Posts

Showing posts from January, 2017

प्रत्येक पदवीधर मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         ओळखपत्र म्हणून १४ दस्ताऐवज ग्राह्य धरणार ·         मतदान वैध ठरण्यासाठी पहिला पसंतीक्रम देणे आवश्यक वाशिम , दि . ३० : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकळी ८ ते ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पदवीधर मतदाराने यावेळी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य सभागृहात आयोजित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सभेत ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले, मतदान नोंदविण्यासाठी मतदान केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांकडून जांभळ्या शाईचा स्केचपेन पुरविण्यात येईल. त्या पेनने आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावाच्या पुढे ‘१’ हा अंक भारतीय, रोमन किंवा मराठी अंक पध्दतीनुसार लिहून आपले मत नोंदविणे आवश्यक आहे. इतर कोणत

मतदान केंद्र शोधण्यासाठी ‘बीएलओ’ करणार मदत

·         जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची माहिती ·         अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक ·         सर्च इंजिनद्वारेही मतदान केंद्राविषयी माहिती मिळणार वाशिम , दि . २४ : दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वा. या कालावधीत अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. जिल्ह्यातील १८ हजार ७३६ मतदार २९ मतदान केंद्रांवर आपला हक्क बजावणार आहेत. पात्र मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सर्च इंजिनद्वारेही ऑनलाईन पध्दतीने मतदान केंद्राविषयी माहिती जाणून घेता येईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे. वाशिम तालुक्यातील सुधीर चौरे (भ्र.क्र. ९८८१७५८८८५), ए. जे. घुगे (भ्र.क्र. ९८५०८८०८२०), रमेश आरु (भ्र.क्र. ९४२२०३६१४०), प्रशांत बोरकर (भ्र.क्र. ९७८०१११००१), अनिल काठेकर (भ्र.क्र. ९४२१८३१९८७), आर. एन. बोरकर (भ्र.क्र. ९४२०८३८९५५) यांची वाशिम व व्ही. डी. ढवळे (भ्र.क्र. ८८८८२९८४००) यांची अनसिंग मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यामध्ये विजय

पदवीधर मतदारांना संकेतस्थळावर मिळणार मतदान केंद्राची माहिती

वाशिम , दि . २६ :   अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१७ करिता दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी मतदान होत आहे. याकरिता पात्र मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती संकेतस्थळावर देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी कळविले आहे. नवीन पदवीधर मतदार यादी तयार करण्यात आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यास अडचण येऊ नये, याकरिता उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक, पत्ता व मतदान केंद्राची माहिती www.washim.amtgraduate.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे आडनाव व नाव टाईप केल्यानंतर पात्र पदवीधर मतदारांना त्यांचा अनुक्रमांक, नाव, पत्ता व मतदान केंद्राची माहिती मिळेल. तरी पदवीधर मतदारांनी या संकेतस्थळावर जावून आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती करून घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी कळविले आहे.

वाशिम येथे सात हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साकारली ‘स्वच्छ भारत अभियान’च्या लोगोची मानवी शृंखला !

Image
·         ' गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् ' ने घेतली दखल वाशिम , दि . २६ :   ' ना गंदगी करेंगे , ना करने देंगे ' असाचा मंत्र घेऊन वाशिम शहरातील ७ हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकत्र येत आज प्रजासत्ताक दिनी ‘स्वच्छ भारत अभियान’चा बोधचिन्ह (लोगो) असलेल्या महात्मा गांधींच्या चष्म्याची मानवी शृंखला साकारली. जिल्हा प्रशासन व वाशिम नगरपरिषदेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची दखल विश्व विक्रमांची नोंद घेणाऱ्या ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने घेतली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमाप्रसंगी वाशिम शहरातील ३० शाळा, महाविद्यालयातील ७ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी ‘स्वच्छ भारत अभियान’च्या जनजागृतीसाठी एकत्र जमले होते. वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहणचा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो असलेला महात्मा गांधींच्या चष्म्याच्या आकाराची मानवी शृंखला साकारली. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमाची दखल विश्व विक्रमांची नोंद घ

वाशिम येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
वाशिम , दि . २६ :   जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व हर्षोल्हासात साजरा करण्यात आला . पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राखीव पोलीस निरीक्षक देविदास इंगळे यांच्या पथकाने ध्वजाला सलामी दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदाताई देशमुख, खासदार भावनाताई गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तसेच कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सानिकांना यावेळी पालकमंत्री ना. राठोड य

वाशिमचा अन्सार दर्गीवाले, नागपूरची शीतल भगत ठरले ‘वाशिम मिनी मॅरेथॉन २०१७’चे विजेते

Image
·         राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद ·         जिल्हा प्रशासन व विविध स्वंयसेवी संस्थामार्फत आयोजन ·         राज्यभरातून सुमारे ३५०० धावपटूंचा सहभाग ·         कलापथाकाद्वारे मतदार जागृती वाशिम , दि . २५ : राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासन व विविध स्वयंसेवी संस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वाशिम मिनी मॅरेथॉन-२०१७’मध्ये पुरुष गटामध्ये वाशिमचा अन्सार दर्गीवाले तर महिला गटामध्ये नागपूरची शीतल भगत विजेती ठरली. अन्सार दर्गीवाले याने १२ किलोमीटरचे अंतर ३८मिनिटे ४२ सेकंदात पार केले तर शीतल भगत हिने ८ किलोमीटरचे अंतर ३६ मिनिटे ३८ सेकंदात पार केले. या मिनी मॅरेथॉनमध्ये राज्यभरातून सुमारे ३५०० पेक्षा अधिक धावपटू सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण पोलीस कवायत मैदान गजबजून गेले होते. प्रारंभी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून पुरुष गटाची मिनी मॅरेथॉन सुरु झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अप

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश देण्यासाठी वाशिम येथे विद्यार्थिनींची मानवी साखळी

Image
·         सुमारे ४४१ विद्यार्थिनींचा सहभाग ·         ‘बालिका महोत्सव’ उत्साहात साजरा ·         जिल्हाभरातून ५५० पेक्षा अधिक मुली सहभागी वाशिम , दि . २४ : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे आयोजित राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त वाशिम येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान अंतर्गत ‘बालिका महोत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रीडा संकुल येथे विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानचा लोगो मानवी साखळीद्वारे साकारून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे व मुलींना समान संधी देण्याचा संदेश दिला. याप्रसंगी आयोजित क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हाभरातून सुमारे ५५० विद्यार्थी सहभागी झाल्या होत्या. बालिका महोत्सवाचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी योगेश जवादे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. बालिका महोत्सवामध्ये सहभागी होण्याकरिता प्रत्येक तालुक्यातून पाचवी ते बारावी वर्गातील किम

‘स्वच्छ भारत’साठी सुमारे ६ हजार विद्यार्थी येणार एकत्र - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         जिल्हा प्रशासनाचा अनोखा उपक्रम ·         आज जिल्हास्तरीय ‘बालिका महोत्सव’ ·         राष्ट्रीय मतदार दिनी ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’ वाशिम , दि . २३ : जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. २४ ते २६ जानेवारी २०१७ या कालावधीत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. २४ जानेवारी रोजी बालिका महोत्सव, दि. २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त ‘वाशिम मिनी मॅरेथॉन’चे आयोजन केले आहे. दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमास्थळी सुमारे ६ हजार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येऊन ‘स्वच्छ भारत अभियान’च्या लोगोची निर्मिती करणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, दि. २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय बालिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २४ जानेवारी २०१७ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथ

रोखरहित व्यवहारासाठी ‘डिजिटल पेमेंट’चा पर्याय निवडा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·          वाशिम येथील डिजीधन मेळाव्यात मार्गदर्शन ·          व्यापारी वर्गाने रोखरहित व्यवहारासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान वाशिम , दि . १२ : काळा पैसा व करचोरीला आळा घालून अर्थव्यवस्था सक्षम बनविण्यासाठी रोखरहित व्यवहार वाढविणे आवश्यक आहे. याकरिता डिजिटल पेमेंट हा सर्वात सोपा व सुरक्षित पर्याय असून नागरिकांनी या पर्यायाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. वाशिम तहसीलदार कार्यालयाच्यावतीने येथील पाटणी कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे आयोजित ‘डिजीधन मेळावा’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी कु. क्रांती डोंबे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे उप महाव्यवस्थापक पार्थसारथी पात्रा, सह महाव्यवस्थापक श्री. गांगरस, जिल्हा अग्रणी बँक-स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक व्ही. एच. नगराळे, तहसीलदार बळवंत अरखराव, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, पेट्रोलपंपधारक संघटनेचे अध्यक्ष अनिल केंदळे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर काळे, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी पथके तैनात - अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे

Image
·          अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक वाशिम , दि . १२ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून जिल्ह्यात या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. या आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर स्थायी निगराणी पथक, व्हीडीओ पाहणी पथक व व्हीडीओ सर्वेक्षण पथके स्थापन करण्यात आल्याचे अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे नोडल अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी पी. एस. पाटील उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे म्हणाले की, आदर्श आचारसंहितेच भंग झाल्यास त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षालाही देता येईल. वाशिम जिल्ह्यात १८ हजार ७३६ पदवीधर मतदार आहे. जिल्ह्यात २९ मतदार केंद्र असणार आहेत, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर एक सूक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑब्झर्व्हर) नियुक्त केले जाणार आहेत. तसेच एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, एक क

जिल्हा सूक्ष्म व लघु उद्योग पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

वाशिम , दि . ११ : उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म व लागू उद्योग जिल्हा पुरस्कार सन २०१६ साठी अर्ज मागविण्यात आल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक टी. एन. खांडेकर यांनी कळविले आहे. विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्रामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. सूक्ष्म व लघु उपक्रमाचे उत्पादन सलग २ वर्षापासून सुरु असावे. उपक्रम बँकेचा थाकीतदार नसावा व कर्जाची परतफेड नियमित असणे आवश्यक आहे. यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच जिल्हा पुरस्कार प्राप्त उद्योगाला या पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही. मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये लघु उद्योग स्थायीरित्या नोंदणीकृत असावा. विहित नमुन्यातील अर्जासोबत बँकेचे प्रमाणपत्र, तीन वर्षाचे ताळेबंद तसेच परतफेडीबाबतचे प्रमाणपत्र प्रसिद्धीच्या तारखेपासून सात दिवसाच्या आत जिल्हा उद्योग केंद्रात सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन महाव्यवस्थापक श्री. खांडेकर यांनी केले आहे

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इग्रजी माध्यमांच्या शाळेत विनामुल्य शिक्षणाची सुविधा

वाशिम , दि . ११ : अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये विनामुल्य शिक्षण देण्यात येते. सन २०१७-१८ मध्ये आदिवासी विकास विभागाकडून निवडण्यात आलेल्या शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी विनामुल्य अर्ज वाटप दिनांक १ जानेवारी २०१७ पासून सुरु झाले आहे . तरी अनुसुचित जमातीच्या विदयार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या दाखल्याची प्रत सादर करावी. तसेच प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा १ लाख रुपये इतकी राहील. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ५ वर्षे पूर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाने दिलेला दाखला ग्राह्य धरण्यात येईल. विद्यार्थ्याचे पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसावेत. प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला, अग्रसेन भवन जवळ, महसुल भवन, अकोला (दूरध्वनी क्र. ०७२४-२४२५०६८) येथे किं

‘डिजिटल पेमेंट’साठी व्यावसायिक, बँकांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
·         मालेगाव येथे डिजी धन मेळावा ·         रोखरहित व्यवहाराविषयी जनजागृती ·         महा ई-सेवा केंद्रचालकांना ‘पीओएस’चे वाटप वाशिम , दि . १० : रोखरहित व्यवहारासाठी ‘डिजिटल पेमेंट’ हा सर्वात सोपा व सुरक्षित पर्याय असून यामाध्यमातून होणारे व्यवहार वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यावसायिक व बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. मालेगाव येथील जुने बस स्थानक परिसरात तहसीलदार कार्यालयाच्यावतीने आयोजित डिजी धन मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप व तहसीलदार रमेश जसवंत आदी उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये रोखरहित मेळाव्याची माहिती देण्यासाठी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, सेन्ट्रल बँक, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, आपले सरकार सेवा केंद्र व महा ऑनलाईन केंद्र, महावितरण, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने मोबाईल एटीएमद्वारे उपस्थितांना डिजिटल पेमेंटविषयी माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

Image
वाशिम , दि . ०९ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता वाशिम जिल्ह्यात लागू झाली असून या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  बैठकीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बळवंत गजभिये, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची अधिसूचना दि. १० जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध होणार आहे. दि. १७ जानेवारी २०१७ ही नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख असून नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. १८ जानेवारी रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तार