीय तंत्र निकेतन , मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय , श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा , सरस्वती समाजकार्य महाविद्यालय , जवाहर नवोदय विद्यालय यासह मंगरूळपीर शहरातील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय , जिल्हा परिषद हायस्कूल , यशवंतराव चव्हाण विद्यालय , कलंदरिया उर्दू हायस्कूल , य

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्वपरीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Image
  वाशिम ,   दि. ०१ (जिमाका) :   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब   पूर्वपरीक्षा-२०२० शनिवार, ४ सप्टेंबर २०२१ रोजी वाशिम शहरातील १५ व मंगरूळपीर शहरातील ६ अशा जिल्ह्यातील एकूण २१   परीक्षा   उपकेंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. या २१   परीक्षा   उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय ,   माउंट कारमेल इंग्लिश स्कूल , श्री शिवाजी विद्यालय , श्री तुळशीराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालय , सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय , एस. एम. सी. इंग्लिश स्कूल , हॅपी फेसेस हायस्कूल , श्री. बाकलीवाल विद्यालय , राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा , रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय , शासकीय तंत्र निकेतन , मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय , श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा , सरस्वती समाजकार्य महाविद्यालय , जवाहर नवोदय विद्यालय यासह मंगरूळपीर शहरातील यशवंतराव चव्