जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे घेतला आढावा


जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने पोहरादेवी येथे घेतला आढावा


वाशिम,दि.१२ (जिमाका)पोहरादेवी येथील रामनवमी यात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली 
पोहरादेवी येथे यंत्रणा प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये सभा घेण्यात आली.
    यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वैभव वाघमारे , निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे वाशिम, उपविभागीय अधिकारी कारंजा कैलास देवरे , उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा प्रदीप पाडवी , अधीक्षक अभियंता एमएसईबी अजय शिंदे , तहसीलदार मानोरा संतोष यावलीकर, पोलीस निरीक्षक मानोरा प्रवीण शिंदे , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अजिंक्य वानखडे , कार्यकारी अभियंता मजिप्रा निलेश राठोड ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत व इतर यंत्रणेचे प्रमुख यांची उपस्थिती होती.
  
  पोहरादेवी यात्रेच्या अनुषंगाने काही उपाययोजना करणे आवश्यक होत्या त्याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. पोहरादेवी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नळ बसविणे व जागेचे सपाटीकरण करणे, परिसर स्वच्छ करणे या बाबत गटविकास अधिकारी मानोरा, ग्रामसेवक ग्रामपंचायत पोहरादेवी यांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार आज सदर काम प्रगतीत असल्याचे दिसून आले. 
        त्यानंतर संत रामराव महाराज समाधी स्थळ, संत सेवालाल महाराज मंदिर, जगदंबा देवी मंदिराचे ठिकाण, भक्त निवासाचे ठिकाण या ठिकाणी पाहणी करून संबंधित यंत्रणा प्रमुखांना यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 
         यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी उमरी खुर्द येथील सामकी माता परिसर, जगदंबा माता, प्रल्हाद महाराज आणि जेतालाल महाराजांच्या मंदिर परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली या ठिकाणी सुद्धा भाविकाच्या सुविधेसाठी , आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणा प्रमुखांना केल्या. 
     सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून पोहरादेवी यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंना उन्हाळ्यामध्ये घ्यावयाच्या खबरदारी बाबत काय करावे आणि काय करू नये अशा सूचनांचे फलक, आरोग्य विभागाचे स्टॉल ज्या ज्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत त्या त्या सर्व ठिकाणी यात्रेकरूच्या जागृती करिता फलक लावण्याचा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सभेमध्ये करण्यात आल्या. 

 यात्रेकरूंच्या सुविधेसाठी ज्या-ज्या ठिकाणी शौचालये उभारल्या जाणार आहेत, ज्या ज्या ठिकाणी फायर ब्रिगेड च्या गाड्या थांबणार आहेत त्याचे स्थान निश्चित करून मॅपिंग करणे, तसेच पथके तयार करण्याबाबतच्या सूचना नगरपंचायत मानोरा यांना करण्यात आल्या. यात्रेच्या कालावधीमध्ये यात्रेकरूंना पिण्यासाठी पाणी टँकरद्वारे उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांना करण्यात आल्या. यात्रेदरम्यान अवैध दारूला आळा घालण्यासाठी चेक पोस्ट च्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांचे कर्मचारी तैनात करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी सभेत दिल्या. 
      विविध राज्यांमधून यात्रेकरिता भाविकांची येण्याची सुरुवात ही यात्रेच्या दोन-तीन दिवस आधीपासूनच होते, असा मागील अनुभव आहे आणि यात्रा संपल्यानंतरही किमान दोन दिवस भाविकांचा मुक्काम पोहरादेवी आणि उमरी परिसरा सोबतच वसंतनगर येथे राहतो या कालावधीमध्ये परिसरातील स्वच्छता ( यात्रा झाल्यानंतर ) नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी कटाक्षाने करून घ्यावी अशाही सूचना संबंधितांना देण्यात आल्या. 
 पशुसंवर्धन विभागाने यात्रेदरम्यान व यात्रेनंतरही किमान एक दिवस त्यांचे पथक परिसरामध्ये तैनात ठेवावे. यात्रेदरम्यान भाविकांकडून प्रसाद, उष्टे अन्न इतरत्र टाकल्या जातात, ते अन्न खाल्ल्यामुळे पशुधनाची हानी होऊ नये याकडे पशुसंवर्धन विभागाने जातीने लक्ष पुरवावे, पशुसंवर्धन विभागांनी तैनात केलेले पथक, पथकांमधील कर्मचारी, यात्रेमधील त्यांची जागा निश्चिती या बाबींचे नियोजन करून त्याची एक प्रत व इतर विभागानेही त्यांचेकामांचे नियोजन करून त्याची एक प्रत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे न चुकता देण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी सभेदरम्यान संबंधितांना दिले .

 यात्रेदरम्यान 24 तास वीज पुरवठा सुरळीत राहील, तसेच यात्रेदरम्यान उभारण्यात येणाऱ्या स्टॉलला वीज पुरवठा केल्यास अतिरिक्त वीज भार वाढणार आहे त्याकरिता महावितरण विभागाने आवश्यक ती उपाययोजना करावी. 
   
चौकट : मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द येथे मतदान वाढले पाहिजे याविषयी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे