नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांनी केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी खासदार भावना गवळी जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती सभा


नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांनी केंद्राच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी
                खासदार भावना गवळी                                
जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती  सभा
       
वाशिम,दि.25 (जिमाका) जिल्हयाचा विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना राज्यस्तरीय यंत्रणांच्या माध्यमातून राबविण्यात येतात. जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच विविध योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी यंत्रणांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावजी करावी.असे निर्देश जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) च्या अध्यक्षा खासदार भावना गवळी यांनी  दिले.
               आज 25 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या आढावा बैठकीत श्रीमती गवळी अध्यक्षस्थानावावरून  बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार अमित झनक,समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे,कृषी समिती सभापती वैभव सरनाईक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.अपुर्वा बारसु व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
           श्रीमती गवळी पुढे म्हणाल्या, केंद्र सरकारच्या विविध योजना आहे. या योजनांचा लाभ जिल्हयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना व्हावा. यासाठी विविध यंत्रणांनी परिश्रम घ्यावे.जेणेकरुन जिल्हयातील एकही पात्र लाभार्थी केंद्र सरकारच्या  योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.असे त्यांनी यावेळी सांगितले.
                सभेत केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन - शहरी, स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, डिजीटल भारत भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम,दिनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना,राष्ट्रीय आरोग्य अभियान,सर्व शिक्षा अभियान,बाल विकास प्रकल्प (नागरी),एकात्मिक बाल विकास योजना, प्रधानमंत्री उज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना (सर्वांसाठी घरे - शहरी), प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना व
गौण खनिज विकास निधी योजनेचा आढावा यावेळी संबंधित यंत्रणांकडून श्रीमती गवळी यांनी घेतला. 
                      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कैलास देवरे,जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अनिल कावरखे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे,अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगांबर लोखंडे,शिक्षणाधिकारी राजेश शिंदे,समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे,जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता,सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी,सर्व गटविकास अधिकारी यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व विविध यंत्रणेचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.  
                *******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे