Posts

Showing posts from September, 2016

पदवीधर मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

वाशिम , दि . २२ :   भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. दिनांक १ ऑक्टोंबर २०१६ रोजी जाहीर सुचना प्रसिद्ध करून या कार्यक्रमास प्रारंभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दिनांक १ ऑक्टोंबर २०१६ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध होईल. दिनांक १५ ऑक्टोंबर २०१६ रोजी वर्तमानपत्रातील नोटिसीची पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. त्यानंतर दिनांक २५ ऑक्टोंबर २०१६ रोजी वर्तमानपत्रातील नोटिसीची द्विव्तीय पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत नमुना १८ द्वारे दावे व हरकती स्वीकारल्या जातील. दिनांक १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार यादीची छपाई करण्यात येईल. दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याविषयी दावे व हरकती दिनांक २३ नोव्हेंबर ते ०८ डिसेंबर २०१६ या कालावधीत स्वीकारल्या जातील. दावे व हरकती निकाली काढून दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजी पर्यंत  पुरवणी यादी तयार करून छपाई करण्यात येईल. दिनांक ३० डिसेंबर २०१६ र

जिल्हा वार्षिक योजनेतील निधी खर्चाचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आढावा

Image
·         निधी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ·         विशेष घटक योजनेच्या निधीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना वाशिम , दि . २१ :   जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ अंतर्गत झालेल्या निधी खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी विकास योजना अंतर्गत प्राप्त निधी व खर्च झालेल्या निधीचा यंत्रणानिहाय आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्पच्या अधिकारी श्रीमती वनिता सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे, महेश पाटील, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सोनोणे, जिल्हा उपनिब

जवाहर नवोदय विद्यालयात ‘डिजिटल क्लास रूम’चे उदघाटन

Image
वाशिम , दि . १७ :   येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या चार डिजिटल क्लास रूम व सीसीटीव्ही यंत्रणेचे उदघाटन खासदार भावना गवळी व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार भावना गवळी यांच्या खासदार निधीमधून डिजिटल क्लास रूम व सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावेळी विद्यालय सल्लागार समिती व विद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, राजस्थान आर्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलनकुमार संचेती, शिक्षक-पालक समितीचे सदस्य उध्दव काळे व श्रीमती जयश्री सुतवणे उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम जवाहर नवोदय विद्यालयाच्या माध्यमातून होत आहे. या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरिता जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. आज डिजिटल क्लास रूम संकल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान उपलब्ध होत असून जवाहर नवोदय विद्याल

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा आढावा

·         दुर्गा उत्सवात जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश वाशिम , दि . १७ :   ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, मुलींचे संगोपन व त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजगृती मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. याकारिता आगामी दुर्गा उत्सव काळात विविध माध्यमांचा वापर करून प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याकरिता स्त्रीभ्रूण हत्याविरोधी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहेच, पण त्यासोबत मुलींच्या जन्माविषयी लोकांच्या मानसिकतेमध्ये सुध्दा बदल होणे आवश्यक आहे. याकरिता जाहिरात फलक, पोस्टर्स यासह लोककलांच्या माध्यमातून जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच यामाध्यमातून लोकांना स्त्रीभ्रूण हत्या विरोधी कायदा, मुलींना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती याविषयी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी केल्य

'चाइल्ड लाइन'च्या मदतीने सापडला परराज्यात हरविलेला मुलगा!

वाशिम , दि . १७ :  तालुक्यातील सुकळी येथील ११ वर्षीय मुलगा (बालसंरक्षण कायद्यातील तरतुदीमुळे बालकाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.) वडिलांसोबत रेल्वेने प्रवास करीत असताना थेट छत्तीसगड राज्यातील दुर्ग या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्टेशनवर पोहोचला. दरम्यान , या मुलाला वाशिम जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या प्रयत्नाने व दुर्ग जिल्ह्यातील ' चाइल्ड लाइन ' च्या मदतीने वाशिम येथे सुखरूप आणण्यात येऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.   यासंदर्भात अधिक माहिती देताना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले , की हरविलेला ११ वर्षीय मुलगा दुर्ग रेल्वे स्टेशनवर पोहोचला , तेव्हा तेथे तैनात रेल्वे पोलिसांनी त्याची विचारपूस करून त्याला केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या ' चाइल्ड लाइन ' संस्थेच्या दुर्ग येथील अधिकार्‍यांच्या ताब्यात दिले. दुर्ग येथील ' चाइल्ड लाइन ' मार्फत संबंधित मुलाची माहिती वाशिम जिल्हा बाल संरक्षण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राठोड यांच्या मार्गदर

Special Interview of CM Devendra Fadnavis on DD Sahyadri in Jai Maharash...

