पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व विर्यमात्रा पुरवठा २२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीचे दरपत्रके मागविले




पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व विर्यमात्रा पुरवठा

२२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीचे दरपत्रके मागविले

        वाशिम, दि. 13 (जिमाका) जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन यांच्या वतीने सर्व मिनीट्रक वाहतुकधारकांकडून सन २०२३-२४ या वर्षात जिल्हयातील पशुवैद्यकीय संस्थांना द्रवनत्र व विर्यमात्रा पुरवठ्याची करण्यासाठी वाहतुकीची दरपत्रके मागविण्यात येत आहे. दरपत्रके सादर करण्यासाठी दरपत्रकाचा नमुना, अटी व शर्ती प्राप्त करुन घेण्यासाठी जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र,वाशीम यांच्या कार्यालयात १ हजार रुपयांचा भरणा करून १८ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अटी व शर्तीचा नमुना उपलब्ध होऊ शकेल.

           दिलेल्या विहीत नमुन्यात दरपत्रकाची माहिती भरून २२ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, वाशीम कार्यालयात स्विकारण्यात येतील व २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दरपत्रक नियुक्त केलेल्या समितीसमोर उघडण्यात येतील. वाहतुक दर प्रती कि.मी.असावा.दर मंजुर अथवा नामंजुर करण्याचे सर्व अधिकार नियुक्त केलेल्या समितीने राखून ठेवले आहे. नियुक्त केलेल्या समितीचे निर्णय अंतिम राहणार आहे. असे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. श्याम गोरे यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे