Posts

Showing posts from 2021

जिल्हाधिकाऱ्यांची मंगरूळपीर तालुक्यातील काही गावांना आणि शिवाराला भेट*

Image
*जिल्हाधिकाऱ्यांची मंगरूळपीर तालुक्यातील काही गावांना आणि शिवाराला भेट*  * लसीकरण केंद्राला भेट   * शिवारात ई-पीक पाहणी  वाशिम दि.31(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 31 डिसेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापूर, शेलुबाजार, वनोजा व तराळा येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. दस्तापूर येथील शेतकरी विष्णू अटपडकर यांच्या शिवारात जाऊन ई- पीक पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.              दस्तापूर येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देऊन लस घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. लसीकरण केंद्रात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून गावातील लसीकरणासाठी पात्र व्यक्तींची माहिती घेतली. आतापर्यंत पहिला डोस आणि दुसरा डोस किती व्यक्तीने घेतला आहे, ज्यांनी पहिला डोस अद्यापही घेतला नाही त्यांच्या घरी जाऊन कर्मचाऱ्यांनी त्यांना लसीकरण केंद्रावर येण्यासाठी सांगावे.बाहेरगावी किती व्यक्तींनी लस घेतली आहे, बाहेरगावी असलेल्या व्यक्तींनी लस घेतल्याची खातरजमा करण्यात यावी. दुसरा डोस

कोरोना पार्श्वभूमिवर निर्बंधाबाबतचे सुधारीत आदेश जारी • लग्न समारंभ उपस्थितीला 50 लोकांची मर्यादा • अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी • कलम 144 नुसार जमावबंदी

  कोरोना पार्श्वभूमिवर निर्बंधाबाबतचे सुधारीत आदेश जारी •   लग्न समारंभ उपस्थितीला 50 लोकांची मर्यादा •   अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी •   कलम 144 नुसार जमावबंदी वाशिम दि.31 (जिमाका) : आगामी काळात येणारे लग्न समारंभ व इतर सण आणि नववर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमिवर पुढील काही दिवसात राज्यात कोविड रुग्ण संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी निर्गमित आदेशाव्दारे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लादलेल्या निर्बंधाव्यतिरिक्त आणखी काही निर्बंध लादणे अत्यावश्यक असल्याचे 30 डिसेंबर 2021 च्या शासन निर्णयात नमूद केले आहे. त्या अनुषंगाने निर्बंधाबाबतचे सुधारीत आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष षण्मुगराजन एस.यांनी जारी केले आहे. जिल्हयात 30 डिसेंबर 2021 पासून ग्रामीण व शहरी भागाकरीता यापूर्वी लादण्यात आलेल्या निर्बंधामध्ये बदल करुन सुधारीत निर्बंधाबाबतचे आदेश जिल्हाधिकारी, वाशिम यांनी निर्गमित केले आहे. लग्न समारंभाच्या बाबतीत उपस्थितांची एकूण संख्या 50 लोकांची राहील. ही संख्या बंदिस्त सभागृह व मोकळ्या मैदानालासुध्दा लागू राहील.सर्व

3 ते 12 जानेवारी दरम्यान सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंतीनिमित्त जनजागृती अभियान

  3 ते 12 जानेवारी दरम्यान      सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंतीनिमित्त जनजागृती अभियान वाशिम, दि. 31 (जिमाका) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हया भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे सुरु केली. महाराष्ट्रात स्त्री शिक्षण व शुद्रामध्ये शिक्षणाचा प्रसार केला. त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. महिला क्षेत्रात त्यांनी दिलेले महत्वपुर्ण योगदान विचारात घेता, या वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये साजरा करण्यात येत आहे. महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, वाशिमअंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत सावित्रीबाई फुले व जिजाऊ माँ साहेब जयंतीनिमीत्त जनजागृती अभियान राबवून जिल्हयात जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंतीनिमित्त अंगणवाडी केंद्रस्तरावर पुढीलप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येणार आहे. पाच वर्षाखालील मुलींचे कन्या पुजन करणे, मुलींच्या जन्माचा उत्सव साजरा करताना मुलींच्या जन्मावर वृक्षारोपण करणे, मुली

खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर जिल्ह्याची एकूण पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

  खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर जिल्ह्याची एकूण पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी वाशिम, दि. 31(जिमाका) : जिल्ह्याच्या सन २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे असून या ७९३ महसुली गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असल्याचे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी कळविले आहे.       वाशिम तालुक्यात लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या १३१ असून या सर्व गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे आहे. मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची अंतिम पैसेवारी ४७ पैसे, मंगरुळपीर तालुक्यातील १३७ गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे आणि मानोरा तालुक्यातील १३६ गावांची अंतिम पैसेवारी ४८ पैसे इतकी आहे. *******

एचडीएफसी बँकेच्या सीएसआर फंडातून जिल्हा सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे भेट

Image
  एचडीएफसी बँकेच्या सीएसआर फंडातून जिल्हा सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे भेट वाशिम, दि. 31 (जिमाका) :   एचडीएफसी बँकेने त्यांच्या सामाजिक उतरदायीत्व निधीतून जिल्हा सामान्य रुग्णालयाला कोविड मदत कार्यक्रमांतर्गत ही वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली. यानिमित्ताने आज 31 डिसेंबर रोजी वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी, षण्मुगराजन एस., प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आमरे, एचडीएफसी बँकेचे क्लस्टर हेड संदेश काबरा, वाशिम येथील एचडीएफसी बँकेचे शाखा व्यवस्थापक अमित व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. खेळकर यांना रुग्णांसाठी लागणारी आवश्यक उपकरणे हस्तांतरीत करण्यात आली. एचडीएफसी बँकेने त्यांच्या सामाजिक उतरदायीत्व योजनेतून जिल्हा सामान्य रुग्णालयाला 15 पॅरा मॉनिटर, 3 ईसीजी मशिन व 5 डेफिरीलेब्यूटर या वैद्यकीय उपकरणाची भेट देण्यात आली.    याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, बँकेचे गर्व्हमेंट बिजनेस धनंजय पेनुरकर, एचडीएफसी बँकेतील कर्मचारी सर्वश्री गणेश शक्करवार, अभिजीत देशमुख, नंदकिशोर अनसिंगकर, वैभव अनसिंगकर, अ

31 डिसेंबर व नविन वर्षानिमित्त जिल्हयात साथरोग प्रतिबंध अधिनियम लागू

  31 डिसेंबर व नविन वर्षानिमित्त जिल्हयात साथरोग प्रतिबंध अधिनियम लागू वाशिम, दि. 30 (जिमाका) :   कोविड- 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनिम 1897 लागू करण्यात आल्याबाबतची अधिसूचना 14 मार्च 2020 च्या अधिसूचनेनुार नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे.17 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार एकत्रित सुधारीत मार्गदर्शन सूचना देखील निर्गमित करण्यात आल्या आहे. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हयात कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 नुसार जिल्हयात 31 डिसेंबर 2021 वर्ष अखेर व नविन वर्ष 2022 निमित्त पुढीलप्रमाणे आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने ३१ डिसेंबर २०२१ रोजी व १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच राहून साधेपणाने साजरे करावे. मदत व पुनर्वसन विभाग यांच्या २

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता 31 डिसेंबर घरात राहूनच साजरा करा - पालकमंत्री शंभूराज देसाई

Image
  वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता 31 डिसेंबर घरात राहूनच साजरा करा                                                  - पालकमंत्री शंभूराज देसाई वाशिम, दि. 30 (जिमाका) :   राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने वाढत आहे. 31 डिसेंबर आणि त्यानंतर नविन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांची धार्मिकस्थळी मोठया प्रमाणात गर्दी होत असते. अशा ठिकाणी लोकांनी गर्दी न करता सगळयांनी घरात राहूनच हा उत्सव साजरा करावा. असे आवाहन पालकमंत्री शंभूराज   देसाई यांनी केले. 31 डिसेंबर आणि नविन वर्षाच्या पार्श्वभूमिवर कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी दुरदृश्य प्रणालीद्वारे 30 डिसेंबर रोजी आयोजित सभेत श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धर्मपाल खेळकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठ

महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम-2021 मसुदा हरकती/सुचना पाठविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

  महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम-2021 मसुदा हरकती/सुचना पाठविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन             वाशिम दि. 29 (जिमाका) : राज्य शासनाचे औद्योगिक संबंध संहिता 2020 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम 2021 चा मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये 3 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसुचनेव्दारे प्रसिध्द करण्यात आला आहे. हा मसुदा नियम महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in तसेच कामगार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahakamgar.maharashtra.gov.in यावर कायदा व नियम शिर्षाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. या अधिसुचनेव्दारे प्रसिध्द केलेल्या मसुद्याबाबत 45 दिवसांचे आत हरकती/सुचना मागविण्यात आलेल्या आहेत.               या प्रारुपबाबत कोणतेही आक्षेप किंवा सुचना कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे पुर्व, मुंबई-400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या mahalabourcommr@gmail.com यावर स्विकारण्यात येतील. या अधिसुचनेवर नमुद केलेल्या कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी या प्रारुपाच्या बाबतीत कोणत्याही व

3 जानेवारीला रोजगार कार्ड नोंदणी व कौशल्य विकास मार्गदर्शन सत्र

  3 जानेवारीला रोजगार कार्ड नोंदणी व कौशल्य विकास मार्गदर्शन सत्र             वाशिम दि.28 (जिमाका) : आजच्या स्पर्धेच्या युगात उद्योजकतेचा विकास व रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या युवा वर्गासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिमच्या वतीने 3 जानेवारी 2022 रोजी वाशिम येथील राजस्थान आर्य कला महाविद्यालय येथे रोजगार कार्ड नोंदणी व कौशल्य विकास मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रामध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत शासकीय रोजगार कार्डाची नोंदणी कशी करावी, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, कार्ड निर्मितीची ऑनलाईन सुविधा तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या स्वयंरोजगार कर्ज योजनेसह इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह रोजगारासाठी प्रयत्नशील असलेल्या अन्य इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमात सहभागी व्हावे. रोजगार कार्डची नोंदणी या सत्रात विनामुल्य करुन दिली जाईल. असे कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी कळविल

खडकी (इजारा) येथे पशुंचे लसीकरण व तपासणी

Image
  खडकी (इजारा) येथे पशुंचे लसीकरण व तपासणी             वाशिम दि.28 (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने मालेगांव पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणाऱ्या खडकी (इजारा) येथे पाळीव जनाव रांची तोंडखुरी, पायखुरी, लसीकरण तसेच गर्भ तपासणी, खच्चीकरण व इतर वेळेवरील उपचार करण्यात आले. पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षिका डॉ. सुनिता सोळंके, पट्टीबंधक विद्यानंद कांबळे, सहाय्यक काशिनाथ गव्हाणे व सुमित इंगळे उपस्थित होते. ही तपासणी व लसीकरण पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर देखमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी सरंपच श्रीमती पंचफुला मैंदकर, उपसरपंच गंगुबाई कालापाड, पोलीस पाटील गजानन धनगर, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बोरकुटे यांच्यासह गावातील शेतकरी श्री. गजानन गायकवाड, नितेश मैंदकर, बबन कालापाड, किसन धनगर, छोटू इंढोळे, गजानन टाले यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना पशुधन विभागाच्या योजनांची माहिती तसेच लसीकरणाची माहिती देण्यात आली. *******

कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत आर्थिक मदतीसाठी प्रयोगात्मक कलावंतांकडून 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

  कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत आर्थिक मदतीसाठी प्रयोगात्मक कलावंतांकडून 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले               वाशिम दि.27 (जिमाका) प्रयोगात्मक कलेच्या प्रकारातील कलावंतांना कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने कोविड दिलासा पॅकेजअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे. इच्छुक कलावंतांनी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज पुढील तारखेपर्यंत संबंधीत तहसिल कार्यालय येथे निवासी नायब तहसिलदार यांचेमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावे.           कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू होता. तसेच, लॉकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, नाट्यगृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येणारे सांस्कृतिक कार्यक्रमही या काळात स्थगित करण्यात आले होते. या काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटीत व असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकार, ज्यांचे

कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर* *जिल्हा प्रशासनाची सुधारित नवी नियमावली**रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास प्रतिबंध*

कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर*  *जिल्हा प्रशासनाची सुधारित नवी नियमावली* *रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास प्रतिबंध* वाशिम दि. 26 (जिमाका) कोरोनाच्या नव्या ओमायक्रोन विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात निर्बंध लावण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी 25 डिसेंबर रोजी आदेश निर्गमित केले आहे. नव्याने काही निर्बंधाचा यामध्ये समावेश केला आहे.         जिल्ह्यात विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करतांना किंवा  अन्य सामाजिक,राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रम आणि मेळाव्यात जास्तीत जास्त 100 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी, जर असे समारंभ मोकळ्या जागेत आयोजित केले जात असल्यास जास्तीत जास्त 250 लोकांची किंवा त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या व्यक्तींच्या उपस्थिती मर्यादेचे पालन करण्यात यावे.          नमूद केलेल्या कार्यक्रमा व्यतिरिक्त इतर कार्यक्रमाचे आयोजन बंद जागेमध्ये करीत असताना आसनव्यवस्था निश्चित असलेल्या ठिकाणी त्या जागेच्या 50 टक्के क्षमते इतक्या उपस्थितांच्

