Posts

Showing posts from September, 2022

निर्यात क्षेत्रातील संधीबाबत संमेलनातून तज्ञांनी केले मार्गदर्शन

Image
निर्यात क्षेत्रातील संधीबाबत संमेलनातून तज्ञांनी केले मार्गदर्शन        वाशिम, दि.   30  (जिमाका) :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उद्योग संचालनालय व सिडबी उद्योजकता विकास केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने नुकतेच विधाता प्रशिक्षण केंद्र, वाशिम येथे निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनात निर्यातदार व निर्यात क्षेत्राशी संबंधित तज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निर्यात क्षेत्रातील संधीचा लाभ घेवून जिल्हयातील उद्योजक, व्यावसायीक, शेतकरी व उत्पादक कंपनी यांनी आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.            संमेलनाचे उदघाटन सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांनी केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.डी. खंबायत, उद्योग निरीक्षक के.ए. शेख,  केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाचे नागपूर येथील सहायक संचालक डॉ. मनिष मोंढे, वाशिमचे कृषी विभागाचे उपसंचालक निलेश ठोंबरे, भारतीय स्टेट बँकेचे मुख्य अधिकारी स्वप्नील तभाणे, आशुतोष नाईक, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार, जिल्हा खादी ग्रामोद्यो

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या 9 आदर्श वस्त्यांची घोषणा

Image
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या 9 आदर्श वस्त्यांची घोषणा        वाशिम, दि.   30  (जिमाका) :  17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या कालावधीमध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या आदर्श वस्ती घोषीत करण्याबाबत समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नागमोरे यांनी सूचना दिल्या आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील वाशिम तालुक्यातील टणका, सुपखेला, मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ, कारंजा तालुक्यातील दिघी, दुघोरा व धनज (बु.), मानोरा तालुक्यातील सोमठाणा, आमगव्हाण, धानोरा (बु.) इत्यादी गावातील वस्त्या आदर्श वस्त्या म्हणून घोषीत करण्यात आल्या आहे.          अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक अनुसूचित जातीच्या वस्तीमध्ये पाणी पुरवठयाची कामे, मलनि:सारण, गटार बांधणे, रस्ते, पोच रस्ते, पावसाच्या पाण्याचा निचरा करणे, वीज पुरवठा, पेवर रस्ता व समाज मंदिर बांधणे इत्यादी पायाभूत सुविधा निर्माण करुन त्यांच्या सर्वांगीण विकासाची कामे करण्यात येतात.    

सेवा पंधरवडा दरम्यान शिबीरातून शिष्यवृत्ती प्रस्तावांचे संकलन

Image
सेवा पंधरवडा दरम्यान शिबीरातून शिष्यवृत्ती प्रस्तावांचे संकलन        वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी करीता पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती अंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वीच्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती संवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, इयत्ता 9 वी व 10 वी च्या अनुसूचित जातीच्या मुलांना भारत सरकार शिष्यवृत्ती, 10 परीक्षा फी/ गुणवत्ता शिष्यवृत्ती/ विद्यावेतन/ डिएनटी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती/ 1 ली ते 10 वी च्या इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती या शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 मध्ये ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या निमित्ताने या शिष्यवृत्ती प्रस्तावांच्या संकलनासाठी समाज कल्याण विभागामार्फत शिबीराचे आयोजन करण्यात आले असून मोठया प्रमाणात प्रस्ताव संकलीत करण्यात आले असल्याची माह

महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रा 15 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा

Image
महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रा 15 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा        वाशिम, दि.   30  (जिमाका) :  नागरीकांच्या नव संकल्पनांना मुर्तस्वरुप देण्यासाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्ट अप व नाविन्यता यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. ही यात्रा जिल्हयातील विविध तालुकास्तरावर चित्ररथासह प्रचार, प्रसिध्दीसाठी २५ ऑगष्ट ते ३ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल झालेली होती. यादरम्यान या जिल्हयातील नवउद्योजक किंवा युवक-युवतींनी जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धेत सहभागी होण्याकरीता  www.msins.in  किंवा    www.mahastartupyatra.in  या संकेतस्थळावर त्यांच्या नावांची नोंदणी केलेली आहे. या नोंदणीकृत उमेदवारांना वाशिम येथील राजस्थान आर्य कॉलेज येथे आयोजित सादरीकरण स्पर्धेत सहभागी होवून नव उदयोगासंबंधीची संकल्पना सादर करण्याची संधी मिळणार आहे.          जिल्हयातील ज्या उमेदवारांना १४ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होवून संकल्पना सादर करायची आहे, त्यांनी वरील संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन पध्दतीने पूर्व न

बीज प्रक्रीया करुनच रब्बी पिकांची पेरणी करा कृषी विभागाचे आवाहन

Image
बीज प्रक्रीया करुनच रब्बी पिकांची पेरणी करा कृषी विभागाचे आवाहन        वाशिम, दि.   30  (जिमाका) :   जिल्‍हयात सोयाबीन पिकाच्या कापणीला सुरुवात झाली असून सलग सोयाबीन ,  मुग ,  उडीद पिकाचे क्षेत्र कापणी झाल्‍यानंतर शेतकरी बांधव रब्‍बी पिकांच्‍या पेरणीचे नियोजन करतात. यामध्‍ये मुख्‍यतः हरभरा या रब्‍बी पिकास शेतकरी मोठया प्रमाणावर पसंती देतात. परंतू हरभऱ्याचे उत्‍पादन आणि बाजारातील दर याचा विचार करता हरभरापेक्षा करडई ,  मोहरी ,  जवस यासारखे कमी पाण्‍यावर येणारे व कमी मशागतीच्‍या पिकाची लागवड केल्‍यास हरभरा पिकापेक्षा निश्‍चीतच जास्‍त फायदा होईल. खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्‍त १०९ टक्के पाऊस झाल्‍यामुळे जमीनीत मुबलक प्रमाणात ओल असुन पाण्‍याची उपलब्‍धता आहे. त्‍यामुळे रब्‍बी पिकाच्‍या क्षेत्रात निश्चितच वाढ होईल. हरभरा व गहु या पांरपारीक रब्‍बी पिके घेण्‍यापेक्षा काही प्रमाणात रब्‍बी ज्‍वारी ,  करडई ,  जवस ,  मोहरी व मसुर या सारखी पिके घेण्‍याचे नियोजन करावे. जेणेकरुन पिकाची फेरपालट होऊन अधिक नफा मिळण्‍यास मदत होईल.             रब्‍बी पिके पेरणी करण्‍यापुर्वी बियाण्‍यास रासायन

2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान फिट इंडिया फ्रिडम रन

Image
2 ते 31 ऑक्टोबर दरम्यान फिट इंडिया फ्रिडम रन          वाशिम, दि.   30  (जिमाका) :  फिट इंडिया फ्रिडम रन 3 कि.मी. धावणे या उपक्रमाचे आयोजन युवा व खेल मंत्रालय, भारत सरकार यांच्या पुढाकारातून 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जिल्हयात करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने फिट इंडिया फ्रिडम रन उपक्रम पुढिल प्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मादिनानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने फिट इंडीया फ्रिडम रन 3 कि.मी. धावणे हा उपक्रम जिल्हयात व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे.          2 ऑक्टोबर रोजी प्लॉग रन आयोजित करून स्वच्छता आणि तंदुरुस्ती अशा दोन्ही बाबी साध्य करावयाच्या आहेत. पळणे/ जॉगिंग करत करत धावणे या वेळी रस्त्यात दिसणारा हाताने उचलता येईल असे कागदाचे कपटे/ कचरा उचलुन कचऱ्याच्या पिशवीत गारबेग बॅगमध्ये गोळा करुन स्वच्छता करण्यात येणार आहे. घरात बसुन कामकाज करणारे युवक- युवती, नागरीक व गृहीणी या सर्वांना देखील फ्रीडम रन या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ऑलिम्पियन खेळाडूंची टॉर्च रॅल

जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

Image
जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न        वाशिम, दि.   30  (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने व वाशिम जिल्हा कारागृह यांच्या सहकार्याने नुकतेच जिल्हा कारागृहात बंदीवानाकरीता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी न्या. एच. एम. देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, जिल्हा कारागृहाचे अधिक्षक पी. ओ. इंगळे, जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव अँड. एस. एन. खराटे यांची उपस्थिती होती.           कार्यक्रमामध्ये अॅड. जी. व्ही. गायकवाड यांनी विनंती सौदा या विषयावर उपस्थित कैदयांना मार्गदर्शन केले. अॅड. जे. बी. बाजड यांनी न्यायाधीन बंदी व कैदयांचे अधिकार व जमानतीच्या तरतुदी या विषयावर उपस्थित बंदिवानांना मार्गदर्शन केले. न्या. श्री. देशपांडे यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. संचालन व आभार वरिष्ठ तुरुंगाधिकारी भि. ना. राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कारागृहातील बंदीवान उपस्थित होते.                                                    

रोजगार निर्मिती आणि शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा - पालक सचिव श्री. नंदकुमार

Image
रोजगार निर्मिती आणि शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्यावा                                                                                   -   पालक सचिव श्री. नंदकुमार वाशिम ,  दि. 30 (जिमाका)  :   जिल्हयाचे मागासलेपण दूर करतांना गरीब कुटूंबांना रोजगार हमी  योजनेतून रोजगार उपलब्ध झाल्यास त्यांची आर्थिक स्थिती  सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामधून विकास कामे झालेली  दिसतील. शाळांतील मुलांच्या शैक्षणिक सुधारणेवर लक्ष देतांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे बघावे. एकंदरीतच जिल्ह्यात रोहयोतून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासोबतच शैक्षणिक गुणवत्तेवर यंत्रणांनी भर द्यावा. असे निर्देश मनरेगा व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव श्री. नंदकुमार यांनी दिले. आज 30 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात श्री. नंदकुमार यांनी कुपोषीत मुलांच्या तसेच शाळेत नियमित उपस्थित न राहणाऱ्या मुलांच्या पालकांना मनरेगातून काम देणे आणि पालांवर राहणाऱ्या मुलांच्या सर्वेक्षणाचा आढावा आयोजित सभेत घेतला. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस., जिल्हा प

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडानिमित्तसमाज कल्याण कार्यालयाच्या वतीने 485 ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी

Image
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडानिमित्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने 485 ज्येष्ठ नागरीकांचे आरोग्य तपासणी        वाशिम, दि.   29  (जिमाका) :  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, वाशिम, सावित्रीबाई नर्सींग महाविद्यालय व संत गजानन महाराज संस्थान, वाशिम यांच्या संयुक्त वतीने आय.यु.डी.पी. कॉलनी येथील संत गजानन महाराज मंदीर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आज 29 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरीक श्रीमती सुशीलाबाई जाधव होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, माजी आमदार अॅड. विजयराव जाधव, गजानन महाराज संस्थानचे संचालक दयाराम राऊत, सावित्रीबाई नर्सींग महाविद्यालयाचे संचालक वसंतराव धाडवे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची प्रामुख्याने उपस्थि‍ती होती.          कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरीक श्रीमती सुशिलाबाई जाधव यांची आरोग्य तपासणी करून इतर उपस्थित जेष्ठ नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडातील कॅल्शीयम तसेच इतर आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात ४८५ जेष्ठ नागरिकांची तपासणी करुन डॉक्टरांनी त्यांना आ

सेवा पंधरवडा दरम्यान स्वाधारच्या 103 अर्जातील त्रृटीची पुर्तता

Image
सेवा पंधरवडा दरम्यान स्वाधारच्या 103 अर्जातील त्रृटीची पुर्तता        वाशिम, दि.   29  (जिमाका) :  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील सन 2020-21 आणि सन 2021-22 मधील 173 अर्ज त्रृटी पुर्ततेसाठी प्राप्त झाले. या अर्जादार विद्यार्थ्यांशी संपर्क करुन 27 ते 29 सप्टेंबर रोजी 103 विद्यार्थ्यांच्या त्रृटी अर्जातील पुर्तता करुन अर्ज पात्र करण्यात आले. सन 2020-21 आणि सन 2021-22 मधील पात्र 2065 विद्यार्थ्यांपैकी 1583 विद्यार्थ्यांना 4 कोटी 2 लक्ष 19 हजार इतका निधी वाटप करण्यात आला. सद्यस्थितीत स्वाधार योजनेकरीता पात्र असलेल्या परंतू लाभ न मिळालेल्या एकूण 799 विद्यार्थ्यांकरीता 3 कोटी 93 लक्ष 68 हजार इतक्या निधीची मागणी वरिष्ठ कार्यालयाला करण्यात आली आहे. स्वाधार योजनेकरीता निधी प्राप्त होताच विद्यार्थ्यांना लाभाची रक्कम अदा करणार असल्याची माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.                      

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडाफुले महिला महाविद्यालयात सेवायोजन कार्डचे वितरण

Image
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा फुले महिला महाविद्यालयात सेवायोजन कार्डचे वितरण        वाशिम, दि. 29 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशिम येथे 28 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयातील 40 विद्यार्थीनींना सेवायोजन कार्डचे वितरण करण्यात आले.           सेवा पंधरवडा निमित्ताने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करणे, स्वयंरोजगार व्यावसायीक माहिती देणे, व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करणे, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे, रोजगार मेळावे आयोजित करणे तसेच जे उमेदवार आपला स्वयंरोजगार सुरु करु ईच्छीतात अशा मराठा समाजातील उमेदवारांकरीता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत १२ टक्केच्या मर्यादेत

राज्य निवडणूक आयोगाचा सुधारीत कार्यक्रमकेकतऊमरा ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक 16 ऑक्टोबरला मतदान व 17 ऑक्टोबरला मतमोजणी

Image
राज्य निवडणूक आयोगाचा सुधारीत कार्यक्रम केकतऊमरा ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक 16 ऑक्टोबरला मतदान व 17 ऑक्टोबरला मतमोजणी        वाशिम, दि.   29  (जिमाका) :  वाशिम तालुक्यातील केकतउमरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार होते. राज्य निवडणूक आयोगाकडून या ग्रामपंचायत निवडणूकीचा सुधारीत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता सुधारीत कार्यक्रमानूसार या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी या निवडणूकीची मतमोजणी होऊन निकाल घोषीत होणार आहे.                                                                                                                                         *******

लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील 1 लक्ष 65 हजार गुरांचे लसीकरण

Image
लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील 1 लक्ष 65 हजार गुरांचे लसीकरण · आतापर्यंत 13 जनावरांचा मृत्यू · 45 गावातील 352 गुरे बाधित · 160 गुरे उपचारातून बरी 179 गुरांवर उपचार सुरु        वाशिम, दि. 29 (जिमाका) : जिल्हयातील एकूण 1 लक्ष 68 हजार 91 पशुधन असून त्यापैकी आजपर्यंत 1 लक्ष 65 हजार 616 गुरांचे लम्पी प्रतीबंधक लसीकरण करण्यात आले आहे. जिल्हयात सर्व सहाही तालुक्यात आतापर्यंत 45 गावातील 352 गुरांना लम्पी चर्मरोगाची बाधा झाली. त्यापैकी 13 जनावरांचा लम्पी चर्मरोगाने मृत्यू झाला. लम्पी चर्मरोगाला नियंत्रणात आणण्यासाठी शासन प्रशासनाकडून प्रभावी उपायोजना करण्यात येत आहे. जिल्हयात आतापर्यंत औषधोपचारातून 160 गुरे बरी झाली असून 179 गुरांवर उपचार सुरु आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून तसेच पशुसंवर्धन विभागाने देखील गुरांचे लसीकरण केले.           जिल्हयातील 45 गावातील 352 गुरे लम्पी बाधित आढळून आल्याने या गावांच्या 5 किलोमीटर परिघातील 203 गावातील गुरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण तातडीने करण्यात आले. जिल्हयात लम्पी त्वचारोगाचा संसर्ग अन्य जनाव

अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांची विद्यार्थ्यांना माहिती द्यावी षण्मुगराजन एस.

Image
अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांची विद्यार्थ्यांना माहिती द्यावी षण्मुगराजन एस. वाशिम दि.29 (जिमाका) अंमली पदार्थाच्या सेवन व वापरावर आळा घालण्यासाठी आणि अंमली पदार्थ ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने नार्को-ऑर्डिनेशन सेंटर समिती गठित करून काम करण्याचे निर्देश दिले आहे.जिल्ह्यातील कोणताही युवक हा अंमली पदार्थ सेवनाच्या आहारी जाऊ नये यासाठी त्याच्या दुष्परिणामाची माहिती शाळा व महाविद्यालयाच्या माध्यमातून कार्यशाळेच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना द्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.           आज २९ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय नार्को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची सभा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.त्यावेळी ते बोलत होते.सभेला अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक शैलेश मीणा,जिल्हा आरोग्य अधिकारी सुहान कोरे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ,अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषध) व्ही.डी. सुलोचने,वाशिम उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव,उपशिक्षणाधिकार

श्रीमती वसुमना पंत यांची शिवणी येथील सीएससी केंद्राला भेट

Image
श्रीमती वसुमना पंत यांची शिवणी येथील सीएससी केंद्राला भेट          वाशिम, दि.   28  (जिमाका) :  प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा जिल्ह्यातील सर्वच पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र आणि सीएससी केंद्राच्या माध्यमातून आयुष्यमान भारतचे ई-कार्ड तयार करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आज २८ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड येथील ग्रामपंचायतमधील सीएससी केंद्राला भेट देऊन ई-कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, गटविकास अधिकारी श्री. अवगण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद भगत, बाल विकास प्रकल्प अधिकारी नितीन लुंगे व सरपंच लल्लू गारवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.        प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. सर्व लाभार्थ्यांना सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ई-कार्ड मोफत तयार करून देण्याचे काम जिल्ह्यात सध्या सुरू आहे. ई-कार्

१४ व १५ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावाउद्योग व आस्थापना प्रमुखांनी सहभागी व्हावे रिक्त पदांच्या मनुष्यबळासाठी मागणी पत्र सादर करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
१४ व १५ ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावा उद्योग व आस्थापना प्रमुखांनी सहभागी व्हावे रिक्त पदांच्या मनुष्यबळासाठी मागणी पत्र सादर करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन        वाशिम, दि. 28 (जिमाका) : कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून " महाराष्ट्र स्टार्टअप, रोजगार उद्योजकता सप्ताह " १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने राज्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १४ व १५ ऑक्टोबर रोजी वाशिम येथील राजस्थान आर्य महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.          जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम या कार्यालयाकडून जिल्ह्यातील नोकरी इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील नियोक्ते/ आस्थापना प्रमुखांना त्यांच्या आस्थापनातील रिक्त पदांवर मनुष्यबळ घेण्याकरिता मागणी पत्र सादर करावे.         ज्या उद्योगात किंवा आस्थापनांवर रिक्त प

श्रीमती वसुमना पंत यांची शिवनी अंगणवाडीला भेट

Image
श्रीमती वसुमना पंत यांची शिवनी अंगणवाडीला भेट  वाशिम दि.28 (जिमाका) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आज २८ सप्टेंबर रोजी मंगरूळपीर तालुक्यातील शिवनी रोड येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांनी दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या शारदा वडसे यांचे अभिनंदन केले. अंगणवाडी केंद्राची पाहणी करून त्यांनी उपस्थित बालकांशी संवाद साधला.पोषण आहाराबाबत देखील चर्चा केली.गावात बेटी बचाव बेटी पढाओ आणि माझी कन्या भाग्यश्री योजनेची प्रभावी प्रचार - प्रसिद्धी करण्याच्या तसेच पात्र मातांना योजनांचा लाभ देण्याबाबत सूचना केल्या.        यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, गटविकास अधिकारी श्री.अवगण, बाल विकास प्रकल्प अधिकारी नितीन लुंगे, सरपंच श्री.गारावे,अंगणवाडी सेविका व मदतनीस यावेळी उपस्थित होत्या.

समाज कल्याण कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा

Image
समाज कल्याण कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा       वाशिम, दि.   28  (जिमाका) :  सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, वाशिम येथे माहिती अधिकार दिन आज 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ होते. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे अंतर्गत कलम 26 (1) (क) व (ख) अन्वये या अधिकाराबाबत सर्व सामान्य नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.            यावेळी श्री. वाठ यांनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी माहिती अधिकाराअंतर्गत माहिती अधिकाराची प्रक्रीया तातडीची व सुटसुटीत असावी. अपीलार्थीसुध्दा जागरुक असणे गरजेचे आहे. कार्यालयाकडून सामान्य नागरीकास माहिती मागविण्याची पध्दती आणि शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना माहिती देण्याची पध्दती याविषयी जागरुक करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.   *******

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी मदत करा निक्षय पोर्टलवर निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी मदत करा निक्षय पोर्टलवर निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन       वाशिम, दि.   28  (जिमाका) :  राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पूर्वी देशातून क्षयरोगाचे निमुर्लन करण्यासाठी नवीन क्षयरुग्णांची सद्यस्थितीत १८८ रुग्ण प्रति १ लक्ष लोकसंख्येपासून हे प्रमाण ४४ रुग्ण प्रति लक्ष लोकसंख्यापर्यंत व क्षयरोगामुळे होणारे मृत्युचे प्रमाण सद्यस्थितीतील ३६ रुग्ण प्रति १ लक्ष लोकसंख्येपासून ते प्रमाण ३ रुग्ण प्रति १ लक्ष लोकसंख्येपर्यंत कमी करायचे आहे. त्या अनुषंगाने समाजातील विविध घटकांचा सक्रीय सहभाग वाढवून क्षयरुगांना पोषण आहार, निदान सुविधा व व्यावसायीक पुनर्वसन या बाबीकरिता अतिरिक्त मदत मिळवून देणे व त्यासाठी सीएसआर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे हा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचा महत्वाकांक्षी उद्देश आहे.          क्षयरोग विरोधात लढा उभा करण्यासाठी सामाजिक सहभाग वाढविणे, लोकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, क्षयरोगाविषयी स्टिगमा दूर करणे, क्षयरोगग्रस्त व त्यां

ई- कार्ड तयार करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांची रिठद व आसेगाव येथील सीएससी केंद्राला भेट

Image
ई- कार्ड तयार करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांची रिठद व आसेगाव येथील सीएससी केंद्राला भेट       वाशिम, दि.   28  (जिमाका) :  जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्र आणि सीएससी केंद्राच्या माध्यमातून ई - कार्ड तयार करण्याचे सुरू आहे. ई -कार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज २८ सप्टेंबर रोजी रिसोड तालुक्यातील रिठद आणि आसेगाव (पेन) येथील सीएससी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, तहसीलदार अजित शेलार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रामहरी बेले व आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ रणजीत सरनाईक यांची उपस्थिती होती.        प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. सर्व लाभार्थ्यांना सीएससी/आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ई- कार्ड मोफत तयार करून देण्याचे काम जिल्ह्यात सध्या सुरू आहे. ई - कार्ड तयार करून देण्याची प्रक्रिया या केंद्राच्या माध्यमातून वेगाने पूर्ण व्हावी यासाठी जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन हे लाभार्थी आणि सीएससी/

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत मिळणार अर्थसहाय्य

Image
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत मिळणार अर्थसहाय्य        वाशिम, दि.   28  (जिमाका) :  फलोत्पादन पिकांचे मुल्यवर्धन/प्रक्रीया करून शीतगृहांमध्ये साठवणूक करून फलोत्पादन पिके/ त्यांचे पदार्थ वर्षभर सर्व हंगामात उपलब्ध होऊ शकतात, ही बाब लक्षात घेऊन एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकाअंतर्गत एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी प्रकल्पांची उभारणीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.           उत्पादित फलोत्पादन, औषधी, सुगंधी माचाली साफसफाई, प्रतवारी व पॅकिंग करून दर्जा कायम ठेवून साठवणूक कालावधी वाढविणे तसेच मोठया प्रमाणावर फलोत्पादन पिकांच्या मालाची आवक वाढवून बाजार मूल्य शेतकऱ्यांना कमी मिळते या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकात्मिक पॅक हाऊस, पुर्व शीतकरण गृह, शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, रायपनिंग चेंबर व एकात्मिक शीतसाखळी आदी प्रकल्पांना प्रोत्साहन व अर्थसहाय्य देण्यात येते.          काढणीपश्चात व्यवस्थापन घटकांतर्गत आकारमाननिहाय देण्यात येणारे अ

आयुष्मान भारत ई-कार्डसाठी लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्रात नोंदणी करावी

Image
आयुष्मान भारत ई-कार्डसाठी लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र व सीएससी केंद्रात नोंदणी करावी ·         1209 आजारावरील उपचार व शस्त्रक्रीया मोफत ·         26 हजार 398 लाभार्थ्यांवर 66 कोटी 41 लक्ष रुपये खर्च        वाशिम, दि.   28  (जिमाका) :  सन 2011 च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्व्हेक्षणातून जिल्हयातील लाभार्थ्यांची जन आरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्हयात या योजनेसाठी 4 लक्ष 45 हजार 671 लाभार्थी पात्र ठरले आहे. 23 सप्टेंबर 2018 पासून आजपर्यंत 1 लक्ष 30 हजार 416 लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे ई-कार्ड/गोल्डन कार्ड काढले आहे. कोविडमुळे दोन वर्ष या योजनेत लाभार्थ्यांचा सहभाग कमी होता. उर्वरीत 3 लक्ष 15 हजार 255 लाभार्थ्यांचे ई-कार्ड काढणे बाकी आहे. जिल्हयातील 1041 सीएससी केंद्र आणि 353 आपले सरकार सेवा केंद्रातून हे ई-कार्ड/गोल्डन कार्ड काढण्याची मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. तरी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन मोफत स्वरुपात ई-कार्ड/ गोल्डन कार्ड काढून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुराजन एस. आणि जिल्हा परिषदे

रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठीआवश्यक उपाययोजना करा -षण्मुगराजन एस.

Image
रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा                                                  -षण्मुगराजन एस. जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सभा        वाशिम, दि. 27 (जिमाका) : जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्ग जातात. या मार्गावरुन जाणारी वाहने भरधाव वेगाने मार्गक्रमण करतात. संबंधित विभागाने आवश्यक त्या ठिकाणी गतीरोधक बसविण्याची कार्यवाही करण्यासाठी घटनास्थळी भेट दयावी. गतीरोधक दर्शविणारे फलक लावून रस्त्यांवरील असलेले खड्डे बुजविण्याचे काम प्राधान्याने करावे. अपघात घडल्यास जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन दयावे. संबंधित यंत्रणांनी रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी दिले.           जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची सभा 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सभेला सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम., अतिरिक्त पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उप प्राद

जिल्हा कृती दल समितीची सभा संपन्न

Image
जिल्हा कृती दल समितीची सभा संपन्न        वाशिम, दि. 27 (जिमाका) : जिल्हयात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांना तसेच विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने आज 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली वाकाटक सभागृहात मिशन वात्सल्य समितीअंतर्गत जिल्हा कृती दल समितीची सभा संपन्न झाली. या सभेला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. अलका मकासरे, सदस्य डॉ. मंजुश्री जांभरुणकर, विनोद पट्टेबहादूर, बालाजी गंगावणे, ॲड. अनिल उंडाळ, प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियंका गवळी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. विजय काळबांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी) मिनाक्षी भस्मे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी व सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची उपस्थिती होती.            श्री. षण्मुगराजन म्हणाले, कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व विधवा झाले

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पिक व योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पिक व योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा        वाशिम, दि.   26  (जिमाका) :  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हास्तरीय बँकर्सच्या सभेत खरीप पिक कर्जासह विविध महामंडळाच्या तसेच विभागाच्या योजनांच्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेतला. यावेळी सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.डी. खंबायत, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, विविध बँकाचे जिल्हा समन्वयक, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.           श्री. षण्मुगराजन म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज वाटपाकडे विशेष लक्ष दयावे. अनेक बँकांनी पिक कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित बँकांच्या वरिष्ठांना कळविण्यात येईल. बँकांनी बचतगटांचे खाते कागदपत्रांची पुर्तता करुन प्राधान्याने उघडावेत. विविध यंत्रणांशी संबंधित कर्ज प्रकरणे त्वरीत मंजूर होण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणा प्रमुखांन

शिष्यवृती योजना ऑफलाईन 2 ऑक्टोबरपर्यंत अर्ज संकलीत करावे

Image
शिष्यवृती योजना ऑफलाईन 2 ऑक्टोबरपर्यंत अर्ज संकलीत करावे       वाशिम, दि.   26  (जिमाका) :  जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत इयत्ता 1 ली ते 10 वी करीता पुर्व शिष्यवृती अंतर्गत 1 ली ते 10 वीच्या अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती या संवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृती, इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या अनुसूचित जातीच्या मुलांना भारत सरकार शिष्यवृती तसेच इयत्ता 10 वी परीक्षा फी, गुणवत्ता शिष्यवृती, विद्यावेतन, डीएनटी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृती, इयत्ता 1 ली ते 10 वीच्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृती या शिष्यवृती योजना सन 2022-23 या वर्षात ऑफलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. तरी सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांचे अर्ज संपूर्ण आवश्यक कागदपत्रांसह 2 ऑक्टोबरपर्यंत संकलीत करावे. विद्यार्थी शिष्यवृतीच्या लाभापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घ्यावी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचा लाभ देण्य

28 सप्टेंबरला विधाता येथे निर्यात संमेलन

Image
28 सप्टेंबरला विधाता येथे निर्यात संमेलन       वाशिम, दि.   26  (जिमाका) :  जिल्हयाचे मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्हयात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढावी, एक जिल्हा एक उत्पादनाला जिल्हयात चालना मिळावी. तसेच जिल्हयात उत्पादित वस्तूंची मोठया प्रमाणात निर्यात करण्याच्या अनुषंगाने जिल्हा उद्योग केंद्र आणि लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडिया अर्थात सिडबीच्या संयुक्त वतीने 28 सप्टेंबर रोजी वाशिम नगर परिषदेजवळील विधात सभागृह येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत निर्यात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उदघाटन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे करतील.          या संमेलनात कृषी क्षेत्रातील निर्यात संधी, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाच्या योजना, तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे यासह अन्य विषयावर तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे नागपूर येथील सहाय्यक संचालक डॉ. मनिष मोंढे, अमरावतीचे कृषी सहसंचालक के.एस. मुळे, कृषी विभाग, वाशिमचे उपसंचालक निलेश ठोंबरे, संकेत रहाटिया, माधव चाकोलकर, सिडबीचे औरंगाबाद येथील सहायक महाव्यवस्थाप

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा

Image
प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान क्षयरुग्णांना सामुदायीक सहाय्यासाठी निक्षय मित्र म्हणून नाव नोंदवा       वाशिम, दि.   26  (जिमाका) :  भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत उद्दिष्टपूर्तीसाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सन २०२५ पर्यंत " क्षयरोग मुक्त भारत " उद्दिष्टपूर्तीसाठी या योजनेअंतर्गत क्षयरुग्णांना सामुदायिक सहाय्य हा आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे. ज्याव्दारे क्षयरुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील विविध भागधारक सहकारी, उद्योगक्षेत्र, निवडून आलेले लोकप्रतिनिधी, वैयक्तिक, सामाजिक संस्था क्षयरुग्णांना सहाय्य देऊन मदत करुन आपण निक्षय मित्र बनू शकतो.          9 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला आहे. यामध्ये निक्षय मित्र बनून त्यांच्यावतीने क्षयरुग्णांना 1 ते 3 वर्षासाठी कोरडा आहार पुरविण्यात येऊ शकतो. जिल्हयात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाला सहक