Posts

Showing posts from December, 2016

माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा मेळावा ·         ध्वजदिन निधी संकलनबद्दल सीईओ पाटील यांचा सत्कार वाशिम , दि . ३० :   देशाची सेवा करून परत आलेल्या माजी सैनिकांना सर्वसामान्य नागरी जीवनात येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज नियोजित सैनिक संकुलाच्या जागेवर आयोजित जिल्हास्तरीय माजी सैनिक, विधवा यांच्या मेळाव्यात सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कर्नल आर. आर. जाधव, सैन्यामध्ये कर्नल पदापर्यंत पोहचून निवृत्त झालेले वाशिम जिल्ह्यातील निवृत्त कर्नल प्रवीण ठाकरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्वप्रथम दीपप्रज्ज्वलन व शहीद स्मारक स्मृती चिन्हाला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याला सुरुवात झाली. ध्वजदिन निधी संकलनात जिल्हा परिषदेने १२५ टक्के उद्दिष्ट्य पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांचा यावेळी शहीद स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच शहीद सैनिक विधवा व विशेष प्राविण्य मिळविलेल्या माजी सैनिक पाल्यांचाही या

‘डिजिटल पेमेंट’च्या पर्यायाचा अवलंब करण्याची गरज

Image
·         रोखरहित व्यवहाराचे अनेक मार्ग उपलब्ध ·        ‘मोबाईल बँकिंग’साठी स्मार्टफोनची गरज नाही ·        विविध कार्ड्स, स्मार्टफोनच्या सहाय्याने व्यवहार शक्य देशातील काळा पैसा व भ्रष्टाचाराचे निर्मुलन करण्यासाठी सर्वांनी ऑनलाईन किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना नुकतेच केले आहे. काळा पैसा व भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी ‘डिजिटल पेमेंट’ ही संकल्पना फायदेशीर ठरणारी आहे. तसेच ‘डिजिटल पेमेंट’चे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने व ही संकल्पना अतिशय सोपी असल्याने सर्वसामन्य नागरिकांनाही याचा वापर करणे सहज शक्य होणार आहे. बँकांमार्फत देण्यात येणारे विविध कार्ड, मोबाईल बँकिंग, एईपीएस, मिक्रो एटीएम, युपीआय, वॉलेटस, पीओएस प्रणालीद्वारे रोखरहित व्यवहार करून ‘डिजिटल पेमेंट’चा पर्याय सर्वांना वापरता येणे शक्य आहे. या सर्व पर्यायांचा वापर कसा करता येईल, याची माहिती पुढील प्रमाणे आहे. बँक कार्ड्स- बँकेमार्फत ग्राहकांना प्रीपेड कार्ड, डेबिट कार्ड व क्रेडीट कार्ड अशी तीन प्रकारची कार्ड दिली जातात. या बँक कार्ड्सच्या माध्यमातून व