*राज्यात काल मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू**रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी**सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध*-----------*कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* 

*राज्यात काल मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू* *रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी* *सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध* ----------- *कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*   राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते काल मध्यरात्रीपासून लागू राहणार आहे. विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास स

*मालेगाव येथील खुनासह दरोड्याचा मालेगाव पोलिसांनी ४८ तासाच्या आत लावला छडा.*

Image
*मालेगाव येथील खुनासह दरोड्याचा मालेगाव पोलिसांनी ४८ तासाच्या आत लावला छडा.* वाशिम दि.२५ (जिमाका) पोलिस स्टेशनमालेगाव येथे २१ डिसेंबर रोजी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश गजानन अंजनकर हे त्याचे सोन्याचे दुकाम बंद करून अंदाजे २०० ग्रॅम सोन्याचे गोळे व नगदी ९०००/- रु. असा एकूण माल ९,०९,०००/- रु.चा माल असलेली बॅग घेऊन त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा कारागीर रवींद्र वाळेकर यास सोबत घेऊन घरी जात असतांना लाड वकिलांचे घराचे मागे, देशपांडे लेआउट मालेगाव येथे अज्ञात दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवून योगेश अंजनकर व रवींद्र वाळेकर यांचे डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांच्यावर चाकूने वार केले ज्यामध्ये योगेश अंजनकर व रवींद्र वाळेकर हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत पसरविण्याचे उद्देश्याने गावठी कट्ट्यामधून गोळीबार केला व योगेश अंजनकर यांचेजवळील ९,०९,०००/- रु.चा मुद्देमाल असलेली बॅग घेऊन मोटारसायकलने पळून गेले.मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये येथे या घटनेतील अज्ञात आरोपीविरुद्ध अप.क्र.२५५/२१ कलम ३९६, ३९७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.              

*आज 4 हजार 682 व्यक्तींचे लसीकरण*

Image
*आज 4 हजार 682 व्यक्तींचे लसीकरण*  वाशिम दि.24 (जिमाका) जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 24 डिसेंबर रोजी 4 हजार 682 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 481 व्यक्तींनी व दुसरा डोस 4 हजार 201 व्यक्तींनी घेतला.    वाशिम तालुका : पहिला डोस - 131 व दुसरा डोस -922 असा एकूण 1053, मालेगाव तालुका : पहिला डोस - 81 आणि दुसरा डोस - 600 एकूण 681, रिसोड तालुका : पहिला डोस -61 व दुसरा डोस - 692 एकूण 753, कारंजा तालुका : पहिला डोस - 107 आणि दुसरा डोस -1012 एकूण 1119,मानोरा तालुका : पहिला डोस - 51 व दुसरा डोस 479 एकूण 530 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस - 50 आणि दुसरा डोस - 496 असा एकूण 546 व्यक्तींना देण्यात आला.

ग्राहकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे* तहसीलदार शेलार

Image
ग्राहकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे*                        तहसीलदार शेलार  वाशिम दि.24 (जिमाका) बदलता काळ लक्षात घेता ग्राहकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपले प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून न्याय मिळवून द्यावा.असे प्रतिपादन तहसीलदार अजित शेलार यांनी केले.          रिसोड तहसील कार्यालयात आज 24 डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका ग्राहक मंच अध्यक्ष कमलकाका बगडे होते. नायब तहसीलदार नपते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.          तहसीलदार श्री.शेलार म्हणाले, ग्राहक म्हणून आपलेही काही कर्तव्य असायला पाहिजे.आपण आपले प्रश्न लोकशाही मार्गाने व अभ्यासपूर्ण मांडले असता त्याची सोडवणूक निश्चितच होते. येत्या जानेवारी महिन्यामध्ये रिसोड तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची व ग्राहक पंचायतच्या सदस्यांची एक समन्वय सभा आयोजित करून ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.             यावेळी जयंत वसमतकर, संतोष वाघमारे, माजी मुख्याध्यापक गजानन बानोरे, संजय उखळकर यांनीही विचार व्यक्त केले.या कार्यक्रमा

*जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली ई- पीक पाहणी व लसीकरण केंद्राला भेट*

Image
*जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांनी केली ई- पीक पाहणी व लसीकरण केंद्राला भेट* वाशिम दि 24(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज 24 डिसेंबर रोजी रिसोड तालुक्यातील रिठद शिवारातील वसंता आरु आणि विठ्ठल ढोरे या शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केली. तसेच येवती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी तहसीलदार अजित शेलार प्रामुख्याने उपस्थित होते.             शेतकरी वसंता आरू यांच्या शेतातील गहू आणि विठ्ठल ढोरे यांच्या शेतातील हरभरा पिकाची ई -पीक पाहणी करून जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यांनी त्यांच्याशी संवाद साधला.        जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन यावेळी म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्याने खरीप आणि रब्‍बी हंगामात ई- पीक पाहणी केली पाहिजे. अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील ई- पीक पाहणी करता येते. शासनाने त्यासाठी एक पीक पाहणी ॲप्स तयार केला आहे. ई - पीक पाहणी करून त्यामध्ये पिकांची नोंद घ्यावी. जर पिकांचे काही नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळणे सोयीचे होते. प्रशासनालासुद्धा नुकसान भरपाई देण्यास सुलभ होते असे त्यांन

नाताळ सणानिमित्त जिल्हयात साथरोग प्रतिबंध अधिनियम लागू

  नाताळ सणानिमित्त जिल्हयात साथरोग प्रतिबंध अधिनियम लागू   वाशिम, दि. 24 (जिमाका) : कोविड- 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 14 मार्च 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनिम 1897 लागू करण्यात आल्याबाबतची अधिसूचना 14 मार्च 2020 च्या अधिसूचनेनुार नियमावली प्रसिध्द करण्यात आली आहे. 17 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार एकत्रित सुधारीत मार्गदर्शन सूचना देखील निर्गमित करण्यात आल्या आहे. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हयात कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम 1897 नुसार जिल्हयात नाताळ सणानिमित्त पुढीलप्रमाणे आदेश लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीदेखील नाताळचा सण आरोग्याच्या दृष्टीने पुर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करावा. कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या 27 नोव्हेंबर 2021 च्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. नाताळ/ख्रिसमस निमित्तान

नायलॉन मांजावर बंदी काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश

  नायलॉन मांजावर बंदी काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश            वाशिम, दि. 24 (जिमाका) : पतंग उडविण्यासाठी उपयोगात येणाऱ्या नायलॉन मांजाचे उत्पादन, उपयोग, विक्री आणि आयातीवर राष्ट्रीय हरीत न्यायाधिकरणाच्या 11 जुलै 2017 च्या आदेशानुसार पुर्णपणे बंदी आणलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 15 डिसेंबर 2021 रोजी आदेश देवून नायलॉन मांजा बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शहरात विशेष पथकाची स्थापना करण्याबाबत कळविले. जिल्हयात व्यापक जनजागृती करण्यासाठी आणि नायलॉन मांजा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधिक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल), सर्व तहसिलदार आणि नगर पालीका प्रशासनाचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांची या विशेष पथकात नेमणूक करण्यात आली आहे. नायलॉन मांजाचा सर्रास उपयोग केला जात आहे. व्यापारी नायलॉन मांजाची लपुन छपुन विक्री करीत आहे. त्यामुळे सदर बाब उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर यांनी गंभीरतेने घेऊन विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले असून या विशेष पथकातील अधिकारी नायलॉन मांजा बंदीचे उल्लं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना वसतीगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना वसतीगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज मागविले वाशिम, दि. 24 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासून सुरु केलेली आहे. सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20 मधील पात्र विद्यार्थ्यांनी सन 2021-22 या वर्षामध्ये अर्जांचे नुतनीकरणासाठी मागील सत्र परीक्षांची गुणपत्रिका व महाविद्यालयाचे सन 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षांची उपस्थिती व बोनाफाईड तसेच सन 2020-21 आणि 2021-22 या दोन वर्षानुसार स्वतंत्रपणे भाडे करारनामा व अर्जामध्ये नमुद इतर आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. पात्रतेसंबंधी निकष पुढीलप्रमाणे- विद्यार्थी हा शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. तो विद्यार्थी राज्याचा

पोलीसांच्या कामामध्ये पोलीस पाटीलांचे योगदान महत्वाचे -पोलीस अधिक्षक बच्चन सिंह पोलीस पाटील यांची आढावा सभा

Image
  पोलीसांच्या कामामध्ये पोलीस पाटीलांचे योगदान महत्वाचे                                                                       -पोलीस अधिक्षक बच्चन सिंह पोलीस पाटील यांची आढावा सभा            वाशिम ,   दि.   23 (जिमाका) : गावपातळीवर पोलीस पाटील हा पोलीस दलाचा महत्वाचा घटक आहे. पोलीस पाटील हे गाव आणि पोलीस यांच्या मधील महत्वाचा दुवा आहे. कोरोना काळात गावपातळीवर पोलीस पाटीलांनी मोलाची कामगीरी पार पाडली. पोलीसांच्या कामाध्ये पोलीस पाटीलांचे योगदान महत्वाचे आहे. असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी केले.                आज 23 डिसेंबर रोजी पोलीस पाटलांच्या अडचणी व प्रश्न जाणून घेण्यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस पाटील यांची आढावा सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. सिंह बोलत होते. अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.               श्री. सिंह मार्गदर्शन करतांना म्हणाले, जिल्हयात एकूण पोलीस पाटील यांची 682 पदे आहे. त्यापैकी 443 पोलीस पाटील सध्या कार्यरत आहे. 249 पोलीस पाटील यांची रिक्त असलेली पदे भरण्याबाबत संबंधित विभागासोबत पत्र व

कौशल्य विकासातून आर्थिक प्रगती या विषयावर 27 डिसेंबरला ऑनलाईन वेबीनार

  कौशल्य विकासातून आर्थिक प्रगती या विषयावर 27 डिसेंबरला ऑनलाईन वेबीनार            वाशिम ,   दि.   23 (जिमाका) : युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्यावतीने 2 ७ डिसेंबर रोजी दुपारी 1 ते   दुपारी 2 या वेळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत कौशल्य विकासातून आर्थिक प्रगती या विषयावर दिल्ली येथील दिग्दर्शक मिंग्लिश मत्र अकादमीचे प्रा. चेतन ठाकरे हे ऑनलाईन वेबीनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. तरी इच्छुक युवक/युवतींनी या वेबिनारचा लाभ घ्यावा. या वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.goole.com/hah-efkd-sqx या लिंकवर क्लिक करुन सत्रास सहभागी व्हावे. आपल्याकडे गुगल मिटॲप यापूर्वी इन्सटॉल केलेला नसेल तर इन्सटॉल करुन घ्यावा. गुगल मिटॲप मधून कनेक्‍ट झाल्यानंतर वरील लिंकवर जॉईल व्हावे. सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी 10 मिनीटे वेळेपूर्वी जॉईन व्हावे. काही अडचणी असल्यास 07252-231494 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे जि ल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे. *******

तंत्र शिक्षण एक संधी या विषयावर 24 डिसेंबरला ऑनलाईन वेबीनार

  तंत्र शिक्षण एक संधी या विषयावर 24 डिसेंबरला ऑनलाईन वेबीनार            वाशिम ,   दि.   23 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिमच्यावतीने युवक-युवतींसाठी 24 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते   दुपारी 4.30 या वेळेत जिल्हा उद्योक केंद्रामार्फत नवउद्योजकांना मार्गदर्शन तसेच तंत्र शिक्षण एक संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा उद्योग केंद्र परभणीचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक रविंद्र पत्की आणि परभणी येथील श्री शिवाजी पॉलटेक्निकचे ट्रेनिंग ॲन्ड प्लेसमेंट अधिकारी श्री. ज्ञानेश्वर तरवटे हे मार्गदर्शन करणार आहे. तरी इच्छुक युवक/युवतींनी या वेबिनारचा लाभ घ्यावा. या वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी फेसबुक https://www.facebook.com/MaharashtraSDEED आणि युट्युब https://www.youtube.com/channel/UC702gQB5q7ValTABN4FHw1A या माध्यमातून सहभागी व्हावे. असे जि ल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी कळविले आहे. *******

जिल्हयाच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडयाचे विमोचन

Image
  जिल्हयाच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडयाचे विमोचन            वाशिम, दि. 23 (जिमाका) : जिल्ह्याचा सन २०२२-२३ करीता संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे (पीएलपी : २०२२-२३) प्रकाशन २२ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या सभेत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, रिजर्व्ह बँकेचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक उमेश भंसाळी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर , नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार , विविध बँकांचे अधिकारी आणि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.                राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डकडून प्रत्येक वर्षी जिल्ह्याचा पत पुरवठा आराखडा तयार करण्यात येतो. यासाठी विविध विभागांकडून माहितीच्या आधारे तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेली  सिंचन क्षमता , शेती धारणा , घेतले जाणारे पीक आणि त्याला उपलब्ध असणारी बाजारपेठ , मूलभूत सोई-सुविधा , नवीन सरकारी धोरण आणि शेतीपूरक व्यवसायाच्या संधी इत्यादी बाबींचा लेखाजोखा घेऊन वित्त धोरण ठरविले जाते. या बरोबरच शेती पूरक

आरटीओ कार्यालयाचे मासिक शिबीर दौरा

  आरटीओ कार्यालयाचे मासिक शिबीर दौरा वाशिम, दि. 23 (जिमाका) : जिल्हयातील मोटार वाहन चालक/मालक यांच्या सोयीसाठी कोविड- 19 च्या नियमावलीचे पालन करुन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक यांचा सन 2022 या वर्षातील माहे जानेवारी 2022 ते जून 2022 या कालवधीत मासिक शिबीर दौरा आयोजित केला आहे. मासिक शिबीर दौऱ्यात वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक अनुज्ञप्ती तयार करण्यात येणार आहे. माहे जानेवारी 2022 मध्ये कारंजा येथे 4 जानेवारी, रिसोड- 6 जानेवारी, मानोरा- 11 जानेवारी, मंगरुळपीर- 18 जानेवारी आणि कारंजा- 20 जानेवारी. माहे फेब्रुवारी महिण्यात कारंजा- 3 फेब्रुवारी, रिसोड- 8 फेब्रुवारी, मानोरा- 11 फेब्रुवारी, मंगरुळपीर- 15 फेब्रुवारी आणि कारंजा 18 फेब्रुवारी. माहे मार्च महिण्यात कारंजा येथे 4 मार्च, रिसोड-7 मार्च, मानोरा- 17 मार्च, मंगरुळपीर- 21 मार्च आणि कारंजा 24 मार्च. एप्रिल महिण्यात कारंजा येथे 4 एप्रिल, रिसोड- 8 एप्रिल, मानोरा- 12 एप्रिल, मंगरुळपीर- 18 एप्रिल व कारंजा- 20 एप्रिल. मे महियात कारंजा येथे 4 मे, रिसोड- 9 मे, मानोरा- 13 मे, मंगरुळपीर-

पांगरी (नवघरे) येथे जनावरांचे लसीकरण व उपचार शिबीर

Image
  पांगरी (नवघरे) येथे जनावरांचे लसीकरण व उपचार शिबीर वाशिम, दि. 23 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने मालेगांव पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येत असलेल्या पांगरी (नवघरे) येथे 22 डिसेंबर रोजी पाळीव जनावरांचे तोंडखुरी व पायखुरी लसीकरण तसेच गर्भ तपासणी, व्यंध्यत्व तपासणी करुन आयोजित शिबीरात उपचार करण्यात आले. जनावरांचे लसीकरण व उपचार पशुधन विकास अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर देशमुख, पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुनिता सोळंके, सहायक पट्टीबंधक व्ही.सी. कांबळे यांनी केले. या शिबीरात 284 जनावरांचे लसीकरण व उपचार करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुधाकर नवघरे, ग्रामपंचायतचे सदस्य शंकर नवघरे, केशव नवघरे, लक्ष्मण नवघरे, भानुदास नवघरे, विष्णु नवघरे, गजानन इढोळे, तुळसीराम खडसे, पांडुरंग नवघरे, शंकर नवघरे यांचेसह अन्य पशुपालक यावेळी उपस्थित होते. उपस्थित पशुपालक शेतकऱ्यांना डॉ. देशमुख यांनी पशुंच्या लसीकरणाची आवश्यकता, वंध्यत्वे तपासणी, गर्भतपासणी, चारा बियाणे, अनुवांशिक सुधारणा आणि विविध पुशपालन योजनांची माहिती दिली. *******