अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ



*अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ*

                  तरुण मनुष्यबळास कौशल्यविषयक विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे तसेच या उत्पादनक्षम वयोगटातील लाभार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार करण्यासाठी सक्षम करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तशी क्षमता असलेल्या तरुण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी या महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना ह्या दोन योजना राबविण्यात येत आहे. 

  *वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना -* 
ही नॉन क्रिमीलेअरकरीता सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादित असावे.बँकेने १५ लाख रुपयेपर्यंतचे कर्जाचे हप्ते लाभार्थ्याने वेळेत भरल्यास हप्ता भरल्यानंतर त्यातील व्याजाची रक्कम १२ टक्क्यांच्या मर्यादित लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळ जमा करते. ही योजना संगणकीकृत आहे. प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अथवा संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येते.तसेच या योजनेसाठी एकूण प्रस्तावित निधीच्या किमान ४ टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत पुरुष लाभार्थ्यांकरिता कमाल ६० वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील रक्त नातेसंबंधातील व्यक्ती कर्जाकरिता सहकर्जदार राहिले असतील तर अशा प्रकरणात देखील महामंडळ मंजुरी देते.

*गट कर्ज व्याज परतावा योजना* 
ही योजना नॉन क्रिमीलेअर असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या लाभार्थ्याच्या गटासंदर्भात, बँक कर्ज मर्यादा प्रति गटास कमीत कमी १० लक्ष रुपये ते जास्तीत जास्त ५० लक्ष रुपयापर्यंत देण्यात आलेल्या उद्योग उभारणी कर्जावर ५ वर्षापर्यंत किंवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त १२ टक्के व्याज दराने आणि १५ लक्ष रुपयांच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. ही योजना संपूर्णपणे संगणकीकृत आहे.प्रक्रिया सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली किंवा संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येते. या योजनेकरिता एकूण प्रस्तावित निधीच्या ४ टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी ही योजना किमान पाच व्यक्तींच्या गटाला किमान दहा लक्ष रुपये ते कमाल ५० लक्ष रुपयांच्या मर्यादेत कर्जावरील व्याज परतावात करण्यात येत होता. आता या योजनेत शितलता आणण्यात आली आहे. दोन व्यक्तींकरिता कमाल २५ लक्ष रुपयांच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी कमाल ३५ लक्ष रुपयांच्या मर्यादेवर,चार व्यक्तींसाठी कमाल ४५ लक्ष रुपयाच्या मर्यादेवर आणि पाच व त्यापेक्षा अधिक व्यक्ती असल्यास ५० लक्ष रुपयांच्या मर्यादेवरील कर्जावर व्याज परतावा महामंडळ करते.या योजनेअंतर्गत शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या व महिला बचत गटाकरिता असलेली कमाल वयोमर्यादेची अट वगळण्यात आली आहे.



                  जिल्हा माहिती कार्यालय
                              वाशिम

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे