जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
- Get link
- X
- Other Apps
जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
वाशिम, दि. 30 (जिमाका) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने व वाशिम जिल्हा कारागृह यांच्या सहकार्याने नुकतेच जिल्हा कारागृहात बंदीवानाकरीता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी न्या. एच. एम. देशपांडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, जिल्हा कारागृहाचे अधिक्षक पी. ओ. इंगळे, जिल्हा विधिज्ञ संघाचे सचिव अँड. एस. एन. खराटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये अॅड. जी. व्ही. गायकवाड यांनी विनंती सौदा या विषयावर उपस्थित कैदयांना मार्गदर्शन केले. अॅड. जे. बी. बाजड यांनी न्यायाधीन बंदी व कैदयांचे अधिकार व जमानतीच्या तरतुदी या विषयावर उपस्थित बंदिवानांना मार्गदर्शन केले. न्या. श्री. देशपांडे यांनी उपस्थितांना कायदेविषयक मार्गदर्शन केले. संचालन व आभार वरिष्ठ तुरुंगाधिकारी भि. ना. राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कारागृहातील बंदीवान उपस्थित होते.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment