राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडानिमीत्त नॅझरीन नर्सींग विद्यालयात 37 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडानिमीत्त

नॅझरीन नर्सींग विद्यालयात 37 ज्येष्ठ नागरिकांची

आरोग्य तपासणी

        वाशिम, दि. 22 (जिमाका) :  १७ सप्टेबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्यानिमीत्ताने आज २२ सप्टेंबर रोजी वाशिम येथील नॅझरीन नर्सींग विद्यालयात ज्येष्ठ नागरिकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरीक अब्दुल रशीद अब्दुल रजाद, नॅझरीन नर्सींग महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती रज्वीला असेरा आर., समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त मारुती वाठ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ नागरिक अब्दुल रशीद अब्दुल रजाद यांची प्रथम आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर एकूण ३७ जेष्ठ नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडातील कॅल्शियम तसेच इतर आरोग्य तपासणी करुन डॉक्टरांनी आरोग्यविषयक सल्ला दिला. यावेळी श्याम मोरे यांनी महाविद्यालयातील उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना स्वाधार योजनेविषयी माहीती दिली. कार्यक्रमाला समाज कल्याण निरीक्षक राहुल शिरभाते, संध्या देखणे, श्रीमती गायकवाड, श्याम मोरे व नॅझरीन नर्सींग महाविद्यालयातील प्रशिक्षक, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे