पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.

वाशिम दि.२०(जिमाका) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प वाशिम आणि प्रकल्प संचालक,आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने
समूह सहाय्यकाचे सीएचएमएस प्रशिक्षण आज आत्मा कार्यालय, वाशिम येथे संपन्न झाले.
         प्रारंभी डॉ. पंजाबराव देशमुख व नानाजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.अध्यक्षस्थानी आनिसा महाबळे आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे होत्या.उद्घाटन वाशिमच्या कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गिते यांनी केले.यावेळी आत्मा प्रकल्प उपसंचालक संतोष वाळके, उपविभागीय कृषि अधिकारी संजय चातरमल,स्मार्ट प्रकल्पाच्या मार्गदर्शिका अनुजा कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            सुरुवातीला  प्रकल्प विशेषज्ञ प्रदीप गुट्टे यांनी प्रस्तावित केले. प्रशिक्षणाची गरज याविषयी अनिसा महाबळे यांनी मार्गदर्शन केले. सीएचएमएसचा उद्देश व कार्यपद्धती याविषयी उपविभागीय कृषि अधिकारी श्री.चातरमल यांनी माहिती दिली. खरीप हंगाम पिक व्यवस्थापन खरीप मुख्य पिक कीड व रोग ओळख व व्यवस्थापनाविषयी डॉ.गिते  यांनी, सीएचएमएस,समूह सहाय्यक, तंत्रज्ञान समन्वयक यांचे कर्तव्य जबाबदाऱ्या सर्वेक्षण व नोंदणी याविषयी श्री.गुट्टे यांनी मार्गदर्शन केले .
         कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत समूह सहाय्यक यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी केले.आभार विश्वजीत पाथरकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेश खिल्लारे,राजेश बनचरे,धीरेंद्र देवहंस,राजेश कोकाटे व अविनाश चिल्लोरे यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे