Posts

Showing posts from July, 2017

बँकांनी सर्व पात्र शेतकऱ्याला दहा हजार रुपयेपर्यंतच्या तातडीच्या कर्जाचे वाटप करावे - किशोर तिवारी

Image
·         जिल्हधिकारी कार्यालयात आढावा बैठक ·         कर्ज वाटपाबाबतचा फलक प्रत्येक बँकेत लावा ·         प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी रविवारीही बँक सुरु राहणार वाशिम , दि . २८ : राज्य शासनाने दि. ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १० हजार रुपयांपर्यंतचे तातडीचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सर्व बँकांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयांकडून सूचनाही प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जाचा लाभ देण्याच्या सूचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सर्व बँक अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी तथा प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, अभिषेक देशमुख, जिल्हा शल्य चिकित्स

कर्जमाफीमुळे संकटातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला - किशोर तिवारी

Image
·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न ·         अर्ज प्रक्रियेमुळे प्रामाणिक शेतकऱ्यालाच कर्जमाफी मिळेल वाशिम , दि . २८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने दि. ३० जून २०१६ अखेर थकीत असलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली आहे. त्यामुळे राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून गेल्या अडीच वर्षांमध्ये त्यांनी राबविलेल्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना अतिशय फायदा झाल्याचे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले. सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. श्री. तिवारी म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन राज्य शासनाने दि. ३० जून २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ केले आहे. याकरिता पात्र शेतकऱ्यांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्जासह आधार क्रमांक संकलित करण्याचे काम सुरु झाले आहे. ग्रामीण भागातील

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी

Image
वाशिम , दि . २८ : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. पटेल. डॉ. अनिल कावरखे उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे शेतकरी, शेतमजूर व अत्यंत गरीब कुटुंबातील असतात. त्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना श्री. तिवारी यांनी यावेळी दिल्या. त्यांनी रुग्णालयातील सर्जिकल वॉर्ड, जनरल वॉर्ड, एसएनसीव्ही युनिट, ओपीडीला भेट देवून याठिकाणी पुरविल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. तसेच येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना रूग्णालयामार्फत देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती जाणून घेतली.

जिल्ह्यातील प्रत्येक ऑनलाईन सातबारा अचूक बनवा - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
·         जिल्हाधिकारी कार्यलयात महसूल विभागाची आढावा बैठक ·          ‘एटीडीएम’द्वारे मंडळ स्तरावर मिळणार ऑनलाईन सातबारा, जुने अभिलेख ·         जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेचे विभागीय आयुक्तांनी केले कौतुक ·         शालेय स्तरावरही दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना वाशिम , दि . २७ : नागरिकांना अचूक ऑनलाईन सातबारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने चावडी वाचन मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १०० टक्के ऑनलाईन सातबाराचे चावडी वाचन झाले आहे, ही अतिशय चांगली बाब असून या मोहिमे अंतर्गत निदर्शनास आलेल्या त्रुटींची दुरुस्ती करून प्रत्येक ऑनलाईन सातबारा अधिकाधिक अचूक बनविण्याच्या सूचना अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसूल विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, महसूल उपायुक्त प्रदीप पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, भूसंपादन अधिकारी श्री. वानखेडे, एमएसआरडीसीचे उपजिल्हाधिकारी सुनील माळी, उपविभागीय अधिकारी रा

विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या हस्ते वाशिम तहसील कार्यालयातील ‘एटीडीएम’ कार्यान्वित

Image
वाशिम , दि . २७ :  नागरिकांना कमी कालावधीत ऑनलाईन सातबारा व जुन्या अभिलेखांच्या प्रती मिळाव्यात, याकरिता आज अमरावती महसूल विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या हस्ते आज वाशिम तहसील कार्यालयात एनी टाईम डॉक्युमेंट्स मशीन (एटीडीएम-क्यू ऑस) कार्यान्वित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, महसूल उपायुक्त प्रदीप पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार बळवंत अरखराव आदी उपस्थित होते.  एटीएम मशिन प्रमाणेच कार्यपध्दती असलेल्या या एटीडीएम मशिनमधून ऑनलाईन सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी पाच प्रकारच्या अभिलेखांच्या प्रती मिळविता येणार आहेत. या मशीनद्वारे जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील नागरिकांचे सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी अभिलेख उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हक्क नोंदणी रजिस्टर, पेरेपत्रक व सातबाराची प्रत मिळविण्याकरिता गट नंबर किंवा सर्व्हे नंबर माहित अ

ग्राम विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह

Image
·         जिल्हा परिषद येथे विविध योजनांची आढावा बैठक वाशिम , दि . २७ : जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सर्व ग्राम विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अमरावती महसूल विभागाचे आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या. जिल्हा परिषद येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कापडणीस, उपायुक्त श्री. झेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, प्र. जिल्हा समाज कल्याण अधिकारी माया केदार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विभागीय आयुक्त म्हणाले की, ग्रामीण जिवनन्नोती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना घरांचा लाभ लवकरात लवकर प्रयत्न करावा. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेविषयी ग्रामीण भागात जनजागृती करण्यात यावी. ग्रामीण भागात स्थापन झालेल्या जास्तीत जास्त महिल

कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी निःशुल्क सुविधा उपलब्ध - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ·         दि. ३१ ऑक्टोंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार ·         खरीप हंगामासाठी १० हजार रुपये मदत उपलब्ध करून देण्याच्याही सूचना ·         जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन वाशिम , दि . २३ : राज्य शासनाने दि. २१ जून २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेनुसार कर्जमाफी मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन स्वरूपातील अर्ज व घोषणापत्रे सादर करणे आवश्यक असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर ऑनलाईन अर्ज व घोषणापत्र भरण्याची सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी व प्रोत्साहनपर इतर लाभ मिळविण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या महा ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्रांवर जाऊन आपले ऑनलाईन अर्ज दि. ३१ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मा

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या विकासाला केंद्र सरकारचे प्राधान्य - संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

Image
·         वाशिम येथे ‘सबका साथ, सबका विकास संमेलन’ ·         केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात राबविलेल्या योजनांचे प्रदर्शन ·         कोणत्याही आक्रमणांचा सामना करण्यास भारतीय सैन्य सक्षम वाशिम , दि . ८ :   देशातील शेतकरी, वंचित, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यास केंद्र सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. वाशिम येथे वणी नॉर्थ क्षेत्राच्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्यावतीने आयोजित ‘सबका साथ, सबका विकास संमेलन’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील होते. केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात राबविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कारंजा-मानोराचे आमदार राजेंद्र पाटणी, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, उपनगराध्यक्ष रुपेश वाघमारे, शिवराज कुलकर्णी, नरेंद्र गोलेच्छा, राजू पाटील राजे, धनंजय रणखांब, शाम बडे, तेजराव वानखडे, वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडचे म

वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात ५ लाख ९० हजार वृक्षांची लागवड

Image
·         प्राप्त उद्दिष्टाचा टप्पा ओलांडला ·         ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे होते उद्दिष्ट वाशिम , दि . ७ : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण मोहिमेसाठी जिल्ह्याला यंदा ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. दि. १ जुलै पासून सुरु असलेल्या वृक्ष लागवड सप्ताहाच्या आज अखेरच्या दिवशी जिल्ह्याने विविध शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या मदतीने ५ लाख ९० हजार वृक्ष लागवडीचा टप्पा गाठला असल्याचे वन विभागाने कळविले आहे. ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यावर्षी राज्यात दि. १ ते ७ जुलै दरम्यान ४ कोटी वृक्ष लागवड करण्याचे राज्य शासनाचे नियोजन होते. त्यानुसार प्रत्येक जिल्हाला उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले होते. वाशिम जिल्ह्यालाही ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच ५ लाख २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड मोहिमेची पूर्वतयारी व सूक्ष्म नियोज

भामदेवीमध्ये लोकसहभागातून २ हजार वृक्षांची लागवड

Image
·         राज्य शासनाच्या वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत उपक्रम ·         सलग दुसऱ्या वर्षी ग्रामस्थांचा वृक्षारोपणासाठी पुढाकार ·         जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रेरणेने गाव वनयुक्त करण्याचा निर्धार वाशिम, दि. ०६ : राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत सुरु असलेल्या वृक्ष लागवड सप्ताह अंतर्गत आज भामदेवी (ता. कारंजा) येथे लोकसहभागातून सुमारे २ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या प्रेरणेतून गतवर्षीही भामदेवी येथील ग्रामस्थांनी ‘एक व्यक्ती, एक वृक्ष’ याप्रमाणे २ हजार ५०० वृक्षांची लागवड केली होती. या झाडांचा वाढदिवसही दि. १ जुलै २०१७ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, कारंजाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सुद्धा सहभागी झाले होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मिळालेल्या २ कोटी रुपये निधीतून भामदेवी येथे विविध विकास कामे राबविण्यात येत आह

भामदेवीमध्ये साजरा झाला अडीच हजार झाडांचा वाढदिवस

Image
·         नागरिक, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ·         गतवर्षी प्रत्येक व्यक्तीने लावले होते एक झाड ·         दिंडी काढून दिला वृक्ष लागवडीचा संदेश वाशिम, दि. ०१ : गतवर्षी वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान दि.१ जुलै २०१६ रोजी भामदेवी (ता. कारंजा) येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रत्येक व्यक्तीने एक याप्रमाणे २५०० रोपांची लागवड केली होती. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या संकल्पनेतून झालेल्या या वृक्षारोपणाला आज एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने केक कापून अडीच हजार झाडांचा वाढदिवस साजरा केला. तसेच यावेळी झाडांचे महत्व पटवून देण्यासाठी गावामध्ये वृक्ष दिंडी काढण्यात आली. यावेळी कारंजाचे उपविभागी अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सचिन पाटील, सरपंच सुभाष मोहकर, उपसरपंच देवचंद कांबळे, पोलीस पाटील पंडित मेश्राम, राजुभाऊ चव्हाण, नामदेव निंबलवार, रोहिदास भैराणे, प्रेमानंद राऊत, मंडळ अधिकारी एस. आर. कानडे, तलाठी ए. बी. मिश्रा, ग्रामसेवक गजानन उपाध्ये यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या २ को