मुसळवाडीच्या आश्रमशाळेत तंबाखूमुक्तीचा जागर
मुसळवाडीच्या आश्रमशाळेत
तंबाखूमुक्तीचा जागर
वाशिम,दि.18 (जिमाका) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय,वाशिमअंतर्गत मालेगांव तालुक्यातील मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत आज 18 जुलै रोजी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक जी. टी.केदार होते.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. आदित्य पांढारकर यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे मुख कर्करोगाबाबत विद्यार्थ्याना माहिती दिली.तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे विविध आजार व तंबाखू सेवनापासून विद्यार्थ्यांनी कसे दूर राहावे व इतरांना तंबाखूच्या व्यसनापासून परावृत्त कसे करावे. याबाबत मार्गदर्शन केले.
सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी आपली शाळा तंबाखूमुक्त कशी करावी याबाबत तंबाखूमुक्त शाळेचे निकष व तंबाखू सेवन सोडविण्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक 1800112356 याबाबत विद्यार्थ्याना माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
*******
Comments
Post a Comment