इ. 9 वी आणि इ. 11 वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 30 सप्टेंबर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत




इ. 9 वी आणि इ. 11 वी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

30 सप्टेंबर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत

       वाशिम, दि. 26 (जिमाका)  केन्द्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड, दिल्लीच्या वतीने घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वी सन 2024 - 25 चे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सुरुवात झाली आले आहे. जे विद्यार्थी जिल्हयातील रहिवासी आहेत आणि मान्यता प्राप्त सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता 8 वी व इयत्ता 10 वीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या प्रवेश परिक्षेकरीता अर्ज करु शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2009 ते 31 जुलै 2011 दरम्यान झाला असावा. ते विद्यार्थी इयत्ता 9 वीच्या परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत. ज्या विद्यार्थ्याचा जन्म दिनांक 1 जुन 2007 ते 31 जुलै 2009 दरम्यान झाला आहे. असे विद्यार्थी इयत्ता 11 वीच्या प्रवेश परीक्षेकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक माहितीसाठी तसेच परिक्षेचे स्वरुप व इतर विस्तृत माहिती नवोदय विद्यालय समितीच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज दिलेल्या संकेत स्थळावरुन विनामुल्य भरण्यास सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर 2023 आहे.इयत्ता 9 वी व इयत्ता 11 वीची निवड चाचणी परिक्षा 10 फेब्रुवारी 2024 ला घेण्यात येणार असल्याचे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे