Posts

Showing posts from 2022

थंडीच्या लाटेदरम्यान जनतेने खबरदारी घ्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Image
थंडीच्या लाटेदरम्यान जनतेने खबरदारी घ्यावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन        वाशिम, दि. 27 (जिमाका) : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा जिल्ह्यात डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. तरी जिल्हयातील जनतेने थंडीच्या लाटेपासुन संरक्षण करण्याकरीता खबरदारी घेणे गरजेचे आहे. या लाटेदरम्यान जनतेने पुढील प्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे.         थंडीच्या लाटेदरम्यान काय करावे - टिव्हीवरील हवामानविषयक बातम्या बघाव्या, दैनंदिन वृत्तपत्रामधील हवामानविषयक बातम्या वाचाव्या. थंडीच्या लाटेपासून संरक्षण करण्याकरीता पुर्ण अंग झाकेल असे लोकरीचे,उबदार कपडे परिधान करावे. (शक्यतो सर्व अंग झाकलेले राहतील) डोक्यामध्ये टोपी/दुपट्टा पायामोजे व हातमोजे यांचा नियमित वापर करावा. घरात चप्पलचा वापर करावा व शक्यतो उबदार वातावरणामध्ये राहावे.             या कालावधीत ताप, सर्दी व खोकला यासारखे आजार उदभवू शकतात. याकरीता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अथवा खाजगी दवाखान्यात जाऊन वेळीच तपासणी करून उपचार करून घ्यावे. यादरम्यान प्रवास शक्यतोवर टाळावा. नियमीत कोमट (गरम केलेले पाणी) प्

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)**राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा**कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये**जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश*

Image
*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)* *राज्यातील कोविड परिस्थितीचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा* *कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये* *जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* नागपूर, दि. २२ : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.  मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव मनुकु

जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)**क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा**पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश*

Image
*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)* *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आढावा* *पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना आठवडाभरात अहवाल देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* नागपूर, दि. २१: पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी दिले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काल विधानसभेत यासंदर्भात सदस्य छगन भुजबळ यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्द्यावर निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी स्मारकाविषयी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आज नागपूर येथील विधानमंडळातील मंत्री परिषद सभागृहात बैठक झाली.  यावेळी इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे, आमदार श्री. भुजबळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव

सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतोहे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेराष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत विधानभवन येथे ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा प्रारंभ

Image
सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत विधानभवन येथे ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा प्रारंभ नागपूर, दि. २० : विधिमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला समर्पक राज्यघटना दिली आहे. या राज्यघटनेनुसार देशाचा कारभार चालतो. आपली लोकशाही जगात आदर्शवत मानली जाते. देशातील अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकतो, हे आपल्या प्रगल्भ लोकशाहीचे प्रतीक आहे, तसेच आपल्या लोकशाहीचे हे खूप सुंदर रुप आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. राज्यातील विविध विद्यापीठांच्या राज्यशास्र व लोकप्रशासन विषयांचा अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेमार्फत ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयावर आयोजित ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे आज विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल

नागपूर येथील विधीमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन

Image
नागपूर येथील विधीमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन नागपूर दि. २० : येथील विधीमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी यासाठी आज विधानभवनात हिरकणी कक्षाची सुरूवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सौ. अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी, स्तनपान करता यावे याकरिता कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत. अधिवेशना दरम्यान आमदार सौ. अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी यासाठी नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचे काकाज केले जात असून याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  अधिवेशनासाठी बाळासह आल

नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही*

Image
*नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही* मुंबई, दि. १९: नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.  विधानसभा सदस्य श्री. आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य दिलीप वळसे पाटील, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता.  यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री  श्री. शिंदे म्हणाले, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड स्टील प्रकल्पामुळे या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सहा हजार जणांना रोजगार मिळाला असून कोनसरी येथील प्रकल्प उभारल्यानंतर दहा हजार जणांना रोजगार मिळेल, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा सदस्य श्री. आत्राम यांच्या सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिले. ०००००

हिवाळी अधिवेशन* *तान्हुल्यासह आल्या आमदार मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक*

Image
*हिवाळी अधिवेशन*  *तान्हुल्यासह आल्या आमदार मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक* मुंबई, दि. १९: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.  विधानसभा सदस्य सौ. अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार सौ. आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.  विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ

हिवाळी अधिवेशन* *तान्हुल्यासह आल्या आमदार मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक*

Image
*हिवाळी अधिवेशन*  *तान्हुल्यासह आल्या आमदार मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक* मुंबई, दि. १९: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.  विधानसभा सदस्य सौ. अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्याच्या प्रशंसक या बाळासमवेत. याबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार सौ. आहेर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली.  विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे हे निश्चितच आव्हानात्मक आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विधिमंडळात पहिल्यांदाच अशी घटना घडत असल्याने त्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर कौतुक केले. यावेळी आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ

विधिमंडळ अधिवेशन : माध्यम कक्षाचे उद्घाटन**श्रीमती जयश्री भोज यांचा पत्रकारांशी संवाद*

Image
वृत्त क्र. ६ *विधिमंडळ अधिवेशन : माध्यम कक्षाचे उद्घाटन* *श्रीमती जयश्री भोज यांचा पत्रकारांशी संवाद*             नागपूर, दि. १९ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी सिव्हील लाईन्स येथील 'सुयोग' निवासस्थानी उभारण्यात आलेल्या माध्यम कक्षाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज यांच्या हस्ते करण्यात आले.             यावेळी श्रीमती भोज यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ असून शासनाच्या विविध योजना, निर्णय यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये माध्यमांचे योगदान मोलाचे आहे. पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत सहकार्य करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी इतर विविध मुद्यांच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.             माध्यम कक्षामध्ये पत्रकारांसाठी संगणक, वायफाय सुविधेसह इतर सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर संचालक कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम वि

पन्नास हजारांहुन अधिक वाहनांचा समृद्धी महामार्गावरुन प्रवास

Image
*पन्नास हजारांहुन अधिक वाहनांचा समृद्धी महामार्गावरुन प्रवास* मुंबई, दि.17 हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात 50 हजारांहुन अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास केलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर ते शिर्डी  या  पहिल्या टप्प्याचे  उद्घाटन  11 डिसेंबर,2022 रोजी नागपूर येथे झाले. मा.मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व मा.उपमुख्यमंत्री  श्री. देवेंद्र फडवणीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर दुपारी 2 वाजता द्रुतगती मार्ग वाहतुकीस सर्वांना खुला करण्यात आला. नागपूर ते शिर्डी या 520 कि.मी.च्या टप्प्यात शुक्रवारपर्यंत 50 हजारांहुन अधिक वाहनांनी प्रवास केला आहे.द्रुतगती मार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारक व चालकांची कुठेही गैरसोय होऊ नये, याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पुरेपुर काळजी घेतलेली आहे. *इंधनस्थळ* समृद्धी मह

विधी स्वयंसेवकासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

Image
विधी स्वयंसेवकासाठी  31 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित वाशिम, दि. 16 (जिमाका) :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम येथे 50 विधी स्वयंसेवक आणि तालुका विधी सेवा समिती मंगरुळपीर, मालेगांव, मानोरा, कारंजा व रिसोड येथे प्रत्येकी 25 विधी स्वयंसेवकांची एक वर्षाकरीता राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या नियमानुसार ज्या दिवशी काम करेल त्या दिवशीच्या मानधनावर नियुक्ती करावयाची आहे. याबाबत अटी शर्तीसह अर्जाचा नमुना उपलब्ध करुन घेण्यासाठी जिल्हा न्यायालय, वाशिम यांच्या  https://districts.ecourts.gov. in/washi m या संकेतस्थळाला भेट दयावी. अर्ज 31 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वाशिम यांच्याकडे प्रत्यक्षरित्या सादर करावे. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी कळविले आहे. *******

प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करीता विमा प्रस्ताव 15 डिसेंबरपर्यंत मागविले

Image
प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2022-23 करीता विमा प्रस्ताव 15 डिसेंबरपर्यंत मागविले        वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हयात सन 2022-23 रब्बी हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याकरीता मान्यता मिळाली आहे. भारतिय कृषि विमा कंपनी, मुंबई यांना जिल्हयामध्ये पिक विमा राबविण्यास मान्यता प्रदान केली आहे. उभ्या पिकास दुष्काळ, पुर, भुस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, किड, रोगराई, नैसर्गिक आग व विज कोसळणे आदी नैसर्गिक आपत्तीपासुन होणाऱ्या पिक नुकसानीस संरक्षण देणे हा या योजनेचा उददेश आहे.           जिल्हयात रब्बी हंगामात प्रामुख्याने घेण्यात येणाऱ्या गहु बागायत, हरभरा व उन्हाळी भुईमुग या पिकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही योजना जिल्हयातील सर्व तालुक्यातील सर्व मंडळांना लागू करण्यात आली आहे. अधिसुचीत क्षेत्रात अधिसुचीत पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.           या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामासा

गुरव समाज महाअधिवेशन, सोलापूर गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरव समाजाकडून ईश्वर सेवा व लोकप्रबोधनाचे कार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
गुरव समाज महाअधिवेशन, सोलापूर गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरव समाजाकडून ईश्वर सेवा व लोकप्रबोधनाचे कार्य  – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  सोलापूर, दि. 11, (जि. मा. का.) : गुरव समाज हा देव, देश, धर्म, सामाजिक बांधिलकी जोपासणारा, निसर्गपूजक आहे. त्यामुळे गुरव बांधवांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आणि आदराचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने आयोजित गुरव समाजाच्या महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवरांच्या हस्ते या महाअधिवेशनाचे उद्‌घाटन झाले.  डी. ए. कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या महाअधिवेशनास महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, ज्ञानराज चौगुले, शहाजीबापू पाटील, राणा जगजीत सिंह, यशवंत माने आणि राजेंद्र राऊत, राष्ट्रीय गुरव

पायाभूत सुविधांना मानवी चेहरा देतानाच* *वंचितांच्या विकासास अग्रक्रम- प्रधानमंत्री**• स्थायी विकासाच्या धोरणास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन*

Image
*पायाभूत सुविधांना मानवी चेहरा देतानाच*  *वंचितांच्या विकासास अग्रक्रम- प्रधानमंत्री* *• स्थायी विकासाच्या धोरणास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन* *• नागपुरात 75 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण - भूमिपूजन* *नागपूर, दि. 11* :  आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून वंचित-उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिली. स्थायी विकासाचे धोरण हे देशासाठी सर्वाधिक गरजेचे असून त्यास सर्व घटकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले. मिहान (नागपूर) येथील एम्स संस्थेजवळील मंदीर मैदानावर आयोजित कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमं

नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण* विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी खापरी-ऑटोमोटिव्ह आणि प्रजापती नगर-लोकमान्य नगर मार्गावर प्रवासी सेवेचा प्रारंभ

Image
*नागपूर मेट्रोचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण*  विस्तारीकरण प्रकल्पाची पायाभरणी खापरी-ऑटोमोटिव्ह आणि प्रजापती नगर-लोकमान्य नगर मार्गावर प्रवासी सेवेचा प्रारंभ नागपूर, दि.११ : नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणाऱ्या नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मार्गाचे लोकार्पण तसेच दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो विस्तारीकरण  प्रकल्पाची पायाभरणी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खापरी मेट्रो स्थानकावर करण्यात आली. याप्रसंगी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.  प्रधानमंत्र्यांनी  झिरो माईल मेट्रो ते  खापरी मेट्रो स्थानका दरम्यान मेट्रोने प्रवास केला. यानंतर त्यांनी  खापरी मेट्रो स्थानकाला नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्ग क्रमांक-२ व मार्ग क्रमांक-४ अंतर्गत ‘कस्तुरचंद पार्

समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण**महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास*

Image
*समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण* *महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास* नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पाँईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली. तत्पूर्वी श्री. मोदी यांनी समृद्धी महामार्गावर झिरो पाँईंट ते टोल प्लाझा असा 10 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवर होते.  *प्रधानमंत्र्यांनी घेतला ढोलताशाचा आनंद* कोनशिला अनावरणप्रसंगी प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी ढोलताशा पथक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा**फ्रीडम पार्क - खापरी मेट्रो प्रवास* *प्रवाशांशी साधला संवाद*

Image
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा* *फ्रीडम पार्क - खापरी मेट्रो प्रवास*  *प्रवाशांशी साधला संवाद* नागपूर , दि.११: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन  ते  खापरी या स्थानकांदरम्यान मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. प्रधानमंत्र्यांसोबत  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.   नागपूर शहराला नवी ओळख प्राप्त करून देणाऱ्या मेट्रोवर आधारित प्रदर्शनाची पाहणीही श्री. मोदी यांनी केली. यावेळी मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या विविध प्रकल्पाची माहिती दिली. या पाहणीनंतर प्रधानमंत्री मोदी यांनी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी प्रवास केला. या प्रवासात त्यांनी स्टार्टअप विद्यार्थी, मेट्रो कर्मचारी व इतर प्रवाशांसोबत संवाद साधला.   000

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला* *प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा*

Image
*नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला* *प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा* *नागपूर ,११*: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस या वेगवान रेल्वे गाडीला हिरवा  झेंडा दाखवून मार्गस्थ केले. या गाडीमुळे या दोन्ही शहरांदरम्यान वेगवान रेल्वेगाडीचा पर्याय उपलब्ध झाला असून ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे.          राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व  महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी  उपस्थित होते.              प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी रेल्वे स्थानकावर उभ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यामधील प्रवाशांशी संवाद साधला. तसेच या एक्सप्रेस गाडीच्या कॅबिनलाही  भेट देवून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुख्य कार्यक्रमस्थळी त्यांनी या एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी उपस्थित मान्यवर, विद्यार्थ्यांसह  रेल्वे अधिकारी कर्मचारी व  ना

समृद्धी महामार्ग : वाशीमच्या विकासाला दिशा*

Image
*समृद्धी महामार्ग : वाशीमच्या विकासाला दिशा*  रस्ते,इमारती आणि पूल ही विकासाची प्रतिके समजली जातात. अशाप्रकारच्या विकासामुळे राज्याच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होतो. दळणवळणाच्या चांगल्या सुविधांमुळे विकासाला गती मिळते.विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागाच्या विकासाला गती मिळणार आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात पूर्णत्वाकडे गेलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे.या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातील मौजे वायफळ येथे होणार आहे.महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्या राज्यातील सुमारे ३६ टक्के जनतेच्या जीवनात थेट परिवर्तन घडण्यास या महामार्गाची मदत होणार आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्यातील १० जिल्हे,२६ तालुके आणि ३९२ गावाजवळून जातो.          पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी यादरम्यानच्या ५२० किलोमीटर महामार्गाचे काम पूर्ण झाले आ

कारखेडा येथे आपत्ती व्यवस्थापन स्कूल माँकड्रिल संपन्न

Image
कारखेडा  येथे आपत्ती व्यवस्थापन स्कूल माँकड्रिल संपन्न  वाशिम,दि.९ (जिमाका)   शालेय शिक्षण विभाग , नागरी संरक्षण नियंत्रण केंद्र तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय व जिल्हा होमगार्ड मुख्यालय,वाशिम यांच्या संयुक्त वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ३४ शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन स्कूल माँकड्रिल चे आयोजन करण्यात आले आहे.           वाशिम जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारखेडा ता. मानोरा या शाळेची निवड करण्यात आली होती. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन माँकड्रिल घेण्यात आली. या प्रसंगी गांधीनगर येथील  विपुल नकुम रेखा इंडिया गुजरात, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  शाहू भगत, केंद्र नायक श्री रामटेके, पिटीसी श्री खोडके, केंद्र प्रमुख श्री बोरशे,श्री डोळस,श्री गजानन देशमुख, पोलिस पाटील वासुदेव सोनोने इतर  पदाधिकारी उपस्थित होते.         सर्व प्रथम शाळेचे आपत्ती व्यवस्थापनाबाबत शाहू भगत, विपुल नकुम, श्री रामटेके  यांनी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय व कुठल्याही आपत्तीला सामोरे कसे जावे व भूकंप,आग याबाबत म

जी २० परिषद बैठका: पंतप्रधानांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद**राज्यांचे ब्रँडींग करताना कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग महत्वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी*

Image
*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)* *जी २० परिषद बैठका: पंतप्रधानांनी विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद* *राज्यांचे ब्रँडींग करताना कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग महत्वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी* *जी २० परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही* मुंबई, दि.९: भारतात येत्या वर्षभरात होणाऱ्या जी २० परीषदेच्या बैठका आणि कार्यक्रमांच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रात दि. १२ डिसेंबरपासून जी २० परिषदेच्या बैठकांना मुंबईत सुरूवात होणार असून त्यासाठी मुंबई शहर सज्ज झाले आहे. राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवितानाच राज्यात गुंतवणूकीसाठी क्षमता असलेल्या क्षेत्रांची ओळख देखील परदेशी पाहुण्यांना करून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. जगभरातील देशांमध्ये तिथल्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जी २० परिषदेशी संबंधित सुमारे १ लाख लोक आपल्याकडे येत आहे

*समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण**पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ*

Image
*जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)* *समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण* *पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ* *मुख्यमंत्र्यांनी घेतला लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा* *समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* मुंबई, दि. ९: महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान श्री. मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार असून समृद्धी महामार्गावरून प्रवास देखील करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.  दरम्यान, काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

क्रीडा स्पर्धेत नियोजन अधिकारी श्रीमती आंबरे यांचे यश

Image
क्रीडा स्पर्धेत नियोजन अधिकारी श्रीमती आंबरे यांचे यश        वाशिम, दि. 08 (जिमाका) : नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम 3 व 4 डिसेंबर 2022 दरम्यान श्री. शिवछत्रपती स्पोर्टस, कॉम्प्लेक्स, बालेवाडी पुणे येथे संपन्न झाले. यामध्ये राज्यातील 500 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत थाळीफेक व कॅरम क्रीडा प्रकारात जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांनी यश संपादन केले. श्रीमती आंबरे यांनी 45 वर्षावरील महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक, कॅरम एकेरीत तृतीय आणि कॅरमच्या मिश्र दुहेरीमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते श्रीमती आंबरे यांना पदक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.          या कार्यक्रमाला अर्थ व नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त कार्यालय पुणेचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनील रामोड, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर, उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव दिलीप राजुरकर व पुण्याचे