वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याची कार्यवाही गतिमान करा - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक
·
३३
कोटी वृक्ष लागवड मोहीम आढावा सभा
वाशिम, दि. १७ : जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांना ३३ कोटी वृक्ष लागवड
मोहिमेंतर्गत वृक्ष लागवडीचे उदिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक खड्डे
खोदण्याची कार्यवाही गतिमान करून सर्व विभागांनी २५ मे पर्यंत खड्डे खोदण्याचे काम
पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज वाकाटक सभागृहात झालेल्या
आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी
उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी
अभियंता सुनील कळमकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, लघुपाटबंधारे
विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, प्रशांत बोरसे, श्री. चौधरी, ग्रामीण
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, जिल्हा कौशल्य विकास व
मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज, प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक एस. आर. नांदुरकर
यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.
मोडक म्हणाले की, सर्व विभागांना वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने केलेले नियोजन व ज्या ठिकाणी
वृक्ष लागवड करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती २० मे पर्यंत ऑनलाईन अपलोड करणे
आवश्यक आहे. सर्व विभागांनी या कामाला गती देवून पुढील दोन दिवसांत वृक्ष लागवड
करण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष ठिकाणांची माहिती अपलोड करावी. तसेच त्याठिकाणी खड्डे
खोदण्याची कार्यवाही २५ मे पर्यंत पूर्ण करून त्याबाबतची माहिती सुध्दा तत्काळ अपलोड
करावी, असे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment