*आज 4 हजार 924 व्यक्तींचे लसीकरण*
*आज 4 हजार 924 व्यक्तींचे लसीकरण*
वाशिम दि.14 (जिमाका) जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 14 डिसेंबर रोजी 4 हजार 924 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 1 हजार 178 व्यक्तींनी व दुसरा डोस 3 हजार 746 व्यक्तींनी घेतला.
वाशिम तालुका : पहिला डोस - 261 व दुसरा डोस -920 असा एकूण 1181, मालेगाव तालुका : पहिला डोस -159 आणि दुसरा डोस - 687 एकूण 846, रिसोड तालुका : पहिला डोस - 160 व दुसरा डोस - 345 एकूण 505, कारंजा तालुका : पहिला डोस - 282 आणि दुसरा डोस -731 एकूण 1013, मानोरा तालुका : पहिला डोस - 176 व दुसरा डोस 553 एकूण 729 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस - 140 आणि दुसरा डोस - 510 असा एकूण 650 व्यक्तींना देण्यात आला.
Comments
Post a Comment