जिल्हा परिषद सेस फंड योजना पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे जि.प.समाज कल्याण विभागाचे आवाहन

जिल्हा परिषद सेस फंड योजना 

पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे

जि.प.समाज कल्याण विभागाचे आवाहन

वाशिम,दि.२० (जिमाका) वाशिम जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने सन २०२१-२२ व २२-२३ मधील ५ टक्के सेस फंड या योजनेचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
    २५ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभेमध्ये झालेल्या चर्चेनुसार पात्र दिव्यांग लाभार्थी हा दोन्ही डोळयांनी अंध असल्यास लाभार्थ्याला इलेक्ट्रीक काठी,दोन्ही पायांनी दिव्यांग लाभार्थ्यास इलेक्ट्रीक सायकल, कानानी ऐकू येत नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यास कानाची मशीन पुरविणे, दिव्यांग गरजुंना लॅट्रीन चेअर पुरविणे, व्हील चेअर पुरविणे,त्याला उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणुन पिठगिरणी पुरविणे आदी योजना
राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.    
          तरी गरजू असलेल्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यात १५ ऑक्टोबरपर्यंत विविध साहित्य व योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करावा.या योजनेचे अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे.असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे