क्रीडा स्पर्धेत नियोजन अधिकारी श्रीमती आंबरे यांचे यश

क्रीडा स्पर्धेत नियोजन अधिकारी
श्रीमती आंबरे यांचे यश

       वाशिम, दि. 08 (जिमाका) : नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम 3 व 4 डिसेंबर 2022 दरम्यान श्री. शिवछत्रपती स्पोर्टस, कॉम्प्लेक्स, बालेवाडी पुणे येथे संपन्न झाले. यामध्ये राज्यातील 500 पेक्षा अधिक अधिकारी-कर्मचारी खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत थाळीफेक व कॅरम क्रीडा प्रकारात जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे यांनी यश संपादन केले. श्रीमती आंबरे यांनी 45 वर्षावरील महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक, कॅरम एकेरीत तृतीय आणि कॅरमच्या मिश्र दुहेरीमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते श्रीमती आंबरे यांना पदक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.

         या कार्यक्रमाला अर्थ व नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त कार्यालय पुणेचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनील रामोड, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर, उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव दिलीप राजुरकर व पुण्याचे उपआयुक्त (नियोजन) संजय कोलगणे प्रामुख्याने उपस्थित होते, श्रीमती आंबरे यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे