Posts

Showing posts from April, 2024

शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी विभागास सूचना

Image
शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या  जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या  खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी विभागास सूचना  वाशिम, दि. ३० (जिमाका) : जिल्हयात  खरीप हंगामात विवि‍ध पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांना या खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते योग्यवेळी उपलब्ध करुन देवून त्यांची खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षताघ्यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले.            खरीप हंगाम २०२४ पुर्वतयारी आढावा बैठक २९ एप्रिल रोजी वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. सभेकरीता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांच्यासह जिल्हयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख व कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञांची  उपस्थिती होती.       सभेमध्ये माहितीचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा यांनी केले. खरीप हंगाम २०२४ ची पुर्वतयारी म्हणुन ४ लाख ५ हजार १८० हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले असुन यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ३ लाख ७ हजार

आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.मान्सूनपूर्व आढावा सभेतआपत्ती व्यवस्थापन माहितीपत्रकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

Image
आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे                                            जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. मान्सूनपूर्व आढावा सभेत आपत्ती व्यवस्थापन माहितीपत्रकाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन         वाशिम, दि. २९ (जिमाका) : पावसाळ्याच्या दिवसात येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले.            आज २९ एप्रिल रोजी मान्सूनपूर्व तयारीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या.सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर व निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.            श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, पावसाळ्याच्या दिवसात संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे.जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी.विजेला अट

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक **सायंकाळी 5 वाजतापर्यंत 54.04 टक्के मतदान**वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधान सभा मतदार संघात 52.74 टक्के मतदान*

Image
*यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ निवडणूक* *सायंकाळी 5 वाजतापर्यंत 54.04 टक्के मतदान* *वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधान सभा मतदार संघात  52.74 टक्के मतदान* यवतमाळ/वाशिम, दि. 26 (जिमाका) : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज जिल्हाभर मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी महिला, पुरुष, नवमतदार, दिव्यांग मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसत होते. सायंकाळी 5 वाजता पर्यंत एकून 54.04 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी अधिक प्रमाणात मतदान होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकून 19 लाख 40 हजार 916 इतके मतदार आहे. त्यात पुरुष 10 लाख 2 हजार 400, महिला 9 लाख 38 हजार 452 तर इतर 64 मतदारांचा समावेश आहे. आज मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5 वाजतापर्यंत 10 लाख 48 हजार 857 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष मतदार 5 लाख 59 हजार 248, महिला मतदार 4 लाख 89 हजार 588 तर इतर 21 मतदारांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात यवतमाळ वाशिम लो

जिल्ह्यात सर्वदूर मतदानाचा जागर मतदार उत्साहित यंत्रणा सज्ज

Image
जिल्ह्यात सर्वदूर मतदानाचा जागर  मतदार उत्साहित  यंत्रणा सज्ज  आपले अस्तित्व सिद्ध करण्याची हीच सुवर्णसंधी          जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांसोबत निरनिराळे व आकर्षक उपक्रम वाशिम,दि.२५ (जिमाका) मतदान प्रक्रिया ही लोकशाहीला परिपक्व करणारी आहे आपले मतदान आपले अधिकार वापरणे हे आपले अस्तित्व सिद्ध करण्याची सुवर्णसंधी आहे त्यामुळे २६ एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने आपल्या अधिकार बजावून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.  मतदानाचा दिवस हा सण आणि उत्सव सारखा साजरा करावा. प्रत्येका मतदाराने स्वतःही मतदान करावे आणि आपल्या ओळखीतल्या सर्व पात्र मतदारांना मतदान करण्यास प्रेरित करावे असेही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.   जिल्हा प्रशासन या लोकसभा निवडणुकात जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे यापूर्वी गृह मतदानाच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वृद्ध आणि दिव्यांग मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्

मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

Image
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज 1 हजार 76 मतदान केंद्रांवर 7 हजार 719 कर्मचारी नियुक्त चोख पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध वाशिम, दि.24 (जिमाका)लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 अंतर्गत दुस-या टप्प्यातील मतदानासाठी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया शुक्रवार दि.26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विविध माध्यमातून जनजागृती केली आहे. जिल्ह्यातील नव मतदार आणि महिलांनीही या लोकशाही उत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले मतदानाचे अधिकाराचे वापर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी केले आहे. जिल्ह्यात एकूण 9 लाख 79 हजार 237 मतदार आहेत. त्यापैकी 5 लाख 10 हजार 814 पुरुष, 4 लाख 68 हजार 407 महिला तर 16 तृतीयपंथीयांचा समावेश आहे.  वाशिम जिल्ह्यातील 33-रिसोड हा विधानसभा मतदारसंघ 6-अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. तसेच 34-वाशिम आणि 35- कारंजा विधानसभा मतदारसंघ हे 14-यवतमाळ-वाशिम लो

मतदान केल्यास रुग्णांना मिळणार 50 टक्के सवलत

Image
मतदान केल्यास रुग्णांना मिळणार 50 टक्के सवलत   मेडिकल असोसिएशनचा कौतुकास्पद उपक्रम   वाशिम,दि.24 (जिमाका) जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना वाशिम मधील सर्व डॉक्टरांकडून   26, 27 आणि 28 एप्रिल रोजी ओपीडी तपासणी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय IMA ,NIMA, IDA, आणि HIMA असोसिएशनकडून घेण्यात आल्याचे IMA,IDA,NIMA,HIMA च्या अध्यक्षांनी कळविले आहे.  मतदानाची टक्केवारी वाढावी, शेवटच्या मतदाराने आपला हक्क बजावा या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. याचाच भाग म्हणून IMA,IDA,NIMA,HIMA वाशिम तर्फे मतदान केलेल्या मतदारास ओपीडीच्या फीस मध्ये 50% सवलत देण्याचे ठरविण्यात आले आहे.   मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून मतदान करून घेणे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी एलोपैथिक, आयुर्वेदिक,होम्योपैथिक व दंत वैद्यकीय असोसिएशन तर्फे घेण्यात येत असलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन IMA, ID

जेवणात 10 टक्के सवलत - 50 रुपयात चित्रपट - कामगारांना पगारी रजा मतदारांसाठी आयएमकडून रुग्णांना फी सवलतीनंतर विविध आस्थापनांचाही पुढाकार

Image
जेवणात 10 टक्के सवलत - 50 रुपयात चित्रपट -  कामगारांना पगारी रजा मतदारांसाठी आयएमकडून रुग्णांना फी सवलतीनंतर विविध आस्थापनांचाही पुढाकार  वाशिम,दि. 23 (जिमाका ) जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान करून आलेल्या मतदारांना 26,27 आणि 28 एप्रिल रोजी हॉटेल ईव्हेंटो , दानिश एम्पायर आणि मनीप्रभा येथे 10 टक्के सवलत तसेच एच टू एम सिनेमागृह येथे 50 रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. अशच प्रकारे जिल्ह्यातील विविध आस्थापनांनी त्यांच्याकडील कामगारांना मतदान केल्यास पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे मतदान करून आलेल्या मतदारांना 26, 27 आणि 28 एप्रिल रोजी ओपीडी तपासणी मध्ये 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, शेवटच्या मतदाराने आपला हक्क बजावा या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि अनेक संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून मतदान करून घेणे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी

जिल्हाधिकारी टाळ वाजवी, सिईओंच्या हाती खंजिरी मतदानाचा टक्का वाढविण्या शहरात निघाली वारी ! मानवी साखळी तथा रॅली उत्साहात

Image
जिल्हाधिकारी टाळ वाजवी, सिईओंच्या हाती खंजिरी मतदानाचा टक्का वाढविण्या शहरात निघाली वारी ! मानवी साखळी तथा रॅली उत्साहात वाशिम,दि.२३ (जिमाका) मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आज जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत आज दि. २३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या *मताधिकार जाणीव जागृती करीता मानवी साखळी तथा रॅलीचे आयोजन* करण्यात आले होते.     या रॅलीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र जाधव,स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव,उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, मुख्याधिकारी निलेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.  यावेळी स्थानिक लोककलावंतांनी मतदार जनजागृती गीत गाऊन जनजागृती केली. रॅलीमध्ये बाकलीवाल शाळेतील एनसीसीच्या विद्यार्थीनींसह महसूल विभाग, जिल्हा परिष

मतदान जनजागृती एलईडी रथाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ

Image
मतदान जनजागृती एलईडी रथाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ वाशिम,दि.२२ (जिमाका) जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदान जनजागृतीसाठी एलईडी रथ तयार करण्यात आले आहे. या एलईडी रथाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले यावेळी स्वीपचे नोडल अधिकारी जीवन आढाव, जिल्हा माहिती अधिकारी यासीरोद्दीन काझी, नायब तहसीलदार सतीष काळे, सहाय्यक नोडल अधिकारी राजेश काळे, गुलाम यसदाणी आदींची उपस्थिती होती. लोकसभा निवडणुकीत वाशिम जिल्ह्याचे मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने जिल्हाभरात जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील महिला आणि नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी तसेच इतर मतदारांनाही मतदान करण्यास प्रोत्साहित करण्याच्या अनुषंगाने रील्स आणि सेल्फी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही वापर करण्यात येत आहे. वाशिमकरांनी या लोकशाही उत्सवाचे जल्लोषात स्वागत करून आपल्या आपल्या अधिकाराचा वापर करून लोकशाहीच

जिल्हयात मतदार जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद जिल्हयात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Image
जिल्हयात मतदार जनजागृतीसाठी प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची   बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकाऱ्यांनी साधला पत्रकारांशी संवाद जिल्हयात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाशिम, दि. 20 (जिमाका) : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात मतदान जनजागृती आणि जिल्हा प्रशासनाची तयारी या विषयाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या, शुक्रवारी 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून शांततेत मतदान पार पडेल या उद्देशाने जिल्हा प्रशासन काम करीत आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या मतदारही मतदानापासून वंचित राहणार नाही या उद्देशाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे.  आपला वाशिम जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्या

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम यांचे मार्फत SVEEP कार्यक्रमाअंतर्गत *रील्स* स्पर्धेचे आयोजन

Image
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, वाशिम यांचे मार्फत SVEEP कार्यक्रमाअंतर्गत *रील्स* स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असुन जिल्ह्यातील नागरिकांनी व शालेय - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई २ लाख १० हजार जप्त

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई २ लाख १० हजार जप्त पिंपळा येथे १ लाख १५ हजार व पन्हाळा चेक पोस्टवर ९५ हजार रोकड जप्त  वाशिम,दि.१५ (जिमाका)  १४ एप्रिल रोजी वाशिम तालुक्यातील पन्हाळा फाटा येथे पुसदकडून येणाऱ्या एम एच ३७ व्ही २९११ ब्रिझा वाहनाची तपासणी केली असता ९५ हजार व आज १५ एप्रिल रोजी अमरावतीकडून येणाऱ्या मारोती एस प्रेसो एमएच २७ डीए ३५०६ या वाहनाची तपासणी केली असता १ लाख १५ हजार रुपये रक्कम आढळून आली. सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावे आढळले नाही.  उपरोक्त कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी वाशिम बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थिर सर्वेक्षण पथकातील सदस्य पथक प्रमुख रवि राठोड व गोपाळ ईढोळे व पथकातील कर्मचारी यांनी केली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४८ हजार ६३३ पोस्टल बॅलेट पेपर व १ हजार २५३ नमुना १२ हस्तांतरित

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ८ हजार ६३३ पोस्टल बॅलेट पेपर व  १ हजार २५३ नमुना १२ हस्तांतरित वाशिम,दि.१५ (जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणुक - २०२४ अंतर्गत वाशिम जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. तथापी, निवडणूक कामाकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी ज्यांना २६ एप्रिल रोजी मतदार केंद्रावर जावुन प्रत्यक्ष मतदार करणे शक्य नाही अशा सर्वांकडुन भरण्यात आलेला नमुना १२ व त्यांना पाठविण्यात येणाऱ्या पोस्टल बॅलेट पेपरची देवाण-घेवाण करण्याकरीता सर्व संबंधित सहायक निवडणुक अधिकारी यांचे करीता १४ एप्रिल रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर शिबीराकरीता नांदेड, हिंगोली, परभणी, अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते व त्यांचेव्दारे एकुण १ हजार २५३ नमुना १२ व एकूण ८ हजार ६३३ पोस्टल बॅलेट पेपर हस्तांतरीत करण्यात आले. आणि पुढील शिबीर १८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे.असे  जिल्हा नोडल अधिकारी टपाली मतपत्रिका  तथा जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ २१४ पथकांचे प्रशिक्षण संपन्न

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ २१४ पथकांचे प्रशिक्षण  संपन्न वाशिम,दि.१५ (जिमाका) आज १५ एप्रिल रोजी १४ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघांतर्गत नेमणूक झालेल्या मतदान अधिकारी यांचे द्वितीयप्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात २१४ पथकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रत्येक पथकात एक मतदान केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी  उपस्थित होते. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी  बुवनेश्वरी एस यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच १४ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यवतमाळ जिल्हाधिकारी  पंकज आशिया यांनी नियुक्त केलेले समन्वय अधिकारी श्री. पवार,  तहसीलदार वाशिम निलेश पळसकर व तहसीलदार मंगरूळपीर शीतल बंडगर ह्या उपस्थित होत्या. या प्रशिक्षणास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ मंगरूळपीर राजेंद्र जाधव, तहसीलदार निलेश पळसकर यांनीही मार्गदर्शन केले.           या प्रशिक्षणाचे आयोजन हे दोन ठिकाणी करण्यात आले होते मुख्य प्रशिक्षण हे काळे लॉन आरे कॉलेज रोड वाशिम येथे व त्याच पथकांचे मतदान हाताळणी यंत्राचे प्रशिक्षण नवोदय विद्यालय वाशिम येथे घेण्यात आले. प्रशिक्षणानं

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे घेतला आढावा

Image
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे घेतला आढावा वाशिम,दि.१२ (जिमाका)पोहरादेवी येथील रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली  पोहरादेवी येथे यंत्रणा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सभा घेण्यात आली.     यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वैभव वाघमारे , निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे वाशिम, उपविभागीय अधिकारी कारंजा कैलास देवरे , उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा प्रदीप पाडवी , अधीक्षक अभियंता एमएसईबी अजय शिंदे , तहसीलदार मानोरा संतोष यावलीकर, पोलीस निरीक्षक मानोरा प्रवीण शिंदे , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अजिंक्य वानखडे , कार्यकारी अभियंता मजिप्रा निलेश राठोड ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व इतर यंत्रणेचे प्रमुख यांची उपस्थिती होती.      पोहरादेवी यात्रेच्या अनुषंगाने काही उपाययोजना करणे आवश्यक होत्या त्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. पोहरादेवी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नळ बसविणे व जागेचे सपाटीकर

निवडणुक पारदर्शक आणि शांतेत पार पाडण्यासाठीसर्व यंत्रणांनी सजग राहून काम करणे आवश्यक मुख्य निवडणुक अधिकारी एस चोक्कलिंगम

Image
निवडणुक पारदर्शक आणि शांतेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करणे आवश्यक         मुख्य निवडणुक अधिकारी एस चोक्कलिंगम   वाशिम,दि.10 (जिमाका) लोकसभा निवडणुक 2024 पारदर्शक आणि शांतेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्य निवडणुक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात श्री. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणूकीच्या तयारी आढावा घेण्यात आला.यावेळी अमरावती विभागाच्या आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, निवडणूक आयोगाच्यावतीने पोलिस निरिक्षक म्हणून भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी (आयपीएस) बरिंदरजित सिंह, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे ,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, राजेंद्र जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अभिनव बालूरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यवतमाळचे जिल्हाधिका

लोकशाहीचा हा उत्सव सगळ्यांनी एकत्र येऊन उत्कृष्टरित्या साजरा करानिवडणूकीदरम्यान आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी एम.मल्लिकार्जुन नायक

Image
लोकशाहीचा हा उत्सव सगळ्यांनी एकत्र येऊन उत्कृष्टरित्या साजरा करा निवडणूकीदरम्यान आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी                                                                       एम.मल्लिकार्जुन नायक वाशिम,दि.१० (जिमाका ) जिल्ह्यात मतदान टक्केवारी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे त्यासाठी सर्व यंत्रणांनी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विविध माध्यमातून प्रसिद्धी आणि जनजागृती बरोबरच प्रत्येक बि.एल.ओंनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील प्रत्येक मतदारास मतदान करण्यास सांगावे आवश्यक असल्यास व्यक्तिशः त्यांना फोन करावे त्यांना काही अडचणी असल्यास ते समजून घ्याव्या त्यांना मतदान केंद्रापर्यंत ने आण करण्याच्या सुविधा द्याव्यात असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक (सामान्य) एम. मल्लिकार्जुन नायक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रसंगी केले.                  यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा

पोहरादेवी यात्रेकरीता यंत्रणांनी सज्ज राहावे बुवनेश्वरी एस पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Image
पोहरादेवी यात्रेकरीता यंत्रणांनी सज्ज राहावे             बुवनेश्वरी एस  पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा वाशिम,दि.७ (जिमाका) आगामी रामनवमी निमित्ताने पोहरादेवी येथे यात्रा आयोजित करण्यात येत असून या अनुषंगाने जिल्ह्यातील यंत्रणांनी सज्ज राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले.       जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पोहरादेवी येथे रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा सभा घेण्यात आली.त्यावेळी त्या बोलत होत्या.  या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे , कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी कारंजा, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रसाद पाटील, तहसीलदार मानोरा संतोष यावलीकर , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व इतर यंत्रणाचे प्रमुख सभेला उपस्थित होते.  श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या,          यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या निगा राखण्याच्या दृष्टिकोनातून, यात्रेच्या

भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात बुवनेश्वरी एस पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

Image
भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात                         बुवनेश्वरी एस पोहरादेवी यात्रेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा वाशिम, दि.०१ (जिमाका) : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी येत्या १७ एप्रिल रोजी होणाऱ्या रामनवमी यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आज १ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आयोजित सभेत घेतला.              या पूर्वतयारी आढावा सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर,उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, अप्पर पोलीस अधिक्षक भारत तांगडे,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,कारंजा उपविभागीय अधिकारी कैलास देवरे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.               श्रीमती बुवनेश्वरी यावेळी म्हणाल्या,यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांन