जिल्हा सूक्ष्म व लघु उद्योग पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. ११ : उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या
निर्देशानुसार वाशिम जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म व लागू उद्योग जिल्हा पुरस्कार
सन २०१६ साठी अर्ज मागविण्यात आल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक टी.
एन. खांडेकर यांनी कळविले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा
उद्योग केंद्रामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. सूक्ष्म
व लघु उपक्रमाचे उत्पादन सलग २ वर्षापासून सुरु असावे. उपक्रम बँकेचा थाकीतदार
नसावा व कर्जाची परतफेड नियमित असणे आवश्यक आहे. यापूर्वी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय
तसेच जिल्हा पुरस्कार प्राप्त उद्योगाला या पुरस्कारसाठी प्रस्ताव सादर करता येणार
नाही. मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये लघु उद्योग स्थायीरित्या नोंदणीकृत असावा.
विहित नमुन्यातील अर्जासोबत बँकेचे प्रमाणपत्र, तीन वर्षाचे ताळेबंद तसेच परतफेडीबाबतचे
प्रमाणपत्र प्रसिद्धीच्या तारखेपासून सात दिवसाच्या आत जिल्हा उद्योग केंद्रात
सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधण्याचे
आवाहन महाव्यवस्थापक श्री. खांडेकर यांनी केले आहे
Comments
Post a Comment