Posts

Showing posts from May, 2019

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

Image
·          ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम पूर्वतयारीचा आढावा वाशिम , दि. २४ : राज्य शासनामार्फत यावर्षी राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वाशिम जिल्ह्यात सुमारे ४३ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवडीचे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांनी योग्य व परिपूर्ण नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेबाबतच्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, उपवनसंरक्षक सुमंत सोळंकी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी महसूल रमेश काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक अतुल कानडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, सामाजिक वनीकरण विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक उत्तम फड यांची प्रमुख उपस्थिती होती. विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणाले, वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत प्रत्येक

बियाणे, खते विषयक तक्रारींच्या निवारणासाठी तालुकास्तरावर कक्ष स्थापन करा – पालकमंत्री संजय राठोड

Image
·         जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा सभा ·         पीक कर्ज वाटपाची गती वाढविण्याच्या सूचना वाशिम , दि. २२ : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते उपलब्ध करून देण्यात यावे. त्यादृष्टीने परिपूर्ण नियोजन करावे. तसेच बियाणे व खतांविषयी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती विश्वनाथ सानप, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावक

पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजनांमध्ये दिरंगाई नको - पालकमंत्री संजय राठोड

Image
  ·         जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणाचा आढावा वाशिम , दि. २२ : जिल्ह्यातील पाणी टंचाई निर्माण झालेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांच्या मंजुरी व अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची दिरंगाई होवू देवू नका, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, कृषि सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती विश्वनाथ सानप यांच्यासह कृषि, सहकार, लघुपाटबंधारे, जलसंधारण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले , जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, तेथे तातडीने उपाययोजना मंजूर करून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवरून स

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक वाशिम , दि. २० : आगामी मान्सून काळात जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून सदर आपत्तीचे निवारण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण , उपजिल्हाधिकारी रमेश काळे , जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारिया, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, अनुप खांडे यांच्यासह सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व   शोध आणि बचाव कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले की , जिल्ह्यातील मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवाव

पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढा - पालक सचिव नंदकुमार

Image
·         पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा आढावा वाशिम , दि. १८ : गावामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाई निवारणासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ठराव घेवून सुचविलेल्या उपाययोजनेच्या प्रस्तावावर तत्काळ निर्णय नागरिकांना पाणी पुरवठा सुरु केला जावा. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनेचा प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता संबधितांनी घ्यावी, असे निर्देश पालक सचिव नंदकुमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. एस. बोरकर यांच्यासह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी अधिकारी उपस्थित होते. श्री. नंदकुमार म्हणाले, कोणत्याही गावात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर त्याठिकाणी तातडीने उपाययोजना करून पिण्याच्या

वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याची कार्यवाही गतिमान करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम आढावा सभा वाशिम , दि. १७ : जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांना ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वृक्ष लागवडीचे उदिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक खड्डे खोदण्याची कार्यवाही गतिमान करून सर्व विभागांनी २५ मे पर्यंत खड्डे खोदण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज वाकाटक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. यावेळी उपवनसंरक्षक सुमंत सोळंके , निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, प्रशांत बोरसे, श्री. चौधरी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, जिल्हा कौशल्य विकास व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज,   प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. नांदुरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री. मोडक म्हणाले की , सर्व विभागांना वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने केलेले नियोजन व ज्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आह

ग्रामस्थांच्या मागणीनुसार टँकर्स आणि रोहयो कामांचे नियोजन करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
वाशिम जिल्ह्यातील सरपंचांचा ‘ ऑडिओ ब्रीज ’ द्वारे मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद वाशिम , दि. १४ : ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करुन प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा , अशा सूचना ‍मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या. वाशिम जिल्ह्यातील सरपंच , गटविकास अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ऑडिओ ब्रीजद्वारे थेट संवाद साधत दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील सरपंचांनी गावातील टँकर , पाण्याच्या टाक्या , विंधन विहिरी , प्रलंबित पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती , रोहयोची कामे अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , तहसिलदार , गटविकास अधिकारी यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. रिसोड तालुक्यातील सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत पाण्याची व्यवस्था करावी.

जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         रिसोड तालुक्यातील विविध कामांची पाहणी ·         स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहान वाशिम , दि. ०८ : राज्य शासन व भारतीय जैन संघटना (बीजेएस) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात जलसंधारणाची कामे सुरु आहेत. जून महिन्यामध्ये पावसाळा सुरु होत असल्याने जलसंधारणाच्या कामांसाठी आता जेमतेम दीड महिन्याचा कालावधी उपलब्ध आहे. या कालावधीत जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी या कामांमध्ये लोकसहभाग मिळणे महत्वाचे आहे. तसेच या कामांकरिता स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. रिसोड तालुक्यात सुरु असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित गावांतील उपस्थित नागरिक व शेतकऱ्यांशी संवाद साधून जलसंधारणाच्या कामांविषयी त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार राजू सुरडकर, जलसंधारण विभागाचे उमेश देशमुख, जिल्हा परिषद लघुसिंचनचे श्री. खंदारकर, भारतीय जैन संघटनेचे तालुका समन्वयक राहुल मेने यांच्यासह संबंधित गावा

जिल्ह्याशी बांधिलकी जोपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
·         ३३ कोटी वृक्ष लागवड पूर्वतयारी सभा वाशिम , दि. ०३ : जागतिक तापमान वाढीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. जिल्ह्याचा फारच कमी भूभाग हा वनव्याप्त आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जमीन वृक्षाने आच्छादित करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने जिल्हाशी आपली बांधिलकी जोपासून ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले. आज ३ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत आयोजित सभेत जिल्हाधिकारी श्री. मोडक बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. मोडक यावेळी म्हणाले की, सर्व विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असल्यामुळे आतापर्यंत किती खड्डे तयार करण्यात आले आहे, याबाबतची अद्ययावत माहिती ऑनलाईन स्वरूपत सादर करावी. ज्या विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, त्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमीन उपलब्ध नसेल तर वन विभागाने पुढाकार घेवून जमीन उपलब्ध करून द्यावी. ई-क्लास जमिनीवर देखील वृक्ष लागवड करावी. ज्या

वाशिम येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन वाशिम , दि. ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज येथील पोलिस कवायत मैदान येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, सुदाम इस्कापे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, मान्यवर व नागरिक उपस्थित होते. ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री श्री. राठोड यांनी परेड निरीक्षण केले. तसेच उपस्थित स्वातंत्र्यसैनिक , ज्येष्ठ नागरिक , पत्रकार तसेच सर्व नागरिकांना महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त शु