कारखेडा येथे आपत्ती व्यवस्थापन स्कूल माँकड्रिल संपन्न
कारखेडा येथे आपत्ती व्यवस्थापन स्कूल माँकड्रिल संपन्न
वाशिम,दि.९ (जिमाका) शालेय शिक्षण विभाग , नागरी संरक्षण नियंत्रण केंद्र तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय व जिल्हा होमगार्ड मुख्यालय,वाशिम यांच्या संयुक्त वतीने संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ३४ शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन स्कूल माँकड्रिल चे आयोजन करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारखेडा ता. मानोरा या शाळेची निवड करण्यात आली होती. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन माँकड्रिल घेण्यात आली.
या प्रसंगी गांधीनगर येथील विपुल नकुम रेखा इंडिया गुजरात, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, केंद्र नायक श्री रामटेके, पिटीसी श्री खोडके, केंद्र प्रमुख श्री बोरशे,श्री डोळस,श्री गजानन देशमुख, पोलिस पाटील वासुदेव सोनोने इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व प्रथम शाळेचे आपत्ती व्यवस्थापनाबाबत शाहू भगत, विपुल नकुम, श्री रामटेके यांनी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय व कुठल्याही आपत्तीला सामोरे कसे जावे व भूकंप,आग याबाबत मार्गदर्शन केले.
होमगार्ड ऑफिसर रामटेके व त्यांची संपूर्ण चमु यांनी भूकंप, आग तसेच प्रथमोपचार इत्यादी गोष्टी समजावून सांगितल्या व माँक ड्रिल घेतली.यावेळी आग विझविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.तसेच रुग्णवाहीकेची कशी मदत घ्यायची हे प्रात्यक्षिक सुद्धा सादर करण्यात आले.
.आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांचे या ड्रिल साठी मार्गदर्शन व सहकार्य लाभले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व मुख्याध्यापक श्री पोतदार ,शिक्षक श्री जाधव, कु राऊत व इतर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment