तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 15 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित
- Get link
- X
- Other Apps
तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार
15 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित
वाशिम, दि. 11 (जिमाका) : तेनझिंग नॉर्गे हे देशाचे साहसी पुरूष मानले जातात. १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले भारतीय आहे. केंद्र शासनामार्फत तेनझिंग नॉर्गे यांच्या नावांचा गौरव व्हावा व देशातील खेडाळू व नागरिकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन साहसी उपक्रमात सहभाग घेऊन भारताचे नाव उज्वल करावे. या उद्देशाने तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार त्यांच्या नावाने देण्यात येतो. हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी मागील तीन वर्षात जमिनीवरील केलेले साहसी उपक्रम, पाण्यामधील केलेले साहसी उपक्रम आणि हवेमध्ये केले साहसी उपक्रम या तीन प्रकारच्या साहसी उपक्रमाची नोंद घेवून यातून उत्कृष्ठ ठरणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कर देण्यात येतो. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या व्यक्तीस खेळ व युवक मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत १५ लक्ष रुपये व तेनझिंग नॉर्गे यांची प्रतिमा देऊन सम्मानित करण्यात येते.
हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी https://awards.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. अर्जासोबत मागील तीन वर्षात जमिनीवरील, पाण्यामधील व हवेतील केलेले साहसी उपक्रमाचा तपशील सोबत जोडावा. जिल्हयातील साहसी उपक्रम करणारे खेळाडू व नागरीक अर्ज सादर करू शकतात. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वाशिम येथील क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर (7517536227) यांच्याशी संपर्क साधावा. असे अवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment