Posts

दुष्काळी भागातील पशुपालकांना दिलासा२०२६-२७ साठी चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल #दुष्काळ #FarmerWelfare #MahaDGIPR

Image
दुष्काळी भागातील पशुपालकांना दिलासा २०२६-२७ साठी चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल  #दुष्काळ  #FarmerWelfare  #MahaDGIPR

🌿 सेवा संकल्प अभियानातून आशा व अंगणवाडी सेविकांना स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नियमांचे प्रशिक्षण! 🌿

Image
🌿 सेवा संकल्प अभियानातून आशा व अंगणवाडी सेविकांना स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नियमांचे प्रशिक्षण! 🌿 वाशिम, दि. 17 ऑक्टोबर (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती वाशिम येथे स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन नियमांबाबत आशा व अंगणवाडी सेविकांसाठी प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे आणि स्वच्छ भारत मिशनचे प्रकल्प संचालक गजानन खुळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण घेण्यात आले. घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे याबाबत प्रशिक्षणातून माहिती देण्यात आली. गावपातळीवर स्वच्छतेचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी लोकसहभाग वाढविणे आणि ग्रामीण भागात स्वच्छतेच्या सवयी रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. #सेवा_संकल्प_अभियान #स्वच्छता_ही_सेवा #घनक...

💧 संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी! 🚰 जलजीवन मिशनच्या कामांचा घेतला आढावा; पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रभावी नियोजनाचे निर्देश

Image
💧 संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा योजनांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी! 🚰 जलजीवन मिशनच्या कामांचा घेतला आढावा; पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रभावी नियोजनाचे निर्देश वाशिम, दि. १७ ऑक्टोबर (जिमाका) : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती तपासून आवश्यक उपाययोजनांचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या वाशिम तालुक्यातील तामसी व मालेगाव तालुक्यातील पांगरी कुटे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या रेगाव व मुंगळा येथे जलजीवन मिशनच्या रेट्रोफीटींगच्या कामांची पाहणी करून योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश कान्हेरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू, वाशिम तहसीलदार निलेश पळसकर, मालेगाव गटविकास अधिकारी निकेश पाटील, नायब तहसीलदार रंजना गोरे आदी उ...

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांना दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत २०२६-२७ या वर्षासाठी विशेष सवलत. #शेतकरीहित #दुष्काळ

Image
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांना दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल.  मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत २०२६-२७ या वर्षासाठी विशेष सवलत.  #शेतकरीहित  #दुष्काळ

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण कामांना गती देवून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा!जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर🔹 जलयुक्त शिवार अभियान २.० आढावा सभा

Image
🚩 दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण कामांना गती देवून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा! जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर 🔹 जलयुक्त शिवार अभियान २.० आढावा सभा वाशिम, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) : एल-निनोचा संभाव्य प्रभाव आणि जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून जलस्रोतांचे बळकटीकरण आणि भूजल पुनर्भरणाच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात आज १५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियान २.० आढावा सभा संपन्न झाली.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, सहाय्यक वनसंरक्षक सुशील मंतावार, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरेंद्र वाघमारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह,उपविभागीय अधिकारी संतोष वाळके,लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रजत बिजवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. संभाव्य पाणीटंचाईच्या दृष्ट...