उद्धव विश्वनाथ काळबांडे यांची कर्जमाफीविषयी प्रतिक्रिया
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कोकलगाव येथील शेतकरी उद्धव विश्वनाथ काळबांडे यांना 60 हजार 500 रुपयांची #कर्जमाफी मिळाली आहे. या योजनेविषयी त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया...
*विशेष वृत्त*: भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर वाशिम, (जिमाका) शासनाने भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतरणासाठी महसूल व वनविभागाच्या अधिसुचनेनुसार दि.४ मार्च २०२५ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात सुचना जारी करण्यात आली आहे.त्यानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करणाऱ्यांना विशेष सवलत मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. *सवलतीचे मुख्य मुद्दे*: कृषिक प्रयोजनासाठी भोगवटादार वर्ग २ धारणाधिकार किंवा भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरणासाठी अधिमूल्य रक्कमेत ३१ डिसेंबर पर्यंत सवलत मिळणार आहे. नगरपंचायत/नगरपरिषद/ विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हद्दीबाहेरील कृषी प्रयोजनासाठी ज्या जमिनी शेती / ना विकास वापर विभागात स्थित आहेत.अश्या जमिनी रुपांतरणासाठी शेतीच्या दराप्रमाणे येणाऱ्या क...
· जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा वाशिम , दि . ०५ : मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांनी विपुल लेखन केले आहे. त्यांचे हे लेखन मराठी साहित्याला समृद्ध करण्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान देणारे असल्याचे प्रतिपादन प्रा. लता जावळे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वाशिम जिल्हा विधीज्ञ मंडळ यांच्यावतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’निमित्ताने ५ जानेवारी रोजी आयोजित ‘ मराठी साहित्यामध्ये महिला साहित्यिकांचे योगदान ’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वरिष्ठ स्तर सह दिवाणी न्यायाधीश पी. एच. नेरकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. शाम शेवलकर, ॲड. गणेशप्रसाद अवस्थी यांची उपस्थिती होती. प्रा. जावळे म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिल्यानंतर अनेक महिलांनी साहित्य निर्मितीत योगदान देण्यास सुरुवात केली. अगोदर केवळ बोली स्वरुपात असलेली लोकगीते, गाणी शब्द रुपात आली. साहित्याच्या माध्यमातून महिलांवर होणारा अन्याय, त्यांच...
· आता जिल्हास्तरावर मिळणार जात पडताळणी प्रमाणपत्र वाशिम , दि . २१ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून वाशिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरु झाले. समिती कार्यालयाचे उदघाटन समितीचे अध्यक्ष आय. एम. तिटकारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपायुक्त तथा समितीचे सदस्य बी. डी. खंडाते, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा समितीच्या सदस्य सचिव माया केदार, विशेष निरीक्षक श्री. मुसळे आदी उपस्थित होते. श्री. तिटकारे यांच्या हस्ते फीत कापून जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्राचे उदघाटन झाले. याप्रसंगी श्री. तिटकारे म्हणाले, लोकांच्या सोयीसाठी जिल्हास्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आजपासून वाशिम जिल्ह्यात ही समिती कार्यान्वयित झाली असून समितीचे दैनदिन कामकाज आता वाशिममध्य...
Comments
Post a Comment