Posts

Showing posts from September, 2023

आकांक्षित तालुका कार्यक्रम मालेगाव तालुक्यात उत्साहात ग्रामपंचायत सदस्य,बचतगट महिला, ग्रामस्थ ऑनलाईन उदघाटन सोहळ्यात सहभागी

Image
आकांक्षित तालुका कार्यक्रम  मालेगाव तालुक्यात उत्साहात  ग्रामपंचायत सदस्य,बचतगट महिला, ग्रामस्थ ऑनलाईन उदघाटन सोहळ्यात सहभागी वाशिम दि,30 (जिमाका) आकांक्षित तालुका कार्यक्रम (Aspirational Block Programme ) हा देशात केंद्र सरकारच्या नीती आयोगामार्फत देशात एकूण 500 पंचायत समित्यांमध्ये राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याची आकांक्षित तालुका म्हणून निवड करण्यात आली आहे. 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान या कार्यक्रमांतर्गत संकल्प सप्ताह राबविला जाणार आहे.या संकल्प सप्ताहाचे उदघाटन आज 30 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आले.               या उदघाटन सोहळ्यासाठी देशभरातून 3000 अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.यामध्ये वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,मालेगाव पंचायत समितीच्या सभापती रंजना काळे,मालेगाव गट विकास अधिकारी कैलास घुगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष बोरसे व विस्तार अधिकारी सांख्यिकी स्वप्नील खंडारे यांची उपस्थिती होती.           मालेगाव पंचायत समिती येथुन या कार्यक्रमात सह

देशातील आकांक्षीत तालुक्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला, ‘संकल्प सप्ताह’ हा साप्ताहिक कार्यक्रम

Image
देशातील आकांक्षीत तालुक्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केला, ‘संकल्प सप्ताह’ हा साप्ताहिक कार्यक्रम आकांक्षीत तालुके कार्यक्रम पोर्टलचाही शुभारंभ “माझ्यासाठी हे संमेलनही जी-20 पेक्षा कमी नाही” “हा कार्यक्रम टीम भारतच्या आणि सबका साथ या भावनेच्या यशाचे प्रतीक” “स्वतंत्र भारतातील सर्वात प्रमुख दहा अभियानांच्या कोणत्याही यादीत, आकांक्षीत जिल्ह्यांचा कार्यक्रम, सुवर्णाक्षरात लिहिला जाईल” “आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमाच्या प्रगतीचा आलेख, माझ्यासाठी एक प्रेरणास्त्रोत बनला आहे.” “संसाधानांचा जास्तीत जास्त उपयोग आणि तळागाळापर्यंत त्यांचे अभिसरण हाच विकासाचा पाया” “आम्ही शिक्षा नियुक्तीची संकल्पना, आकांक्षा नियुक्तीत बदलली” “गरजू भागांवर विशेष भर देत, संसाधनांचे समान वितरण व्हावे” “लोकसहभागात कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याची अद्भुत क्षमता”  “जे 112 जिल्हे आकांक्षीत जिल्हे म्हटले जात, ते आता प्रेरणादायी जिल्हे म्हणून ओळखले जातात” वाशिम,दि.30 (जिमाका)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे देशातल्या तालुक्यांच्या विकासासाठी एका विशेष

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी : जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा

Image
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी :  जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घ्यावा वाशिम,दि.30 (जिमाका) दिव्यांग नागरिकांमध्ये विविध प्रवर्गातील दिव्यांग आहेत. त्यातील अनेक दिव्यांग विभागीयस्तरावर जाऊन आपली तक्रार नोंदवु शकत नाहीत. त्यामुळे शासनाने दिव्यांगांना आपल्या अडचणी मांडण्यासाठी उपाययोजना केली, तर त्यांच्यासाठी महत्वाचे ठरेल त्यामुळे जर शासनच अशा दिव्यांग बांधवांच्या दारी गेले तर खऱ्या अर्थाने दिव्यांगांची सेवा होवु शकते हा हेतु ठेवुन, जिल्हा स्तरावर शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी, सर्व शासकिय यंत्रणा एकाच ठिकाणी उपस्थित राहुन दिव्यांगाच्या तक्रारी जाणुन घेवून त्याच ठिकाणी कामाचा निपटारा करता येईल.याकरीता दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.          दिव्यांगांना दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.तसेच शासकिय योजनांचा फायदा घेण्यास आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी बराच त्रास सहन करावा लागतो.दिव्यांगाना आवश्यक असणारी सर्व प्रमाणपत्रे जसे की,दिव्यांगत्वाचे युडीआयडी प्रमाणपत्र,शेतजमिनीशी संबंधित कागदप

आकांक्षित तालुका कार्यक्रम**संकल्प सप्ताहाचे 30 सप्टेंबरला उद्घाटन*मालेगाव तालुक्याची निवड

Image
*आकांक्षित तालुका कार्यक्रम* *संकल्प सप्ताहाचे 30 सप्टेंबरला उद्घाटन* मालेगाव तालुक्याची निवड                वाशीम दि.29 (जिमाका) जिल्ह्यात 3 ते 9 ऑक्टोबरपर्यंत आकांक्षित तालुका म्हणून केंद्र सरकारने मालेगाव तालुक्याची निवड केली आहे.या तालुक्यात संकल्प सप्ताह  राबविण्यात येणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 30 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता भारत मंडपम,नवी दिल्ली येथे संकल्प सप्ताहाचे उद्घाटन आयोजित करण्यात आले आहे.                  या उद्घाटन सोहळ्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा/तालुकास्तरीय अधिकारी,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष,पंचायत समिती सभापती व सरपंच असे एकूण 154 लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सिंचन सुविधा निर्माण करून शेती व्यवसाय व उद्योगाला जिल्ह्यात चालना देणार केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी * अकोला-वारंगा फाटा दरम्यानच्या 133.85 किमी रस्त्याचे राष्ट्रार्पण* सिंचनविषयक व्हीजन डॉक्युमेंटचे प्रकाशन* कंत्राटदारांचा सत्कार

Image
सिंचन सुविधा निर्माण करून शेती व्यवसाय व उद्योगाला जिल्ह्यात चालना देणार      केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी  * अकोला-वारंगा फाटा दरम्यानच्या 133.85 किमी रस्त्याचे राष्ट्रार्पण * सिंचनविषयक व्हीजन डॉक्युमेंटचे प्रकाशन * कंत्राटदारांचा सत्कार  वाशिम दि 29 (जिमाका) जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.जिल्ह्यातून जाणारा पूर्वी एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता आज 228 किमीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम आज पूर्ण झाले आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षाचा कार्यभार पूर्ण झालेला असेल तेव्हा जिल्ह्यात एकूण 10 हजार कोटी रुपयांची राजमार्गाची कामे पूर्ण होतील. जिल्ह्यातून 12 ते 13 नद्यांचा उगम आहे. ते पाणी बाहेर जिल्ह्यात वाहून जाते.त्यामुळे सिंचन क्षेत्र कमी आहे.मात्र जिल्ह्यात व्हीजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून सिंचन सुविधा निर्माण करण्यावर आपला विशेष भर राहणार आहे.त्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय आणि उद्योगाला चालना देण्यात येईल.असे प्रतिपादन केंद्रीय रस

पालकमंत्री संजय राठोड 29 सप्टेंबरला जिल्ह्यात

Image
पालकमंत्री संजय राठोड 29 सप्टेंबरला जिल्ह्यात  वाशिम दि.28 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता यवतमाळ निवासस्थान येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण.सकाळी 10.30 वाजता वाशिम येथील पाटणी कॉम्प्लेक्स येथे आयोजित राष्ट्रीय महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 12.05 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 12.15 वाजता दिग्रसकडे प्रयाण करतील.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार 30 सप्टेंबर रोजी जिल्हयात

Image
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार 30 सप्टेंबर रोजी जिल्हयात                 वाशिम,दि.28 (जिमाका) वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे शनिवार 30 सप्टेंबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे .शनिवार 30 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता मोटारीने चंद्रपूर येथून वर्धा - वाशिम - रिसोड मार्गे लोणीकडे प्रयाण, दुपारी 2 वाजता श्री.सखाराम महाराज मंदिर लोणी येथे आगमन व राखीव, सायंकाळी 4.30 वाजता श्री. मुनगंटीवार मोटारीने लोणी येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

1 ऑक्टोबरला " स्वच्छता ही सेवा " उपक्रम सर्वांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन

Image
1 ऑक्टोबरला " स्वच्छता ही सेवा " उपक्रम  सर्वांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन         वाशिम.दि.28 (जिमाका) 2ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून " स्वच्छता ही सेवा 2023 "  हा उपक्रम (एक तारीख-एक तास) 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम एक तास संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.या उपक्रमांतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येक वॉर्ड व ग्रामपंचायतीमध्ये 1 तास श्रमदानाद्वारे स्वच्छता करण्यात येणार आहे.              हा उपक्रम राबविण्याकरीता वॉर्ड व ग्रामपंचायतीअंतर्गत जास्त कचरा असलेले क्षेत्र,रेल्वे स्टेशन,बसस्थानके, राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या शेजारील जागा,जलस्रोत,नदीघाट, झोपडपट्ट्या,पुलाखालच्या जागा, बाजारपेठा,गल्ल्या,धार्मिक स्थळे, सार्वजनिक व खाजगी कार्यालयांचे परिसर,पर्यटन स्थळे, टोलनाके,प्राणी संग्रहालये,गोशाळा,रहिवाशी क्षेत्र, आरोग्य संस्थाच्या आसपासचा परिसर,अंगणवाडी परिसर,शाळा व महाविद्यालय परिसर अशा ठिकाणाची हा उपक्रम राबविण्यासाठी निवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.    

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 29 सप्टेंबर रोजी वाशीम येथे

Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 29 सप्टेंबर रोजी वाशीम येथे वाशीम दि 27 (जिमाका) केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी हे 29 सप्टेंबर रोजी वाशीम येथे येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.शुक्रवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून हेलिकॉप्टरने वाशिमकडे प्रयाण. सकाळी 10:30 वाजता वाशिम येथील पोलीस कवायत मैदान येथे आगमन. सकाळी 10:30 वाजता पोलीस कवायत मैदान येथून शासकीय वाहनाने रिसोड मार्गावरील पाटणी कॉम्प्लेक्सकडे प्रयाण. सकाळी 10:40 वाजता पाटणी कॉम्प्लेक्स येथे आगमन. सकाळी 10.45 वाजता श्री.नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चे राष्ट्रार्पण करण्यात येईल. दुपारी 12 वाजता पाटणी कॉम्प्लेक्स येथून जवाहर कॉलनी येथे दुपारी 12.15 वाजता आमदार राजेंद्र पाटणी यांच्या निवासस्थानी आगमन. दुपारी 1 वाजता जवाहर कॉलनी, वाशीम येथून पोलीस कवायत मैदानाकडे शासकीय वाहनाने प्रयाण. दुपारी 1:10 वाजता हेलिपॅड येथे आगमन व दुपारी 1.45 वाजता हेलिकॉप्टरने अकोलाकडे प्रयाण करतील.

एकात्मिक फलोत्‍पादन विकास अभियान जुन्‍या फळबागांचे पुनरूज्‍जीवनासाठी पोर्टलवर अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन

Image
एकात्मिक फलोत्‍पादन विकास अभियान जुन्‍या फळबागांचे पुनरूज्‍जीवनासाठी पोर्टलवर अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन        वाशिम, दि. 27 (जिमाका)  :   एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या  फळबागांचे पुनरूज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. योग्य मशागत पध्दतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न दिल्याने राज्यात बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे.             नवीन लागवडीप्रमाणे जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही राज्याची फळपिकांची एकुण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाची बाब आहे.            सन 2023-24 मध्ये राज्यात जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कु या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जी‍वनासाठी प्रकल्पित खर्च 40 हजार रुपये प्रति हेक्टर ग्राह्य धरून 50 टक्के प्रमाणे जास्तीत जास्त 20 हजार रुपये प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये कमीत

27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत श्री गणेश विसर्जनादरम्यान प्रतिबंधात्मक आदेश

Image
27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत श्री गणेश विसर्जनादरम्यान प्रतिबंधात्मक आदेश        वाशिम, दि. 27 (जिमाका)  :   जिल्हयात श्री गणेश विसर्जन 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान सार्वजनिकरित्या मिरवणुका काढून करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूक दरम्यान गणेश मंडळाकडून मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनावर लोखंडी तलवार, भाले, कोयते, विळे, त्रिशुल, कटयार असे प्रत्येक वाहनावर घातक व मारक शस्त्र लाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची पार्श्वभूमी आहे. जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील असून सार्वजनिक सण उत्सव काळात व इतर कारणावरुन जातीय दंगली घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पुर्व इतिहास आहे. जातीय दंगलीचे व गणेशोत्सव काळात दाखल गुन्हयांच्या आकडेवारीनुसार जिल्हा सण, उत्सवाच्यादृष्टीने व जातीयदृष्टया संवेदनशील असल्याचे स्पष्ट होते. जातीय दंगलीच्या गुन्हयातसुध्दा तलवारीचा वापर करण्यात आला असल्याचे आढळून आले आहे.              श्री.गणेश विसर्जनादरम्यान एखादा अनुचित प्रकार घडून जातीय दंगल घडून आल्यास, विसर्जनादरम्यान शक्ती प्रदर्शनाकरीता वाहनांवर लावण्यात आलेल्या घातक शस्त्रांचा वापर एकमेकांविरुध्द

अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून नागरिकांना तात्काळ ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात श्री. रामबाबू नरूकुल्ला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सभा

Image
अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून नागरिकांना तात्काळ ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन द्याव्यात                                         श्री. रामबाबू नरूकुल्ला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सभा         वाशिम, दि. 27 (जिमाका)  :   महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या प्रकारे तात्काळ ऑनलाईन सेवा मिळण्यासाठी यंत्रणांनी काम करावे. असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोग अमरावती विभागाचे आयुक्त रामबाबू नरूकुल्ला यांनी दिले.             आज 27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्ह्यात लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा सभेत श्री.नरुकुला बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे उपसचिव अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अनिल कावरखे व राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक अभिनव बालुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.             श्री.नरुकुल्ला म्हणाले, या अधिनि

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गाचे वाशिम येथे राष्ट्रार्पण....राष्ट्रीय महामार्ग 161 च्या 133 किमी च्या कामावर 3694 कोटी रुपये खर्च

Image
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गाचे वाशिम येथे राष्ट्रार्पण राष्ट्रीय महामार्ग 161 च्या 133 किमी च्या कामावर 3694 कोटी रुपये खर्च         वाशिम, दि. 27 (जिमाका) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता वाशीम येथील रिसोड मार्गावरील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमात तीन टप्प्यात पूर्ण करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चा राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. मेडशी ते वारंगा फाटा दरम्यानच्या 133.85 किमीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर 3694 कोटी 51 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे.           या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय राठोड, हिंगोली पालकमंत्री अब्दूल सत्तार, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे व खासदार हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य आमदार सर्वश्री वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, ऍड.किरणराव सरनाईक, विप्लव बाजोरिया, विक्रम काळे, संतोष चव्हाण, विधानसभा सदस्य आमदार सर्वश्री लखन

इ. 9 वी आणि इ. 11 वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 30 सप्टेंबर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत

Image
इ. 9 वी आणि इ. 11 वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 30 सप्टेंबर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत        वाशिम, दि. 26 (जिमाका)  :   केन्द्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, दिल्लीच्या वतीने घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी सन 2024 - 25 चे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सुरुवात झाली आले आहे. जे विद्यार्थी जिल्हयातील रहिवासी आहेत आणि मान्यता प्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता 8 वी व इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या प्रवेश परिक्षेकरीता अर्ज करु शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2009 ते 31 जुलै 2011 दरम्यान झाला असावा. ते विद्यार्थी इयत्ता 9 वीच्या परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या विद्यार्थ्याचा जन्म दिनांक 1 जुन 2007 ते 31 जुलै 2009 दरम्यान झाला आहे. असे विद्यार्थी इयत्ता 11 वीच्या प्रवेश परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक माहितीसाठी तसेच परिक्षेचे स्वरुप व इतर विस्तृत माहिती नवोदय विद्यालय समितीच्या  www.navodaya.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन

माजी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर योजनेचा अर्ज भरले असल्यास त्याची रक्कम 30 दिवसात प्राप्त करुन घ्यावी शासकीय तंत्रनिकेतनचे आवाहन

Image
माजी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर योजनेचा अर्ज भरले असल्यास त्याची रक्कम 30 दिवसात प्राप्त करुन घ्यावी शासकीय तंत्रनिकेतनचे आवाहन         वाशिम, दि. 26 (जिमाका)  :  वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक वर्ष सन 2009-10 पासून ते 2013-14 पर्यंतच्या माजी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचा, फ्रिशिप व विद्यावेतनचा अर्ज सादर केला होता व शिष्यवृत्ती, फिशिप व विद्यावेतनची रक्कम घेऊन गेलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी ही रक्कम संस्थेतून 30 दिवसाच्या आत रोखपाल, शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम यांचेकडे विहीत नमुन्यातील पावती सादर करुन रक्कम प्राप्त करुन घ्यावी. विहीत मुदतीत विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, फ्रिशिप व विद्यावेतनची रक्कम घेऊन न गेल्यास त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील अन्यथा ही रक्कम शासन जमा करण्यात येईल. असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम यांनी कळविले आहे.  *******

नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांनी केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी खासदार भावना गवळी जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती सभा

Image
नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांनी केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी                 खासदार भावना गवळी                                 जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती  सभा         वाशिम,दि.25 (जिमाका) जिल्हयाचा विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यस्तरीय यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच विविध योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी यंत्रणांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावजी करावी.असे निर्देश जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या अध्यक्षा खासदार भावना गवळी यांनी  दिले.                आज 25 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या आढावा बैठकीत श्रीमती गवळी अध्यक्षस्थानावावरून  बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार अमित झनक,समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे,कृषी समिती सभापती वैभव सरनाईक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,परिविक्षाधीन सहाय्यक ज

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी *जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्याचे सूक्ष्म नियोजन करा* जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

Image
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी *जास्तीत जास्त दिव्यांगांना लाभ देण्याचे सूक्ष्म नियोजन करा*                 जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.                                                        वाशिम, दि. 25 (जिमाका) 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात येत असलेल्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे.असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी दिले.            आज 25 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात 4 ऑक्टोबर रोजी वाशिम येथील रिसोड रोडवरील तिरुपती लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीराच्या तयारीचा आढावा घेतांना श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ,कारंजा उपविभागीय अध

बंजारा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध पालकमंत्री संजय राठोड .पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज मंदिर पायाभरणी

Image
बंजारा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध                     पालकमंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज मंदिर पायाभरणी वाशिम दि.24 (जिमाका) बंजारा समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी व उमरी येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकास कामांना सुरुवात झाली आहे.या तीर्थक्षेत्राचा विकास करतांना बंजारा समाजाच्या  सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.                   आज 24 सप्टेंबर रोजी पोहरादेवी येथे पोहरादेवी-उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पोहरादेवी विकास कामातील संत सेवालाल महाराज मंदिराची पायाभरणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते.बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज व कबीरदास महाराज यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली.             कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक विधानसभा उपसभापती तथा कर्नाटकच्या भायागड संस्थानचे अध्यक्ष रुद्रप्पा लभानी,कर्नाटकातील गुलबर्गचे खासदार उमेश राठोड, सत्कारमुर्ती माजी आमदार अनंतकुमा

पालकमंत्री संजय राठोड रविवारी 24 सप्टेंबर रोजी पोहरादेवीत

Image
पालकमंत्री संजय राठोड रविवारी    24 सप्टेंबर रोजी पोहरादेवीत  वाशिम, दि. 23 (जिमाका) मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे रविवारी 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. रविवारी 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता यवतमाळ येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने आर्णी दिग्रसमार्गे पोहरादेवीकडे प्रयाण.सकाळी 11 वाजता पोहरादेवी येथे आगमन व दर्शन.सकाळी 11.30 वाजता संत सेवालाल महाराज मंदिर परिसरात आयोजित पोहरादेवी - उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामांच्या प्रत्यक्ष पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित राहून सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण करतील.

मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिद्ध सात दिवसात आक्षेप मागविले

Image
मतदान केंद्राची प्रारूप यादी प्रसिद्ध  सात दिवसात आक्षेप मागविले  वाशिम दि.22 (जिमाका) भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 33 - रिसोड,34 - वाशिम आणि 35 - कारंजा विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यात आली आहे.                      मतदार संख्येत वाढ झाल्याने वाढीव मतदार संख्येच्या अनुषंगाने 1500 पेक्षा जास्त मतदार संख्या असलेल्या मतदार केंद्राच्या बाबतीत मतदार केंद्राचे विभाजन करून अथवा मतदार इतर मतदान केंद्रांना जोडून नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहे. तसेच मतदान केंद्राच्या ठिकाणांमध्ये बदल झाले आहे.मतदान केंद्राची प्रारुप यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तसेच संबंधित मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर 22 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.                   मतदान केंद्राच्या प्रारूप यादीच्या बाबतीत कोणाचेही कोणतेही आक्षेप असल्यास 7 दिवसाच्या आत सादर करावे.असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम यांनी केले आहे.

24 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे विकास कामांची पायाभरणी

Image
24 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे विकास कामांची पायाभरणी  वाशिम दि.22 (जिमाका) पोहरादेवी - उमरी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकास कामांचा प्रत्यक्ष पायाभरणी कार्यक्रम 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संत सेवालाल महाराज मंदिर परिसर पोहरादेवी येथे होणार आहे. प्रत्यक्ष पायाभरणी धर्मगुरू बाबुसिंग महाराज व कबीरदास महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक विधानसभा उपसभापती तथा कर्नाटकच्या भायागड संस्थांनचे अध्यक्ष रुद्रप्पा लभाणी, तेलंगणाच्या महिला व बालकल्याण मंत्री सत्यवती राठोड,कर्नाटक राज्यातील गुलबर्ग लोकसभा क्षेत्राचे खासदार उमेश जाधव व सत्कारमूर्ती माजी आमदार अनंतकुमार पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.तसेच यावेळी वीज मंडळाचे माजी सदस्य अनिल राठोड, महंत सुनील महाराज,महंत जितेंद्र महाराज,महंत यशवंत महाराज,महंत राजयसिंग महाराज,महंत शेखर महाराज, आमदार सर्वश्री राजेंद्र पाटणी,निलय नाईक,राजेश राठोड इंद्रनिल नाईक,डॉ.तुषार राठोड, जि.प.अध्यक

17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर" निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे " अभियान 18 वर्षावरील पुरुषांची होणार तपासणी

Image
17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर " निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे " अभियान  18 वर्षावरील पुरुषांची होणार तपासणी  वाशिम दि.22 (जिमाका) " निरोगी आरोग्य तरुणाईचे,वैभव महाराष्ट्राचे " या अभियानातुन 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 18 वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे.या आरोग्य अभियानात जास्तीत जास्त पुरुषांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी केले आहे.              या अभियानात जिल्ह्यातील 18 वर्ष व त्यावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक करावयाच्या चाचण्या व उपचार मोफत मिळवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.               जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आशा,अंगणवाडी व आरोग्य सेविका तसेच आरोग्य सेवकांनी गृहभेटीदरम्यान जनजागृती व उपलब्ध सुविधाबाबत माहिती देण्यासाठी विशेष ग्रामसभा व स्थानिक पातळीवर सभांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  वसुमना पंत यांनी केले आहे.              आरोग्यवर्धनी केंद्र,उपकेंद्र स्तरावर

4 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

Image
4 ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश        वाशिम, दि. 20 (जिमाका)  :   जिल्हा जातीय व राजकीयदृष्टया संवेदनशील आहे. सामाजिक माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी वेगवेगळया कारणावरुन जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. सद्यस्थितीत जालना घटनेच्या निषेधार्थ जिल्हयात विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच जिल्हयात 19 सप्टेंबर रोजी श्री. गणेश स्थापना झाली असून स्थापन केलेल्या श्री. गणेश मुर्तीचे 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच 28 सप्टेंबर रोजी चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे पुढे मुस्लीम धर्मियांचे ईद-ए मिलाद मुहम्मद पैगंबर जयंती उत्सवानिमित्त शहरी व ग्रामीण भागात मिरवणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सण-उत्सव काळात एखाद्या व्यक्तीकडून समाज माध्यमात आक्षेपार्ह संदेश/ व्हिडीओ प्रसारीत झाल्यास जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये व जिल्हयात शांतता अबाधित राहावी, यासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदे

4 ऑक्टोबरपर्यंत 37 (1)(3) प्रतिबंधात्मक आदेश

Image
4 ऑक्टोबरपर्यंत 37 (1)(3) प्रतिबंधात्मक आदेश          वाशिम, दि. 20 (जिमाका)  :   19 सप्टेंबर रोजी श्री. गणेश स्थापना होऊन गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. स्थापन केलेल्या श्री. गणेश मुर्तीचे 28 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत सार्वजनिक मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. 28 सप्टेंबर रोजी चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे पुढे मुस्लीम धर्मियांच्या वतीने ईद-ए-मिलाद मुहम्मद पैगंबर जयंती उत्सवानिमित्त शहरी व ग्रामिण भागात मिरवणूकाचे आयोजन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जालना येथील घटनेच्या निषेधार्थ जिल्हयात विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हयात विविध पक्ष/संघटना/सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या मागण्यांकरीता धरणे आंदोलने/ उपोषणे करण्यात येत आहेत.          जिल्हा हा सण-उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. वरील काळात जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे, याकरीता 4 ऑक्टोबरपर्यंत संपुर्ण जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.         हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर

अजा व अज शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम

Image
अजा व अज शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम        वाशिम, दि. 20 (जिमाका)  :    एकात्मिक फलोत्‍पादन विकास अभियान व राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थीचे अर्ज घेण्‍याक री ता विशेष मोहिम राबविण्‍यात येत आहे. कृषी सहाय्यकामार्फत प्रत्‍येक गावातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा विशेष मेळावा आयोजित करून योजनेची माहिती देण्‍यात येत आहे. मोहिम स्‍वरूपात शिबीर घेऊन शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्‍याकरीता सर्व शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ घेण्‍यासाठी महाडीबीटी पोर्टलवर   mahadbtmahait.gov.in   या संकेतस्‍थळावर राष्‍ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत संरक्षित शेती ,  कांदाचाळ उभारणी ,  शेततळे अस्‍तरीकरण ,  पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटीका व एकात्मिक फलोत्‍पादन विकास अभियान योजनेअंतर्गत मसाला पिके ,  जुन्‍या फळबागांचे पुनरूज्‍जीवन ,  सामुहिक शेततळे ,  शेततळे अस्‍तरीकरण ,  शेडनेट हाऊस ,  पॉलीहाऊस ,  प्‍लॉस्‍टीक मल्‍चींग ,  मधुक्षिका पालन ,  यांत्रिकीकरण, (ट्रॅक्‍टर ,  पॉवर टिलर व इतर अवजारे/उपकरणे) , 

काटेपुर्णा नदीवरील पुल अवजड वाहतूकीस बंद पर्यायी मार्गाचा वापर करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Image
काटेपुर्णा नदीवरील पुल अवजड वाहतूकीस बंद पर्यायी मार्गाचा वापर करा जिल्हाधिकाऱ्याचे आवाहन        वाशिम, दि. 20 (जिमाका)  :   नागपूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 सी या महामार्गावरील काटेपुर्णा नदीवर असलेल्या पुलाला खड्डे पडले आहे. त्यामुळे हा पुल क्षतीग्रस्त अवस्थेत आहे. राष्ट्रीय महामार्ग कार्यालय, औरंगाबाद यांच्याकडून सन 2021 मध्ये पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. त्यांच्या अहवालानुसार या पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने पुलाच्या दुरुस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत हा पुल सर्व प्रकारच्या अवजड वाहतूकीसाठी बंद ठेवण्याचे सूचविले आहे. काटेपुर्णा नदीवरील पुलावरुन होणारी सर्व अवजड वाहतूक ट्रक, बसेस, ट्रॅक्टर, 6 चाकी मालवाहतूक गाडया हया पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे.            हा महामार्ग बंद राहणार असल्यामुळे पर्यायी मार्गावर वाहतुक वळविण्यात येत आहे. हा पुल पुन:श्च वाहतुकीकरीता सुरु करण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करेपर्यंत 1951 चे कलम 33(1)(ख) नुसार सर्व अवजड वाहतुक बंद राहणार आहे. अवजड वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग- मालेगांव जहाँगीर ते शेलुबाजार- समृध्द