जलशक्ती अभियानाच्या जल शक्ती केंद्राचे उद्घाटन

 



जलशक्ती अभियानाच्या

जल शक्ती केंद्राचे उद्घाटन

वाशिम, दि. 13 (जिमाका) :  जलशक्ती मंत्रालय, जल संसाधन,नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग भारत सरकार आणि मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त वतीने राबविण्यात येणाऱ्या जलशक्ती अभियानाच्या वाशिम येथील जल शक्ती केंद्राचे उद्घाटन आज 13 डिसेंबर रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी फित कापून केले. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. पी. आकोसकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपूरे, ज्येष्ठ पत्रकार सुनील मिसर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी केंद्र प्रमुख तथा वाशिम उपविभागीय जलसंधारण अधिकारी व्ही. पी. सपकाळ, मंगरुळपीर उपविभागीय जलसंधारण अधिकारी एच.पी.वाघमारे, रिसोडचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रेम शिंदे, कारंजा उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस. एस. फेरवाणी, तांत्रिक सहायक तथा उपकेंद्र प्रमुख मयुर हुमणे, आरेखक एस.पी.आंबेकर यांचेसह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

नविन कृत्रिमरित्या पुनर्भरण बांधकामे तयार करणे. अस्तीत्वातील तलावांचे जलस्त्रोतांचे पुनर्ज्जीवन करणे, पावसाळ्यापूर्वी नद्यांचे पुनर्ज्जीवन करणे, सर्व जलाशयांची जिओ-टॅगींगसह प्रगणना करणे आणि आवश्यकतेनुसार नवीन कामे घेण्यासाठी वरील सर्व माहितीच्या आधारे जिल्हास्तरीय जलसंधारण योजना तयार करण्याचे काम या अभियानातंर्गत करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे या अभियानामुळे भूगर्भातील पाण्याची साठवणूक वाढविण्यास मदत होणार आहे. तसेच जलस्त्रोतांचेही बळकटीकरण करण्यास हातभार लागणार आहे.   

                                                        *******


Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप