4 ऑक्टोबरपर्यंत 37 (1)(3) प्रतिबंधात्मक आदेश





4 ऑक्टोबरपर्यंत 37 (1)(3) प्रतिबंधात्मक आदेश 

       वाशिम, दि. 20 (जिमाका)  19 सप्टेंबर रोजी श्री. गणेश स्थापना होऊन गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे. स्थापन केलेल्या श्री. गणेश मुर्तीचे 28 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत सार्वजनिक मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. 28 सप्टेंबर रोजी चंद्र दर्शनानुसार एक दिवस मागे पुढे मुस्लीम धर्मियांच्या वतीने ईद-ए-मिलाद मुहम्मद पैगंबर जयंती उत्सवानिमित्त शहरी व ग्रामिण भागात मिरवणूकाचे आयोजन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जालना येथील घटनेच्या निषेधार्थ जिल्हयात विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हयात विविध पक्ष/संघटना/सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या मागण्यांकरीता धरणे आंदोलने/ उपोषणे करण्यात येत आहेत.

         जिल्हा हा सण-उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. वरील काळात जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे, याकरीता 4 ऑक्टोबरपर्यंत संपुर्ण जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.

        हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नसल्याचे जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आदेशात नमूद केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश