पीएम किसान योजना : प्रलंबीत ई-केवायसी व आधार सिडींग6 सप्टेंबरपर्यंत पुर्ण कराकृषी विभागाचे आवाहन



पीएम किसान योजना : प्रलंबीत ई-केवायसी व आधार सिडींग


6 सप्टेंबरपर्यंत पुर्ण करा


कृषी विभागाचे आवाहन

       वाशिम, दि. 04 (जिमाका)  प्रधानमंत्री किसान योजनेची सन २०१९-२० पासुन अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बॅंक खाते आधार संलग्न करणे व भुमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्यात आहे. तरी शासनाच्या सूचनेनुसार जे लाभार्थी ई- केवायसी पुर्ण करणार नाही किंवा बॅंक खाती आधार संलग्न‍ करणार नाहीत, त्यांची नावे या योजनेतुन वगळण्यात येणार आहे.

           ई- केवायसी करण्याकरीता माहे मे, जुलै व ऑगष्ट‍ महिन्यात कृषी विभागाच्या वतीने मोहीम राबविण्यात आली आहे. परंतु अद्यापही जिल्हयातील 14 हजार 829 लाभार्थ्यांची ई - केवायसी प्रलंबित दिसुन येत आहे. तसेच 11 हजार 117 लाभार्थ्यांची आधार सिडींग प्रलंबीत आहे. संपर्क करुनही ई- केवायसी व आधार सिडींग करण्या‍करीता प्रतिसाद देत नसलेल्या व लाभार्थ्याचे नाव वगळण्यासाठी शासनस्तरावरुन सुचना प्राप्त झाली आहे. या अनुषंगाने प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी व बॅंक खाते आधार संलग्नीकरण प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ई-केवायसी व बॅंक खाते आधार संलग्नीसकरण करण्यात यावे. न केल्यास ७ सप्टेंबर २०२३ पासून नावे रद्द करण्यायची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा‍ अधिक्षक कृषि अधिकारी आरीफ शाह यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे