लम्पी बाधीत 18 पशूंवर उपचार सरु· 12 गावातील 3819 पशुंचे लसीकरण· समाज माध्यमातील अफवांवर विश्वास ठेवू नका
- Get link
- X
- Other Apps
लम्पी बाधीत 18 पशूंवर उपचार सरु
· 12 गावातील 3819 पशुंचे लसीकरण
· समाज माध्यमातील अफवांवर विश्वास ठेवू नका
पशूसंवर्धन विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 15(जिमाका) जिल्हयात आतापर्यत लम्पी या चर्मरोगाची बाधा 34 जनावरांना झाली. त्यापैकी 1 जनावराचा मृत्यू झाला. 15 जनावरे औषधोपचार व लसीकरणतून बरे झाले असून 18 पशूंवर उपचार सुरु असून 12 गावातील 3819 जनावराचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशूंसवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे यांनी दिली.
जिल्हयात 1 लाख 68 हजार 91 गाई तर 53 हजार 826 म्हशी आहेत. रिसोड तालुक्यातील वाकद येथे 15 खडकी (सदार) येथे 5, वाशिम तालुक्याती कामठवाडा येथे 1 आणि मंगरुळपीर तालुक्यातील नागी येथे 1 पशूला लम्पीची बाधा झाली. ज्या गावांमध्ये लम्पीमुळे बाधीत जनावरे आढळून आली अशा गावांतील 5 किलोमीटरच्या परिघातील 12 गावातील 3819 जनांवराचे लसीकरण करण्यात आले. जिल्हयातील अनेक ग्रामपंचायतीनी गुरे व म्हैस वर्गीय जनावरांचे लसीकरण ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे.
लम्पी रोगाबाबत समाज माध्यमातून गैरसमज पसरविण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांनी आणि पशूपालकांनी यावर विश्वास ठेवू नये. लम्पी झालेल्या जनावरांचे दूध हानीकारक नाही. ते पिण्यास योग्य आहे माणसाला जनावरांपासून लम्पी आजाराचा संसर्ग होत नाही. तसेच कोंबड्या व बकऱ्यांवर लम्पीचा संसर्ग होत नाही. त्यामुळे त्यांचे मास खाण्यास कोणतीही भिती बाळगू नये असे आवाहन डॉ. वानखेडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची नागी येथे भेट
लम्पी बाधित जनावराची पाहणी
जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी आज 15 सप्टेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील नागी गावाला भेट देवून प्रतिक चुमळे यांच्या लम्पीबाधित गुराची पाहणी केली. यावेळी पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. भूवनेश्वर बोरकर, जिल्हा पशूसंवर्धन डॉ. विनोद वानखेडे, पशूसंवर्धन आयुक्तालय पुणेचे डॉ. पवार, नागीच्या सरपंच सुवर्णा वानखेडे, शेलू (बाजार) पशूवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. नागरे, डॉ. श्रीमती थोरात व डॉ. गणेश यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
गावातील इतर जनावरांना लम्पीचा संसर्ग होणार नाही याबाबतची दक्षता घेवून गोठ्यांची फवारणी व स्वच्छता करण्यात यावी. गावातील सर्व गाई, म्हैस व बैलांचे लसीकरण तात्काळ करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्री. षन्मुगराजन यांनी यावेळी दिल्या. गावातील कोणत्याही गुराला या आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरीत नजीकच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी घेवून जावे. ग्रामपंचायतीने दवंडीच्या माध्यमातून ग्रामस्थ व पशूपालकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करण्यात यावी.असे श्री. षन्मुगराजन यांनी सांगितले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment