Posts

Showing posts from 2017

महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेविषयी सांगत आहेत अशोक मनवर...

वाशिम जिल्ह्यातील जांभरुण जहाँ. येथील अशोक ग्यानुजी मनवर यांची #कर्जमाफी विषयी प्रतिक्रिया...

उद्धव विश्वनाथ काळबांडे यांची कर्जमाफीविषयी प्रतिक्रिया

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कोकलगाव येथील शेतकरी उद्धव विश्वनाथ काळबांडे यांना 60 हजार 500 रुपयांची #कर्जमाफी मिळाली आहे. या योजनेविषयी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया...

वाशिम जिल्ह्यात ९५ हजार ८६३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

वाशिम, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील ९५ हजार ८६३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये ७१ हजार ९५४ शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तर ७ हजार ३६४ शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ मिळणार आहे. १६ हजार ५४५ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण ४१ लाख शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी १९  हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेत ७७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन ६९ खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास ४१ लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे १९ हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. जे शेतकरी पात्र होते ते अर्ज करु शकले नाहीत अशा शेतक-यांनाही  या योजनेत सामावून घेतले जाणार आहे. शेवटच्या पात्र शेतक-याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात १६ तक्रारी निकाली

Image
वाशिम , दि . ०४ : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये २६ तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली. यापैकी १६ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तसेच उर्वरित सर्व प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित विभागांना केल्या. यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, कारंजाचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आपले सरकार पोर्टलवर प्रलंबित असलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच नागरिकांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी लोकशाही दिन व आपले सरकार पोर्टलवर दाखल झालेल्या आपल्या विभागाशी संबंधित तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

तूर पिकावरील मर सदृश्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी फवारणी, आळवणीचा सल्ला

वाशिम , दि . ०२ : जिल्ह्याच्या काही भागात मागील पंधरवड्यात तुरळक प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. तसेच काही भागात दाट धुके पडल्याने तूर पिकावर आकस्मिक मर सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वाशिम कृषि संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गीते, अकोला येथील कीटक शास्त्रज्ञ डॉ. विनोद सोनाळकर, भाजीपाला तसेच फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. घावडे, जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयातील डॉ. इरफान हुसेन, करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ तुषार देशमुख आदींनी मंगरूळपीर तालुक्यातील हिसई, रहित व चिंचाळ परिसरात दिलेल्या क्षेत्र भेटीत तूर पिकावरील मर सदृश्य रोगामुळे काही प्रमाणत झाडे सुकल्याचे निदर्शनास आले आहे. हवामानाचा परिणाम व जमिनीतील बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे मत शास्त्रज्ञांनी यावेळी व्यक्त केले. मर सदृश्य रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकऱ्यांनी १९:१९:१९ या खताची एक फवारणी करावी. याचे प्रमाण साधारणतः १० लिटर पाण्याला १०० ते २०० ग्रॅम असे ठेवावे. तसेच शक्य झाल्यास कॉपर ऑक्झीक्लोराईडची आळवणी

मौखिक आरोग्य तपासणी मोहीम, मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ

Image
·          मौखिक तपासणी, नेत्र चिकित्सा कक्षाचे उद्घाटन वाशिम ,  दि .  ०२  :   तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या कर्करोगाने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होत आहे. तंबाखू सेवन आणि त्यामुळे होणाऱ्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ३० वर्षांवरील व्यक्तींची मौखिक तपासणी व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष महिमेचा तसेच मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र अभियानाचा शुभारंभ आज खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमात झाला. यावेळी वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती सुधीर गोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, वाशिमचे उपनगराध्यक्ष रुपेश वाघमारे, वाशिम नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा समितीचे सभापती राहुल तुपसांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

कारंजा येथील रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची निवड

Image
वाशिम , दि . ०१ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व कारंजा येथील एस. एस. एस. के. आर. इन्नाणी महाविद्यालय, विद्याभारती एच. एस. सी. व्होकेशनल  कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथे आयोजित रोजगार मेळाव्यात २४८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक अ. सं. ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घेण्याची गरज आहे. स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळण्याची अपेक्षा न ठेवता अनुभवातून कौशल्य विकसित करण्यास युवकांनी प्राधान्य द्यावे, असे श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. राजपूत म्हणाले, बेरोजगारांची संख्या वाढत आहे. रोजगार मिळविण्यासाठी युवकांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. विविध क्षेत्रात प्रचंड मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी वाशिम दौरा

वाशिम , दि . ३० :   राज्याच्या महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार दि. २ डिसेंबर २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. ना. पाटील हे दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता अकोला येथून वाशिमकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.३० वाजता त्यांचे वाशिम येथे आगमन होईल. याठिकाणी आयोजित नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक होईल. त्यानंतर ना. पाटील हे वाशिम शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील. दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता ते वाहनाने यवतमाळकडे रवाना होणार आहेत.

वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीच्या प्राथमिक बैठकीत विविध विषयांवर चर्चा

वाशिम , दि . ३० :   वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. या अनुषंगाने आज प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली व दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत जिल्हा जिल्हा गॅझेटियरच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा गॅझेटियरच्या संपादकीय मंडळाचे सदस्य प्रा. हरिभाऊ क्षीरसागर, ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे, ‘काव्याग्रह’चे विठ्ठल जोशी, प्रा. गजानन वाघ, मोहन शिरसाट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वाशिम जिल्हा गॅझेटियरमध्ये जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक, कृषि, उद्योग, बँकिंग, व्यापार, व्यवसाय, दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती यासह प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. या प्रत्येक विषयांवर स्वतंत्र प्रकरण जिल्हा गॅझेटियरमध्ये समाविष्ट असणार आहे. हे

दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

Image
·         वाचन चळवळ वाढीसाठी झाले विचारमंथन ·         काव्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद वाशिम , दि . ३० :   राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील एस. एम. सी. शिक्षण संकुलच्या स्व. सत्यनारायणजी जोशी सभागृह येथे आयोजित दोन दिवशीय ‘ग्रंथोत्सव २०१७’ चा आज जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरिभाऊ क्षीरसागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे, प्रमुख कार्यवाह प्रभाकर घुगे आदी उपस्थित होते. या ग्रंथोत्सवामध्ये आयोजित परिसंवाद, मुलाखतीमधून वाचन चळवळीच्या अनुषंगाने विचारमंथन झाले.ग्रंथोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे स्वयंसेवक व सार्वजनिक वाचनालयांचे प्रतिनिधी यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. ठाकरे म्हणाले, राज्य शासनामार्फत आयोजित केला जाणारा ग्रंथोत्सव हा अतिश

महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाची ‘महाखादी यात्रा’ वाशिम शहरात दाखल

Image
·         जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उद्घाटन ·         खादी व ग्रामोद्योगी वस्तूंच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन वाशिम , दि . ३० :   महाराष्‍ट्र राज्‍य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी यांच्‍या १५० व्‍या जयंतीनिमित्‍त   राज्‍यात महाखादी यात्रेचे आयोजन करण्‍यात आले आहे.   या यात्रेला दि. ९ ऑक्‍टोबर २०१७ रोजी   मुंबई येथील राजभवन येथून सुरुवात   झाली असून ही महाखादी यात्रा आज वाशिम शहरात दाखल झाली. या महाखादी यात्रेनिमित्त पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथील सभागृहात तीन दिवस खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचे आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रदीप पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ता. ना. खांडेकर, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी

वाशिम ग्रंथोत्सवात पुस्तक दुकानांना मोठा प्रतिसाद

Image
‘ महामानव ’ व ‘ वार्षिकी ’ ला मोठी मागणी वाशिम , दि.   29 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या वत्सगुल्म नगरीतील रसिकांनी आज जिल्हा ग्रंथोत्सवातील पुस्तकांच्या स्टॉलला मोठ्या संख्येने भेट देत विविध पुस्तके खरेदी केली. नामांकित प्रकाशनांच्या ललित पुस्तकांसह ‘ महामानव ’ व ‘ वार्षिकी 2017’ या दोन पुस्तकांनाही ग्रंथोत्सवात मोठी मागणी होती. पॉप्युलर प्रकाशनासह अनेक नामवंत प्रकाशनांचे स्टॉल ग्रंथोत्सवात लावण्यात आले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे , सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांच्यासह अनेकांनी या स्टॉलला भेट दिली. जिल्हा माहिती कार्यालयातर्फेही ‘लोकराज्य’ व इतर प्रकाशनांचे स्वतंत्र दालन उघडण्यात आले. यातील ‘ महामानव ’ या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाला मोठी मागणी होती. पहिल्या दोन तासातच या पुस्तकाच्या 40 प्रती विकल्या गेल्या , अशी माहिती कार्यालयाचे दिलीप काळे यांनी दिली.                 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘ वार्षिकी 2017’   या पुस्तकाच्या अवघ्या दो

वाशिम येथे ‘ग्रंथोत्सव २०१७’चे थाटात उद्घाटन

Image
• ग्रंथ दिंडीद्वारे वाचनाविषयी जनजागृती • ग्रंथ प्रदर्शन स्टॉलला वाचकांचा प्रतिसाद राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत येथील एस. एम. सी. शिक्षण संकुलच्या स्व. सत्यनारायणजी जोशी सभागृह येथे आयोजित ‘ग्रंथोत्सव २०१७’ चे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते आज थाटात उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. हरिभाऊ क्षीरसागर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सहाय्यक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील, अमरावती येथील लेखिका रजिया सुलताना, कादंबरीकार बाबाराव मुसळे, राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव तथा कार्यकारी संपादक डॉ. दि. प्र. बलसेकर, सावित्रीबाई फुले महिला विद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्र. म. राठोड आदी उपस्थित होते. यावेळी बोल

वाशिम येथे बुधवारपासून ‘ग्रंथोत्सव’चे आयोजन

Image
·         दोन दिवस परिसंवाद, काव्यवाचनसह विविध कार्यक्रम ·         एस. एम. सी. शिक्षण संकुल येथे आयोजन ·         ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी विविध स्टॉल वाशिम , दि . २८ : महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत दि. २९ व ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वाशिम येथील एस. एम. सी. शिक्षण संकुलच्या स्व. सत्यनारायणजी जोशी सभागृह येथे ‘ग्रंथोत्सव २०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे.  तरी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, नागरिकांनी ग्रंथोत्सवास उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवानिमित्त दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून ग्रंथदिंडी आयोजित केली जाणार आहे. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा, माजी आमदार अॅड. विजय जाधव, राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. व्य. रा. बावने, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, ग्रंथपाल प्रा. प्रज्ञा क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे आदी

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू

·         १ जानेवारी पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार ·         जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन    वाशिम , दि . २४ : राज्यात रब्बी हंगाम २०१७-१८ करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातील गहू (बागायती), हरभरा व करडई या प्रमुख पिकांना ही योजना लागू असून दि. १ जानेवारी २०१८ पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. तसेच उन्हाळी भुईमुग पिकासाठी सुध्दा ही विमा योजना लागू राहणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. गहू (बागायती) व हरभरा या पिकासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे. तर करडई पिकासाठी वाशिम, मालेगाव व रिसोड या तीन तालुक्यांचा समावेश आहे. उन्हाळी भुईमुग पिकासाठी कारंजा तालुका वगळून उर्वरित सर्व तालुक्यांचा समावेश आहे. कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी ही योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकरी ऐच्छिकरित्या या योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत. गहू (बागायती) पिकासाठी प्रति हे

सोयाबीन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात

·         ४४ हजार ६१८ शेतकऱ्यांना मिळणार लाभ ·         १४ कोटी ७९ लक्ष रुपये अनुदानाचे होणार वितरण वाशिम , दि . २४ : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय दि. १० जानेवारी २०१७ रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील पात्र ४४ हजार ६१८ लाभार्थ्यांना हे अनुदान वितरणास सुरुवात झाली असून अनुदानास पात्र शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्याची खात्री करावी, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था रमेश कटके यांनी कळविले आहे. २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे बाजारातील आवक वाढून दरात घसरण झाली होती. त्यामुळे १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत आडत व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे २५ क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबी

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत विविध विषयांवर चर्चा

वाशिम , दि . २४ : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आढावा सभा जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी झाली. यावेळी शहरातील फुटपाथ दुरुस्ती, अवैध दवाखाने, वजन-मापे तपासणीसह अनधिकृत गतिरोधके आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील देशमुख, शहर वाहतूक शाखेच्या ज्योती विल्हेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे उपसंचालक आर. एस. कदम, सहाय्यक वैद्यामापनशास्त्र कार्यालयाचे बी. बी. गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे एम. बी. मडके, अशासकीय सदस्य रमेशचंद्र बज, गजानन साळी, सुधीर घोडचर, वीरेंद्र देशमुख, वीरेंद्रसिंह ठाकूर, अभय खेडकर आदी उपस्थित होते. वाशिम शहरातील रस्त्यांची व फुटपाथची दुरवस्था झाली आहे. नवीन रस्त्याचे काम झाल्यानंतर बाजूचे फुटपाथची उंची वाढविणे आवश्यक असल्याचा मुद्दा अशासकीय सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी नगरपरिषदेने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या. जिल्ह्यात बोगस डॉक्टर व अवैध दवाखाने आढळून येत असून याबाबत धडक मोहीम उघडण्यात यावी, अशी मागणीही अशासक

वाशिम जिल्ह्यातील ९२ प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी राखीव

·         इतर प्रयोजनासाठी पाणी उपसा करण्यास मनाई    ·         दि. १८ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू   वाशिम , दि . १९ : जिल्ह्यात दि. २० ऑक्टोंबर २०१७ पर्यंत ८४.२२ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पात दि. ८ नोव्हेंबर पर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरी २६.७२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील ९२ प्रकल्पातील सध्या उपलब्ध असलेले पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. याकरिता फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेल्या ९२ मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये वाशिम तालुक्यातील एकबुर्जी, अनसिंग, बोराळा, धुमका, खंडाळा, शिरपुटी, उमरा शम., वारला, उमरा कापसे, जनुना सोनवळ, शेलू खु., वारा जहांगीर, सुरकंडी, अडगाव बॅरेज, गणेशपूर बॅरेज, कोकलगाव बॅरेज, ढिल्ली बॅरेज, उकळी बॅरेज, जुमडा बॅरेज, राजगाव बॅरेज, टनका बॅरेज, जयपूर बॅरेज, स

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत १७३ मुलांची इको कार्डीयोग्राफी

Image
वाशिम , दि . १८ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत ह्रदयरोग इको कार्डीयोग्राफी (२ डी इको) शिबिराचे आयोजन आज जिल्हा सामान्य रुग्णालय येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्ह्यातील १७३ मुला-मुलींची २ डी इको कार्डीयोग्राफी तपासणी करण्यात आली. यापैकी ७२ मुले ह्रदयरोगग्रस्त असल्याचे आढळून आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती सुधीर गोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डॉ. जनार्धन जांभरुणकर, डॉ. अनिल कावरखे, डॉ. सुधीर जिरवणकर, नेत्र चिकित्सा अधिकारी जगदीश बाहेकर, नितेश मलिक, धनंजय गोरे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. या आरोग्य तपासणी दरम्यान ज्या मुलांमध्ये हृदयरोगाची लक्षणे आढळून आली, अशा १७३ मुलांची तपासणी करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात इको कार्डीयोग्राफी शिबीर आयोजित करण्यात आले होते. याकरिता औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिट

वाशिम तालुका विधी सेवा समितीच्यावतीने रॅलीद्वारे कायदेविषयक जनजागृती

Image
·         राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त विशेष उपक्रम ·         राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणविषयी दिली माहिती ·         लोककलावंत, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग वाशिम , दि . १८ : राष्ट्रीय विधी सेवा दिवसानिमित्त दि. ९ ते १८ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत वाशिम तालुका विधी सेवा समितीच्यावतीने कायदेविषयक जनजागृती व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणविषयी माहिती देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आज जनजागृती रॅली काढून नागरिकांपर्यंत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आली. राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा येथून निघालेल्या या रॅलीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा वाशिम तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अभय मंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी प्रथम जिल्हा न्यायाधीश के. के. गौर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश सोनाली शाह, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दादाराव आदमने, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. बाकलीवाल, अॅड. दागडिया , अॅड. एस. के. उंडाळ, जिल्हा परिषद पाण

जलयुक्त शिवार अभियानामुळे संरक्षित सिंचन क्षमतेत वाढ

Image
·         वाशिम जिल्ह्यात सुमारे ७ हजार कामे झाली पूर्ण ·         ५१ हजार ५३ टीसीएम अतिरिक्त पाणीसाठा निर्माण वाशिम , दि . ०७ : टंचाईमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने सन २०१५ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात केली. या अभियानाचे यंदाचे तिसरे वर्ष असून वाशिम जिल्ह्यात या अभियानांतर्गत आतापर्यंत ७ हजार ६७६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे संरक्षित सिंचन क्षमतेत मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. अभियानाच्या पहिल्याच वर्षी म्हणजेच २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांची अभियानामध्ये निवड करण्यात आली. यामध्ये वाशिम तालुक्यातील २६, रिसोड तालुक्यातील २७, मालेगाव तालुक्यातील २५, मंगरूळपीर तालुक्यातील २७, मानोरा तालुक्यातील ६१ व कारंजा तालुक्यातील ३४ गावांचा समावेश होता. या गावांमध्ये ५ हजार ५८ कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे ३५ हजार ३२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे सुमारे ७० हजारहेक्टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची सोय झाली आहे. सन २०१६-१७ मध्ये जिह्यातील १४९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. वाशिम तालुक्यातील २४, रिस