Image

शासकीय योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास साधा -जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख

Image
·          वांगी येथे ‘संवादपर्व’ कार्यक्रमाचे आयोजन ·          शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन ·          कलापथकाच्या माध्यमातून समाजप्रबोधन         वाशिम , दि . १४ : वैयक्तिक व सार्वजनिक लाभासाठी राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांचा प्रत्येकाने लाभ घेऊन गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. वाशिम तालुक्यातील वांगी येथील दंडेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे वाशिम जिल्हा माहिती कार्यालय आणि वाशिम जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने आयोजित ‘संवादपर्व’ कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. याप्रसंगी सरपंच सविता भोयर, जिल्हा परिषदेचा स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नगरपरिषद प्रशासन अधिकारी दीपक मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप देशमुख, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे राजू सरतापे, राम शृंगारे, पोलीस पाटील माधव भोयर, श्री. उदगीरे  आदी उपस्थित होते. यावेळी रामचंद्र बहुद्देशीय संस्थेचे शाहीर मधुकर गायकवाड व सुशीलाबाई

यशोगाथा... लोकसहभागातून साकारली जलसमृद्धी

Image
·                    शेलूबाजारमधील नागरिकांची किमया ·                    अडाण नदी खोलीकारणामुळे गाव टंचाईमुक्त मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार हे जिल्ह्यातील मोठी बाजार पेठ म्हणून ओळखले जाणारे गाव. मात्र गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईच्या समस्येने या गावाला त्रस्त केले होते. गतवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठीही गावकऱ्यांना वणवण करावी लागली. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी गावकरी एकत्र आले आणि गावाच्या बाजूने वाहणाऱ्या अडाण नदीच्या खोलीकारणाचा विषय ऐरणीवर आला. शेलूबाजार गावाच्या बाजूने वाहणाऱ्या या अडाण नदीपात्रात गाळ जमा होऊन तिचे पात्र उथळ बनले होते. त्यामुळे पावसाळ्यात ओसंडून वाहणारी, प्रसंगी आजूबाजूच्या सुमारे २५० हेक्टर जमिनीवरील पिकेही आपल्या पाण्याबरोबर घेऊन जाणारी ही नदी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातच कोरडी पडत होती. त्यामुळे नदी काठी वसलेल्या या गावाला प्रत्येक उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या टंचाईवर मात करण्यासाठी अडाण नदीच्या पत्रातील गाळ उपसणे हा पर्याय समोर आला. वारंवार पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन

गणेशोत्सवसाठी पोलीस यंत्रणा सज्ज -जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर

Image
·         नागरिकांना सतर्कतेचे आवाहन ·         संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावणार वाशिम , दि . ०६ : जिल्ह्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून याकालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार बांधवांशी संवाद साधताना ते बोलत होते. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत ६४६ श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यामध्ये शहरी २३८ व ग्रामीण भागातील ४०८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात २०९ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. होळकर यांनी सांगितले. गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता शहरी व ग्रामीण भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यासाठी तीन उपविभागीय पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्त्वाखाली ८० पोलीस अधिकारी, १ हजार ८२ पोलीस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे ३१३ जवान व राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, वरुण वाहन व बॉंब शोध

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शौचालय उभारणीला गती द्या - खासदार भावनाताई गवळी

Image
        वाशिम , दि . ०४ : जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी प्रोत्साहित करून ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत शौचालय उभारणीस गती देण्याचे निर्देश खासदार भावनाताई गवळी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सभेत त्या बोलत होत्या.             याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद यांच्यासह वाशिम पंचायत समितीचे सभापती गजानन भोने, मालेगाव नगरपंचायतच्या सभापती मीनाक्षी सावंत, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, योगेश जवादे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा कृषी अधिकारी आबासाहेब धापते, प्रा. पंढरीनाथ चोपडे यांच्यासह सर्व तहसीलदार, गट विकास

उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सहकार्य करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·          कायदा व सुव्यवस्था विषयक आढावा बैठक वाशिम , दि . ०३ – दिनांक ५ सप्टेंबरपासून सुरु होत असलेला गणेशोत्सव तसेच बकरी ईद या उत्सवांच्या काळात जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी सर्वधर्मीय नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. गणेशोत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, गणेशोत्सव व बकरी ईद हे दोन्ही धार्मिक सण शांततेत साजरे करून त्यांचे पावित्र्य अबाधित राखण्याची जबाबदार सर्वधर्मीय नागरिकांची आहे. या काळात कोणत्याही गैरकृत्यांना थारा देऊ नका. तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचवणारे कृत्य आजूबाजूला घडू नये, यासाठी गणेशोत्सव मंडळे, शांतता समिती व मोहल्ला कमिटी यांनी सतर्क रहावे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेले खड्डे संबंधित नगरपरिषद व ग्राम पंचायतींनी तातडीने भरून घ्यावेत. तसेच या मार्गावर विद्युत दिवे बसवून घेण्यात यावेत. तीनही नगरपालिका क्

‘मुद्रा बँक’च्या प्रसार, प्रसिद्धीसाठी विविध उपक्रम राबवा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

·          प्रत्येक बँकांना उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश ·          कार्यशाळांचे आयोजन करण्याच्या सूचना वाशिम , दि . ०३ : मुद्रा बँक योजनेविषयी जिल्हाभर प्रसार, प्रसिद्धी होणे आवश्यक असून या योजनेविषयी मार्गदर्शन सखोल करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन तसेच विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक के. एम. अहमद, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक एस. एस. मेहता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक वि. कृ. माळी, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक ए. वाय. बनसोड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए. आर. दुर्गे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, होतकरू, बेरोजगार यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी ही य