संरक्षित शेतीसाठी साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनीनोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेकृषी विभागाचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps
संरक्षित शेतीसाठी साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी
नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करावे
कृषी विभागाचे आवाहन
वाशिम, दि. 14 (जिमाका) : संरक्षित शेती तंत्रज्ञानास कृषी विभागाच्या व विविध योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देऊन प्रोत्साहन देण्यात येते. संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह/ शेडनेटगृह, प्लास्टिक मल्चिंग, द्राक्ष पिकासाठी प्लायस्टिक कव्हर,डाळिंब पिकासाठी अॅन्टी हेल नेट या घटकाचा समावेश आहे. कृषी विभागाच्या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचे साहित्य पुरवठा होणे. साहित्याची गॅरंटी,वॉरंटी व दुरूस्तीची हमी मिळणे. याअनुषंगाने पॉलीफिल्मा,टेपनेट,मोनोनेट, इन्सेाक्टी नेट,ऍप्रॉन पेपर,प्लास्टिक आच्छादन,जीआय पाईप,द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर व डाळिंब पिकासाठी अँन्टी् हेलनेट कव्हर या साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांची नोंदणी प्रक्रीया महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्यावतीने राबविण्याचे प्रस्तावित आहे. नोंदणी प्रक्रीया राबविण्याकरीता अटी व शर्तीच्या अधीन राहून उत्पादक कंपन्याचे नोंदणीसाठी प्रस्ताव १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत मागविण्यात येत आहे. उत्पादक कंपन्यांच्या नोंदणी प्रक्रीयेबाबतच्या अटी, शर्ती व इतर तपशील कृषि विभागाच्या www.mahanhm.in या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थंळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. संरक्षित शेती या घटकाकरीता साहित्याचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांनी या नोंदणी प्रक्रियेकरीता अर्ज करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आरिफ शाह यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment