कोतवाल पदभरती : पारदर्शक पध्दतीने करण्यास सहकार्य करा वाशिम तहसिलदार यांचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
कोतवाल पदभरती : पारदर्शक पध्दतीने करण्यास सहकार्य करा
वाशिम तहसिलदार यांचे आवाहन
वाशिम, दि. 19 (जिमाका) : वाशिम तालुक्यात उपविभागीय अधिकारी, वाशिम यांच्या अध्यक्षतेखाली कोतवाल पदभरती-२०२३ ची प्रक्रिया सुरु आहे. कोतवाल पदभरतीच्या परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी तहसिल कार्यालय येथे प्रसिध्द करण्यात आली आहे. कोतवाल पदभरती प्रक्रीया अत्यंत पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे. या पदभरती संदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडून कोणीही कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण करु नये. तसेच अपप्रचार करणाऱ्या व्यक्तींचे समर्थन करु नये. कोतवाल पदभरती- २०२३ ची प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने करण्याकरीता सहकार्य करावे. असे आवाहन तहसिलदार, वाशिम यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment